धुरा (भाग 7) ©संजना इंगळे

श्री. महाजन सांगितल्याप्रमाणे खेड्यातील काही निवडक शिक्षकांना बोलवतात…त्या शिक्षकांना आपला असा झालेला सन्मान पाहून कृतकृत्य झाल्यासारखे वाटते… पुन्हा एकदा मुख्यमंत्री भवन…कॉन्फरन्स हॉल. “तुम्हाला आजची शिक्षणव्यवस्था बदलायची असेल तर तुम्ही काय उपाय कराल?” “मुलांना मुक्तपणे शिकवा…चार भिंतीत राहून मुलं काहीही शिकू शकणार नाही…त्यांना पठारावर, डोंगरावर नेऊन भूगोल शिकवा, नकाशा समोर ठेऊन भूभाग शिकवा…त्यांना बागेत नेऊन वनस्पतीशास्त्र … Read more

मवाली सून (भाग 3)

भाग 2 https://www.irablogging.in/2020/04/2_16.html पुष्पा पोट धरून हसायला लागते.. “हा हा हा…मला हिचा आदर्श दाखवत होते काय…बघा बघा बघा…तुमची भाचे सून…” मामा अन मामीचा अखेरच्या क्षणी चांगलाच पोपट झालेला…दोघांना मौन बाळगत परतन्याशिवाय पर्याय नव्हता. “निखिल…आज तुझ्या बायकोमुळे माझी माझ्या भाऊ अन वाहिनीसमोर नाचक्की झाली….आवर तुझ्या बायकोला…नाहीतर मी आधीसारखी…” “आधीसारखी काय..” “मी आधीसारखी तिला वागवेन..” “आई …तुला … Read more

मवाली सून (भाग 2)

भाग 1 https://www.irablogging.in/2020/04/1_15.html मामांना सुनबाई बघताच भोवळ यायला लागते…शोभा अक्का मामाला धरून आत घेते…सोफ्यावर बसवते..पंखा सुरू करते.. “दादा, बरा आहेस ना? काय होतंय??”. मामा घामेघुम झालेले असतात… “अगं ही…ही…ही तुझी सून लक्ष्मी??” “Call me lucky…. हेय MS….आनेवाला था तो बताने का बाबा…तेरे लिये मस्त 🍺 सोय करती ना मैं…जानदे…ओ SB… आपण रात्री बाहेरच जेवणार आहे…आपला … Read more

धुरा (भाग 6) ©संजना इंगळे

(20 दिवसांनी) “तेजु मॅडम..या…ही तुमची खुर्ची…नाईक साहेबांनंतर आता तुम्हीच याला न्याय द्याल याची खात्री आहे मला…” तेजु बहुमताने विजयी होऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान होते… खुर्चीवर बसताच तिच्या अंगात जबाबदारीची एक वीज शहारून जाते, असं वाटतं जणू बाबाच आता तिच्यात संचारले आहेत.. इतक्यात श्री. महाजन केबिन मध्ये येतात.. “नमस्कार मॅडम, मी तुमचा PA..तुमचं सर्व वेळापत्रक, कार्यक्रम, … Read more

ती ‘वेगळी’ राहते

काळ जसा पुढे जातोय तसतसं माणूस जुन्या अनेक पद्धतींना फाटा देत जातोय. त्यातलीच एक म्हणजे एकत्र कुटुंबपद्धती. एक काळ होता जेव्हा अनेक लोक एकत्र विनातक्रार राहत असत. तसे संस्कारही कुटुंबावर होत असायचे. त्याग, समर्पण, जिव्हाळा या गोष्टी शिकवाव्या लागत नसत, आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांना पुरेपूर आदर दिला जाई. नंतर समाजव्यवस्था बदलली, माणूस दुसऱ्याला आपल्या वर्चस्वाखाली … Read more

मवाली सून (भाग 1)

सकाळी १० ची वेळ. मुंबईतील शिंदे चाळ नेहमीप्रमाणे गजबजलेली होती. “मी पहिले नंबर लावलेला… तू कुठून आली गं सटवी …” “ए भवाने.. सटवी कोणाला म्हणतेस गं ?? तू सटवी तुझं खानदान सटवं … “ “सासूबाई .. या बर झालं आलात… ही तुम्हाला सटवी म्हणतेय… “ रोजच्या प्रमाणे पाणी भरायला भांडणं चालू होती… सर्वांना सवयच झालेली … Read more

