मिस परफेक्ट (भाग 8)

तुषार अन आई दोघेही आत जाऊन मामांशी बोलतात, पण मामा काही प्रतिसाद देत नाहीत. मग माधवी ची पाळी येते.. माधवी आत जाते, काहीही न बोलता मोबाईलवर काहीतरी करते आणि मामांसमोर धरते… “बघा…मॅट्रिमोनि साईटवर सुरेखा चं खातं उघडलंय…इतके सारे मुलं तयार आहेत लग्नाला…सगळं तयार आहे…पण तुम्ही असे बेडवर पडलात त्यामुळे अडून राहिलंय… बघा आता मुलीचं लग्न … Read more

रामराज्य (भाग 5) ©संजना इंगळे

आता छोटू ची शिकवणी सुरू झाली मनाली कडे.. मनाली आपला मुलगा समजून त्याला शिकवू लागली, समजावून देऊ लागली. छोटू आता जास्तीत जास्त वेळ मनाली कडे असायचा..”मोठी आई…मोठी आई” म्हणून घर दणाणून सोडायचा… मनाली त्याला आता अवघड विषय सोपे करून सांगत असे..वृषालीचा बराचसा ताण हलका झाला होता. सकाळच्या वेळी छोटू चं आवरून…छोटू ला शाळेत सोडून ती … Read more

मस्ती की पाठशाला (भाग 12) ©संजना इंगळे

विद्या च्या वर्गातील मुलं मॅच चा सराव करत असतात…विद्या मॅम त्यांचा सराव बघत असतात…इतक्यात जोशी सर त्यांची टीम घेऊन तिथे येतात.. हट्टेकट्टे आणि धिप्पाड मुलं…असुरांची सेना समोरून येतेय असंच दिसत होतं… जोशी सर सर्वांच्या पुढे… “काय मग…यावेळी आमच्याशी स्पर्धा?? कशाला उगाच शक्ती वाया घालवताय…” “ते आता मैदानात पाहू..” आकाश उत्तर देतो… “लेडीज कोच…म्हणजे आधीच खेळायचे … Read more

ब्रेकिंग: अखेर कोरोना वर औषध सापडले….

अखेर कोरोना वर औषध सापडले…. शीर्षक ऐकून चकित झालात ना? कोरोना ने ज्या जगाला काही दिवसातच बंद पाडलंय, तेच जग आज कोरोना वर एखादी प्रभावीशीर लस कधी मिळतेय याचाच विचार करत बसलेत. म्हणजे एकदा का लस आली, की बाहेर हुंदडायला मोकळे… जगातील मृतांचा आकडा, इटली मधली भयानक परिस्थिती याचे फोटो अन व्हिडीओ सोशल मीडिया वर … Read more

रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे

घरात या तिघींच्या वाटा भिन्न पडल्या होत्या, एकीलाही एकत्र राहून साम्राज्य उभं करण्याची इच्छा नव्हती. लग्न जमवताना त्यांनी आनंदाने आम्हाला ‘एकत्र’ कुटुंब आवडेल असं सांगितलं होतं..पण आता परिस्थिती बदलली होती.करुणा च्या लक्षात आलं, की या तिघी आधुनिक मुली. यांना कुठलंही बंधन नको होतं. कसलाही त्याग नको होता. आपल्या परीने सर्वांना जगायचं होतं. तिने आधी सासरेबुवांची … Read more

कोरोना संकटात देव कुठे आहे असं म्हणणाऱ्यांनी.. नक्की वाचा

“राजेश….अरे तुझे आई बाबा कपाटाखाली अडकलेत..” “काय? कपाटाखाली? कसेकाय? तुला कसं समजलं? ठीक आहेत ना ते?” राजेश ची धडधड वाढते, प्रचंड वेगाने तो टेरेस मधून खाली उतरत घरात शिरतो…पाहतो तर काय, आई बाबांचं पासपोर्ट फोटो कपाटाखाली पडलेला….अन आई बाबा त्यांचा बेड मध्ये शांतपणे बसले होते… राजेश चिडला, “मोहन…लाज वाटते का असा विनोद करायला…लहान आहेस का … Read more

ऐकून घेतलं तर काय फरक पडतो?

“काय गं आज उदास दिसतेय…” नेहा चा उदास चेहरा पाहून दीपक तिला विचारतो.. “काही नाही..” “सांग गं… “ “सांगून काही उपयोग आहे का?” “अच्छा.. म्हणजे कुणीतरी काहीतरी बोललं असणार तुला..” “हो..आणि तुम्हाला सांगितलं तर तुमचा नेहमीचा डायलॉग…ऐकून घेतलं तर काय फरक पडतो…” “बरोबर आहे ना, काय फरक पडतो थोडसं ऐकून घेतलं तर?” “थोडसं?” “जे काय … Read more

का ऐकायचं मोदींचं?

