गुन्हेगार 3 अंतिम

हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली, त्या शाळेबद्दल तिला माहीत होती, काही राजकारण्यांनी मिळून ती शाळा फक्त दिखाव्यासाठी बांधली होती, तिथे शिक्षक नसायचे आणि अर्धे मुलं नसायचे, त्यांच्याकडे कामाला येणाऱ्या बायकांची मुलं तिथेच शिकत..आता त्यांच्याबरोबर आपल्या मुलीला पाठवायचं?? माया तिच्या खोलीत जाऊन रडू लागली..मुलगी जेव्हा अन्याय सहन न करण्याचा निर्णय घेते तेव्हा ती अजूनच जास्त … Read more

गुन्हेगार-2

मुलीला घेऊन ती घरी आली..तिथून तिला परत एका मैत्रिणीला भेटायला जायचं होतं..तिची आई हॉल मधेच बसली होती.. “काय गं? इतका उशीर?” “तिच्या शिक्षकांना भेटले होते..बरं आई मी अक्षराला भेटायला जातेय. जरा काम आहे माझं..” “बरं लवकर ये..घरी येऊन स्वयंपाक करायचा आहे..” आई असं म्हणाली आणि तिला परत वाईट वाटलं..लग्नाआधीची आई आणि लग्नानंतरची आई यात खूप … Read more

गुन्हेगार

“अहो ब्लड प्रेशर फार वाढलंय तुमचं, या वयात असा त्रास बरा नाही..तुमच्या कुटुंबात कुणाला त्रास आहे का बीपीचा?” “नाही..” “मग कसलं टेन्शन वगैरे आहे का??” “डॉक्टर, मला गोळ्या लिहून द्या..” मायाने विषय तिथेच टाळला..डॉक्टर मॅडमला समजुन गेलं की काहीतरी वैयक्तिक ताण तणाव असेल जो यांना सांगायचा नाहीये, डॉक्टरांनीही तिच्या वैयक्तिक बाबीत जास्त खोलवर न जाता … Read more

उत्तम व्यक्ती ……

9. वाईट माणसांना तुम्ही चेहऱ्यावरून ओळखता 10. एखादा काही चुकीचं बोलला तर तुम्ही कित्येक दिवस ते मनाला लावून धरततात. वरीलप्रमाणे किमान 7 गोष्टी तुमच्यात असतील तर तुम्ही उत्तम व्यक्ती आहात. 😊😊😊

उत्तम व्यक्ती

3. तुम्हाला नेहमीच इतरांना मदत करायला आवडते 4. तुम्हाला बोलायला जेवढे आवडते तेवढेच तुम्ही ऐकूनही घेतात

घास 3 अंतिम

पुढे आई वडिलांनीच तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधून दिला. मुलगा दिसायला खूप छान होता, कौस्तुभ पेक्षा कितीतरी पट भारी. लग्नाआधी त्यांच्यात भेटीगाठी झाल्या. त्याने तिला स्पष्ट सांगितलं, “हे बघ, आपलं मोठं कुटुंब आहे. तुला सर्वांना सांभाळून घ्यावं लागेल..” तिने मान डोलावली. थाटामाटात लग्न झालं. ती सासरी आली. तिच्या वाट्याला नवरा तसा कमीच येई. नवरा पूर्णवेळ … Read more

घास-2

तो प्रसंग तिच्या मनावर कोरला गेला. तिचं कुटुंब गरीब असलं तरी तिचा मामा चांगला शिकलेला होता, शहरात राहत होता. त्याने हट्ट करून पुढे शिकवण्यासाठी तिच्या आई वडिलांना समजावून तिला शहरात घेऊन गेला. शहरातील वातावरण अगदी वेगळं. तिला रुळायला बराच वेळ लागला. कॉलेज, मित्र मंडळी या सर्वात ती चांगली रमू लागली. तिथेच तिची भेट कौस्तुभ सोबत … Read more

घास-1

तब्बल 80 वर्षानंतर ती आज तृप्त झाली होती, लहानपणापासून फारशी सुखं तिच्या वाट्याला आली नव्हती, पण एका गोष्टीचं तिला फार अप्रूप असायचं, “पहिला घास..” म्हणायला छोटीशी गोष्ट, पण तिच्यासाठी तिचं विश्व सामावलेलं होतं.. तिला आठवलं, लग्नानंतर नवऱ्याचा पहिला वाढदिवस सोबत साजरा होत होता. तिने खूप मेहनतीने केक बनवला, वाढदिवसाची सगळी तयारी केली, केक कापण्याच्या प्रसंगी … Read more