सुनबाई देवाजवळ दिवा तरी लाव…

“देवाजवळ दिवा तरी लावावा…गेली लगेच आराम करायला..” हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असलेली सुखदा रोजच घरी उशिरा येत होती. कोरोना मुळे तिच्यावर खूप जबाबदारी आली होती, या आजाराची टांगती तलवार रोज घेऊन ती कामावर जाई…आई वडील आणि मिस्टरांनि काळजीपोटी तिला सुट्टी घ्यायला सांगितली होती, पण सुखदा ला आपल्या कर्तव्याची पुरेपूर जाण होती, आपल्या पेशंट ची … Read more

धुरा (भाग 5) ©संजना इंगळे

तेजु चा बाबांच्या ऑफिस मध्ये दिवसरात्र अभ्यास चालू होता, इतक्यात तिच्या फोनवर लारा चा मेसेज.. “Hope you are better now, when will you return?” तेजु तिला सांगते.. “I am resigning that job, now joining the politics after my dad..” “Are you serious? Think again teju… you already hate that field…” “My decision is final…” तिच्या … Read more

धुरा (भाग 4) ©संजना इंगळे

टाळ्यांचा कडकडाटाने तेजु भानावर येते…आपण हे काय बोलून गेलो? हे ठरवून बोललेलं नाहीये…हे सगळं आतून आलं…कसं बोललो आपण हे सगळं? नाही….हे मी नाही…माझ्या मधून बाबाच बोलून गेले… तेजु समोर आता खूप मोठं आव्हान होतं, ज्या गोष्टीचा तिला नेहमी तिटकारा वाटत होता आज त्यालाच ती जाऊन भिडली होती.. पण राजकारण म्हणजे इतकं सोपं नव्हतंच तिच्यासाठी..दररोज एक … Read more

धुरा (भाग 3) ©संजना इंगळे

Marathi story तेजु असं बोलली यावर आईचा विश्वासच बसेना.. “तेजु?? तू बोलतेय हे?” “हो…मीच बोलतेय, जिला राजकारणाचा आणि खुद्द या देशाचा तिटकारा आहे ती बोलतेय…” “तेजु, तू चेष्टा करतेय..” “नाही…आज हे सगळं पाहिलं आणि माझ्यातली एका बापाची मुलगी जागी झाली…जिच्या बापाने इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, जनतेला उराशी धरलं, त्याला आता असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं? … Read more

धुरा (भाग 2) ©संजना इंगळे

Marathi story तेजु आपल्या वडिलांजवळ जाते.. “डॅड… डॅड उठ…तू मला सोडून जाऊ शकत नाहीस…” तेजु स्वतःला आवरू शकत नव्हती…तिने आईकडे पाहिलं… आई तेजुवर आधीच रागावलेली होती…आईने तेजुकडे पाहिलही नाही…मग तेजुचा मामा तिला तिथून घेऊन गेला आणि तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला… वातावरण अगदी स्तब्ध झालेलं…बाहेर कार्यकर्ते येऊन एकच धुमाकूळ घालत होते, मीडिया वाले ताटकळत उभे … Read more

रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे

Ramrajya घरात आजवर सर्वजण संकुचित विचार करत होते, पण आता सर्वांना एक ध्येय मिळालं होतं…सर्वजण एका ध्येयाने भारले गेले होते. जमिनीचा विस्तार खूप मोठा होता आणि मोक्याच्या ठिकाणी होता, महेश चं असं म्हणणं होतं की जमिनीवर काही डेव्हलप केलं तर पिढ्यान्पिढ्या आपल्या कुटुंबाला ते अजून वाढवता येईल…आणि जर विकली तर जो पैसा येईल तो या … Read more

धुरा (भाग 1) ©संजना इंगळे

  “डॅड मी तुला आधीच सांगितलं होतं की मला इंडियात बोलवायचं नाही, मला माहित आहे तू मला तिथे आल्यावर कशात घालणार आहेस ते…” “पोरी भेटायला ये गं फक्त…मी तुला कुठे म्हणतोय की इथल्या राजकारणात भाग घे म्हणून? तुला राजकारणाचा तिटकारा म्हणून मी आधीच तुला लांब ठेवलं होतं…तू हट्ट केला म्हणून लंडन ला पाठवलं, पण म्हणून … Read more

