रामराज्य (भाग 12 अंतिम) ©संजना इंगळे

Ramrajya घरात आजवर सर्वजण संकुचित विचार करत होते, पण आता सर्वांना एक ध्येय मिळालं होतं…सर्वजण एका ध्येयाने भारले गेले होते. जमिनीचा विस्तार खूप मोठा होता आणि मोक्याच्या ठिकाणी होता, महेश चं असं म्हणणं होतं की जमिनीवर काही डेव्हलप केलं तर पिढ्यान्पिढ्या आपल्या कुटुंबाला ते अजून वाढवता येईल…आणि जर विकली तर जो पैसा येईल तो या … Read more

रामराज्य (भाग 11) ©संजना इंगळे

तारा चं ते बोलणं करुणा ऐकते अन तिला खात्री पटते की आता आपलं कुटुंब पूर्णपणे एक झालं आहे. एवढ्यात शेजारी पाजारी लोकं कुजबुज करू लागलेले…”सगळे एकत्र राहताय, किती दिवस राहतील असं? शक्य तरी आहे का या काळात सर्वांना घेऊन पुढे जाणं…” “नाहीतर काय, घरात भरपूर वाद असतील, बाहेर थोडी ना येऊ देणार आहे ते…” सर्वांच्या … Read more

रामराज्य (भाग 10) ©संजना इंगळे

करुणा ला हा दैवी संकेत भासतो. राघवेंद्र ची नोकरी जाणं आणि त्यांनी इथे परत येणं हा केवळ योगायोग नाही. खूप अश्या गोष्टी होत्या ज्या कित्येक वर्षे घरातल्या प्रत्येकात एक सल म्हणून बोचत होत्या. करुणा ने तो कागद नीट पाहिला, पण तिला त्यातलं काही समजेना. ती सासरेबुवांकडे गेली.. “बाबा…सासूबाईंच्या खोलीत हे सापडलं…काय आहे हे?” सासरेबुवा कागद … Read more

रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट मध्ये जाण्याचा निर्णय काही काळ स्थगित करते, “विशाल…आपण घाई नको करायला इथून जायची..” “असं अचानक काय झालं तुला? छोटू साठी घर सोडवत नाहीये ना तुला?” “ते तर कारण आहेच, पण…” “पण काय?” “सासुबाईंचं स्वप्न होतं… त्यांचं कुटुंब रामराज्य म्हणून ओळखलं जावं…” “हो…पण रामराज्यात सर्वांना आदर दिला जायचा…समान वागणूक दिली जायची..इथे तू बघतेय ना? … Read more

रामराज्य (भाग 8) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट बद्दल बोललेलं वृषाली ने सुदधा ऐकलं…ती मनाली ला बाजूला घेऊन गेली.“ताई, मिळाला का चांगला फ्लॅट?” “हो एक चांगला भेटलाय, एकदा बघून येतो आणि फायनल करतो..” “बरं होईल, आम्हीही लवकर प्रयत्न करतो…” इतक्यात तारा सुद्धा तिथे येते.. “काय? फ्लॅट मध्ये राहणार दोघी?” “वेगवेगळ्या… बस झालं आता हे…सासूबाई होत्या तोवर त्यांच्याखातर राहिलो एकत्र…आता जरा प्रॅक्टिकल … Read more

रामराज्य (भाग 7) ©संजना इंगळे

मामसासरे बहिणीच्या घरात बहिणीचं प्रतिरूप करुणा च्या रूपाने बघतात. ते निरोप घेतात, “येतो मी, पोरी…” “थांबा…हे घेऊन जा..” एका पिशवीत वानोळा भरलेला असतो.. मामांना पुन्हा गलबलून आलं..मामांची बहीण सुदधा कधीच रिकाम्या हाताने पाठवायची नाही. वृषाली चा नवरा तारा च्या नवऱ्याला, म्हणजेच लहान भावाला फोन करतो.. “पाणीपट्टी भरलीये बरं का मी..” “बरं दादा..आता काय, लंच ब्रेक … Read more

रामराज्य (भाग 6) ©संजना इंगळे

करुणा तिच्या दोघी जावांना बोलावते, मनाली अन वृषाली ला… “तुमची धाकटी जाऊ, तारा… तिला या नवीन शहरात अगदी एकटं वाटतंय…ती सर्वात लहान आहे, लाडाची आहे…आपण मोठे आहोत…तिला एकटं वाटणार नाही, तिलाही या घराबद्दल, तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल असं वागा….तिच्या राहणीमानाबाबत काहीही बोलू नका..” दोघींना ते पटलं..इतक्यात छोटू शाळेतून येतो.. “मोठी आई..मम्मी..उद्या शाळेत parents मिटिंग आहे…तुम्हाला बोलावलं … Read more

रामराज्य (भाग 5) ©संजना इंगळे

आता छोटू ची शिकवणी सुरू झाली मनाली कडे.. मनाली आपला मुलगा समजून त्याला शिकवू लागली, समजावून देऊ लागली. छोटू आता जास्तीत जास्त वेळ मनाली कडे असायचा..”मोठी आई…मोठी आई” म्हणून घर दणाणून सोडायचा… मनाली त्याला आता अवघड विषय सोपे करून सांगत असे..वृषालीचा बराचसा ताण हलका झाला होता. सकाळच्या वेळी छोटू चं आवरून…छोटू ला शाळेत सोडून ती … Read more

रामराज्य (भाग 4) ©संजना इंगळे

घरात या तिघींच्या वाटा भिन्न पडल्या होत्या, एकीलाही एकत्र राहून साम्राज्य उभं करण्याची इच्छा नव्हती. लग्न जमवताना त्यांनी आनंदाने आम्हाला ‘एकत्र’ कुटुंब आवडेल असं सांगितलं होतं..पण आता परिस्थिती बदलली होती.करुणा च्या लक्षात आलं, की या तिघी आधुनिक मुली. यांना कुठलंही बंधन नको होतं. कसलाही त्याग नको होता. आपल्या परीने सर्वांना जगायचं होतं. तिने आधी सासरेबुवांची … Read more

रामराज्य (भाग 3) ©संजना इंगळे

“मनाली, वृषाली, तारा??? हे काय? तिघीजनी वेगवेगळं काय बनवताय??” “ताई हे रोजच आहे…एकाने प्रत्येकाला स्वयंपाक करणं म्हणजे किती अवघड आहे…रोज 7 जणांचं जेवण बनवावं लागतं… मग प्रत्येकजण आपापला स्वयंपाक करून डबा घेऊन निघून जातं…” ओ “आणि बाबा?” “सासूबाई होत्या तेव्हा त्या बनवून घ्यायच्या. पण आता..” “मी करून घेईल, तुम्हाला घाई होत असेल..निघा तुम्ही..” तिघींजनी आणि … Read more