Modi on corona का ऐकायचं मोदींचं? कोरोना संदर्भात आपल्या माननीय पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलं, काही गोष्टी अमलात आणायला सांगितल्या, किती लोकांनी ते मनापासून ऐकलं आणि पाहिलं? देशाचे पंतप्रधान, म्हणजे एक सर्वोच्च जबाबदारी.. आपल्या विचारांचा परीघ केवळ आपल्या घरापूरता, पण यांना संपूर्ण राष्ट्राची जबाबदारी असते.. संध्याकाळी 5 वाजता टाळ्या व तत्सम आवाज करण्याच्या त्यांच्या निर्णयावर काही … Read more

रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे

“मनाली, वृषाली, तारा??? हे काय? तिघीजनी वेगवेगळं काय बनवताय??” “ताई हे रोजच आहे…एकाने प्रत्येकाला स्वयंपाक करणं म्हणजे किती अवघड आहे…रोज 7 जणांचं जेवण बनवावं लागतं… मग प्रत्येकजण आपापला स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जातं…” ओ “आणि बाबा?” “सासूबाई होत्या तेव्हा त्या बनवून घ्यायच्या. पण आता..” “मी करून घेईल, तुम्हाला घाई होत असेल..निघा तुम्ही..” तिघींजनी आणि … Read more

जाणिवाच जिथे दफन होतात…

आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांमधल्या त्या निरागस स्त्री ने माझं लक्ष वेधून घेतलं होतं..अगदी टिपिकल म्हणावं ना तसं…”बाईच्या जातीने काय काय करायला हवं बाई?” असा प्रश्न तिला विचारावा वाटला…कारण ऐकलेली, वाचलेली स्त्री ची सगळी गुणसंपदा तिच्यातून दिसून येत होती…आल्या आल्या डोक्यावरचा पदर नीट केला, एक स्मितहास्य केलं, कसलाही विचार न करता किचन मध्ये येऊन ओट्याजवळ उभी राहिली…तिला … Read more

मस्ती की पाठशाला (भाग 11) ©संजना इंगळे

परीक्षा संपते, पेपर अगदी छान गेलेले असतात. कॉलेजला सुट्ट्या लागतात. पण मुलांचं मन काही घरात रमत नाही, विद्या मॅम चा वर्ग, एकत्र मिळून केलेली धमाल… याची मुलांना सवय झालेली. सुट्ट्या सम्पतात, कॉलेज पुन्हा सुरू होतं. आता कॉलेजमध्ये इव्हेंट सुरू होतात, sports डे, gathering, dj… फुल to धमाल… दरवेळी प्रमाणे मुलं विविध activities मध्ये भाग घेत … Read more

मिस परफेक्ट (भाग 5)

Marathi story माधवी ने चोराला अशा प्रकारे पिटाळलं की घरातली एकही वस्तू गेली तर नाहीच, पण उलट चोराच्याही वस्तू माधवी ने आपल्याकडे ठेऊन घेतल्या… माधवी चा नोकरीवर जायचा दिवस उजाडला…छान तयारी करून डबा बांधून ती नोकरीवर गेली. तिथे पाय ठेवताच तिला भांडणाचा आवाज ऐकू आला…आत जाऊन बघते तर एक कलाइन्ट त्याचे पैसे मिळत नाहीये म्हणून … Read more

रामराज्य (भाग 2) ©संजना इंगळे

करुणा खूप दिवसांनी आपल्या गावाकडच्या घरी आलेली असते, घराचं रूपच पालटून गेलेलं असतं. तिन्ही नव्या सुनांनी अनेक आधुनिक बदल केले होते. घराबाहेर लेडी स्कुटर होत्या, भिंतींवर तिघांच्या लग्नाच्या फ्रेम लागलेल्या होत्या, वस्तूंची बऱ्यापैकी अदलाबदल झालेली होती… 15 दिवस सरले, आता परिस्थिती रुळावर यायला लागलेली, सर्वजण आपापल्या कामाला लागले. राघवेंद्र करुणा ला म्हणाला, “चल, आता आपल्यालाही … Read more

चला शिकूया रांगोळी (भाग 1) बेसिक

Rangoli designs | rangoli design simple | easy rangoli designs | rangoli step by step चला तर मग, आजपासून आपला प्रवास सुरू होणार आहे कलेच्या एका अनोख्या दालनात. सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात असू द्या, रांगोळी काढण्या आधी सर्व साहित्य जवळ असू द्या, आपल्याला रांगोळीचे रंग, चहाची प्लास्टिक ची गाळणी, एक खराब फडके लागेल. रांगोळी … Read more

रांगोळीचा इतिहास

Rangoli designs चला शिकूया रांगोळी… शिक्षण, नोकरी यामुळे घरकामात मी फारशी तरबेज नव्हते, तोकडा स्वयंपाक यायचा..त्यात जो यायचा तोही बिघडायचा…पण एक गोष्ट मात्र अशी होती की ज्यामुळे माझ्या सासरी माझं फार कौतुक केलं जायचं ते म्हणजे “दारा पुढील रांगोळी”. माहेरी आईचा स्वभाव मुळातच कलासक्त होता, त्यामुळे चित्र, ओरिगामी, सजावट आणि रांगोळी याची शिदोरी आई कडूनच … Read more