तिच्यातली कला जपायला हवी…

Respect your wife “अगं ते चित्र काय काढत बसलीये? आज आई येणारे गावाहून…ती तयारी सोडून हे काय धरून बसलीस..” “अहो चिडू नका, झालीये सर्व तयारी… पण माझं चित्र तर बघा एकदा…” “नंतर…मला आईसाठी मिठाई आणायला जायचं आहे…” “बरं या जाऊन..” नेहमीप्रमाणे सपना च्या कलेला डावलून मंगेश निघून गेला…सपना म्हणजे गुणांचं भांडार, चित्रकला, हस्तकला, स्वयंपाक, भरतकाम, … Read more

रामराज्य (भाग 11) ©संजना इंगळे

तारा चं ते बोलणं करुणा ऐकते अन तिला खात्री पटते की आता आपलं कुटुंब पूर्णपणे एक झालं आहे. एवढ्यात शेजारी पाजारी लोकं कुजबुज करू लागलेले…”सगळे एकत्र राहताय, किती दिवस राहतील असं? शक्य तरी आहे का या काळात सर्वांना घेऊन पुढे जाणं…” “नाहीतर काय, घरात भरपूर वाद असतील, बाहेर थोडी ना येऊ देणार आहे ते…” सर्वांच्या … Read more

लॉकडाऊन मध्ये आपल्या पोरांचे उद्योग….

लॉकडाऊन मध्ये आपल्या पोरांचे उद्योग…. तुम्ही अख्ख जग लॉक डाऊन करा हो, पण आमच्या पोरांच्या सुपीक डोक्यातून येणारी पिकाला कधीही कीड लागणार नाही, आता हेच बघा ना, सर्वजण घरी आहेत…काही कामधंदा नाही…खाली दिमाग शैतान का घर होऊन गेलंय आमच्या पोरांचं… आता बघा ना, अश्याच एकाच्या डोक्यात नांगरणी करण्याचं फॅड घुसलं… कसली? मातीची? नाही हो…फेसबुक चे … Read more

रामराज्य (भाग 10) ©संजना इंगळे

करुणा ला हा दैवी संकेत भासतो. राघवेंद्र ची नोकरी जाणं आणि त्यांनी इथे परत येणं हा केवळ योगायोग नाही. खूप अश्या गोष्टी होत्या ज्या कित्येक वर्षे घरातल्या प्रत्येकात एक सल म्हणून बोचत होत्या. करुणा ने तो कागद नीट पाहिला, पण तिला त्यातलं काही समजेना. ती सासरेबुवांकडे गेली.. “बाबा…सासूबाईंच्या खोलीत हे सापडलं…काय आहे हे?” सासरेबुवा कागद … Read more

रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट मध्ये जाण्याचा निर्णय काही काळ स्थगित करते, “विशाल…आपण घाई नको करायला इथून जायची..” “असं अचानक काय झालं तुला? छोटू साठी घर सोडवत नाहीये ना तुला?” “ते तर कारण आहेच, पण…” “पण काय?” “सासुबाईंचं स्वप्न होतं… त्यांचं कुटुंब रामराज्य म्हणून ओळखलं जावं…” “हो…पण रामराज्यात सर्वांना आदर दिला जायचा…समान वागणूक दिली जायची..इथे तू बघतेय ना? … Read more

मिस परफेक्ट (भाग 9 अंतिम)

आयुष्य साधं सरळ आणि सोपं असतं हे माधवी चं तत्व होतं. कुठल्याही गोष्टींचं टेन्शन न घेता त्यावर सरळ मार्ग काढून मोकळं व्हायचं…शुभरा म्हणजेच तिच्या नंदेच लग्न होऊन 2 वर्ष होऊन गेलेली असतात. ती बाहेरगावी राहत असते. एक दिवशी हे सर्वजण तिच्या घरी जाण्याचं निश्चित करतात. शुभरा ला तसं फोनवर आधी कळवायला दुर्गा बाईंनी फोन हातात … Read more

रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट बद्दल बोललेलं वृषाली ने सुदधा ऐकलं…ती मनाली ला बाजूला घेऊन गेली.“ताई, मिळाला का चांगला फ्लॅट?” “हो एक चांगला भेटलाय, एकदा बघून येतो आणि फायनल करतो..” “बरं होईल, आम्हीही लवकर प्रयत्न करतो…” इतक्यात तारा सुद्धा तिथे येते.. “काय? फ्लॅट मध्ये राहणार दोघी?” “वेगवेगळ्या… बस झालं आता हे…सासूबाई होत्या तोवर त्यांच्याखातर राहिलो एकत्र…आता जरा प्रॅक्टिकल … Read more