प्लॅन 3 अंतिम

” आता काहीही झालं तरी ही नोकरी मिळवायचीच..” देवासमोर त्याने हात जोडले आणि प्रार्थना केली, “देवा, काहीही कर पण मला नोकरी मिळू दे..” त्याने मुलाखत दिली, चांगली गेली.. तो त्यांच्या प्रतिसादाची वाट बघू लागला, एक आठवडा झाला, दोन आठवडे झाले, महिना झाला.. No response… घरातले गहू परत संपत आलेले, आता त्याने देवाला धारेवर धरलं, “आता … Read more

प्लॅन 2

व्यंकट हे सगळं ऐकतो आणि खोलीत जाऊन रडू लागतो. कॉलेज संपून दोन वर्षे झालेली त्याला. अभ्यासात बेताचाच होता, नोकरीत नशीब साथ देत नव्हतं. एक दोन ठिकाणी नोकरी केलीसुद्धा, पण त्या कंपन्या बंद झाल्या. त्याचं काम चांगलं आणि प्रामाणिक होतं पण शेवटी कंपन्यांच्या भवितव्यावर त्याचं भवितव्य होतं. त्याच्या गावात फारश्या कंपन्या नव्हत्या आणि बाहेरगावी काम शोधणं … Read more

प्लॅन-1

“देवा मी आजवर तुझ्याकडे काहीही मागितलं नाही, पण आज जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी तुझ्यासमोर प्राण सोडेल..” व्यंकट देव्हाऱ्यासमोर हात जोडून उभा होता. तो नोकरी शोधून शोधून थकला होता, घरात आई वडील, लहान भाऊ यांची जबाबदारी. त्याचं वय होत चाललं होतं, लग्नालाही मुलगी मिळेना. भावाचं सगळं बाकी… एके दिवशी घरात गहू संपले. आईने … Read more

हस्तक्षेप-5 अंतिम

तुझी बायको मोठमोठे व्रत करत नाहीत हे तुला कधीपासून दिसायला लागलं? आणि सुट्टीच्या दिवशी फिरायला न जाता मंदिरात जाऊन दानधर्म करायला तुझी बायको सांगते ते दिसलं नाही तुला? कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तुझं तिच्याशी वागणंच बदललं…तुला बैल म्हटलं आणि तुला ते खरंच वाटलं, मग ती कशी तुझ्या आज्ञेखाली राहील याचा विचार तू करत गेलास..अरे शिकली … Read more

हस्तक्षेप-4

“तू कितीही बोलला तरी त्याचा स्वभाव बदलणार आहे का?” ओमने निरोप घेतला ते गोंधळलेल्या मनानेच. त्याने तडक श्रेयसकडे मोर्चा वळवला. श्रेयस त्याच्या आईसोबत नाष्टा करत होता. ओमला बघुन ते दोघेही जरासे गोंधळले. ओमला आत बोलावलं आणि आईने त्याला नाष्टा दिला. “नाष्टा असुद्या, मुद्द्यावर येतो..सिया आणि तुझं काय बिनसलं आहे?” श्रेयस शांत होता..त्याच्या आईने बोलायला सुरुवात … Read more

हस्तक्षेप-3

ओम निर्धास्त झाला, पुढे ओमचं सुद्धा लग्न झालं आणि तोही त्याच्या संसारात रुळला. पण श्रेयसच्या या अचानक आलेल्या कॉल ने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ओमने त्यांचं लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता, आता त्याला यात लक्ष घालणं महत्वाचं वाटलं. तो आधी सियाकडे गेला. तिच्या घरातलं वातावरण बदललं होतं. तिची आई आधीसारखी वागत नव्हती. कदाचित … Read more

हस्तक्षेप-2

ओमला बहीण नव्हती आणि सियाला भाऊ. ओम आपली बहीण म्हणून सियाला कायम मदत करायचा, सियाच्या आई वडिलांनाही ओम असल्याने काळजी नव्हती. कॉलेजला जाताना, येतांना ओमच्या मागोमाग तिची गाडी असे. तिला कॉलेजमध्ये उशीर होणार असेल तर ओमवर तिची जबाबदारी असे. अगदी सख्ख्या भाऊ बहिणीसारखं त्यांचं नातं होतं. श्रेयस आणि सियाचं बॉंडिंग बघून ओमला खात्री पटली की … Read more

हस्तक्षेप-1

“आम्ही एकत्र राहत नाही आता” श्रेयसचे हे वाक्य ऐकताच त्याच्या मित्राला- ओमला धक्काच बसला. “हे कसं शक्य आहे? मीच या दोघांनी एकत्र यावं म्हणून पुढाकार घेतला होता, दोघेही एकमेकांसाठी बनलेले होते हे स्पष्ट दिसत होतं. लग्नानंतर सुद्धा इतके छान राहत होते दोघे, मग हे अचानक काय झालं??” ओमला धक्का बसला तसं त्याच्या बायकोने त्याला विचारलं, … Read more