चला शिकूया रांगोळी (भाग 1) बेसिक

Rangoli designs | rangoli design simple | easy rangoli designs | rangoli step by step

चला तर मग, आजपासून आपला प्रवास सुरू होणार आहे कलेच्या एका अनोख्या दालनात. सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात असू द्या, रांगोळी काढण्या आधी सर्व साहित्य जवळ असू द्या, आपल्याला रांगोळीचे रंग, चहाची प्लास्टिक ची गाळणी, एक खराब फडके लागेल. रांगोळी फरशीवर अथवा एखाद्या सपाट पृष्ठभागावर काढावी, प्लायवुड चे एखादे शीट असेल तर उत्तम. शिकण्यापूर्वी हे लक्षात असू द्या की अगदी पहिल्याच प्रयत्नात आपण तरबेज होऊच असे नाही, प्रयत्न चालू ठेवण्याची तयारी ठेवा…पण मला खात्री आहे की सुरवातीलाच तुम्ही उत्तम कराल. 

आज आपण जी रांगोळी शिकणार आहोत ती एकदम बेसिक आहे, म्हणजे पुढे आपल्याला ज्या मोठ्या सिनरी काढायच्या आहेत त्यासाठी हे बेसिक्स शिकणे महत्वाचे आहे, या नंतर आपण डायरेक्ट सिनरी काढायला घेऊ. 
आता मी जे साहित्य सांगते ते आधी गोळा करून आणा बरं..
1. हिरवा, पोपटी, पांढरा आणि पिवळा रंग
2. चहाची गाळणी (प्लॅस्टिकची)
3. खराब फडकं
4. अर्थात तुम्हीही लागणार 😉
कृती 1

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
सर्वप्रथम कुठल्याही रंगाने एक आयत आखून घ्या, छोटा अथवा मोठा, तुम्हाला जेवढी रांगोळी हवी असेल तितका काढा. त्याचे 3 समान भाग करा, पहिली रेष हिरव्या रंगाने आणि दुसरी पिवळ्या रंगाचे काढा.
कृती 2

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
आता खालच्या पट्ट्यात हिरवा रंग भरा. लक्षात ठेवा, गाळणी ने रंग देतांना गाळणी डाव्या उजव्या बाजूला हलवूनच रंग द्या, गाळणी उभी अथवा तिरपी अशी कशीही हलवून रंग भरू नका. 
कृती 3

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
Add caption

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
Add caption
आता तश्याच पद्धतीने वरच्या दोन्ही भागात अनुक्रमे पोपटी आणि पिवळा रंग द्या.
कृती 4
वरच्या चित्रात तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हिरवा,पोपटी आणि पिवळा असे 3 वेगवेगळे पट्टे दिसतील, आपल्याला तसं नको आहे, आपल्याला शेडिंग दाखवायची आहे, त्यासाठी हिरवा आणि पोपटी रंग एकत्र करा आणि खालील दोन पट्टे जिथे वेगळे दिसतात त्या पट्ट्यात हा रंग भरा.

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
हे बघा, आता इथे आपल्याला वेगवेगळे पट्टे दिसत नाहीयेत आणि शेडिंग झाली आहे. 
कृती 5
वरील पद्धतीनेच पिवळा आणि पोपटी रंग एकत्र करून वरील पट्ट्यांचा मधोमध द्या. 

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
Add caption

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
बघा, आता तीनही पट्टे गायब झालेत आणि सुंदर अशी शेडिंग तयार झाली आहे. आता यावर आपण आकृत्या काढु.
कृती 6 

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
Add caption
पिवळ्या रंगाने गवताच्या तिरप्या लाईन काढा, या उभ्या काढू नका, हात पटापट चालवा म्हणजे लाईन एकसंध येईल. अगदी दाट असे गवत काढा.
कृती 7
आता आपल्याला हव्या त्या रंगाने 3 पाकळ्यांची फुलं काढुया, मी पांढरा रंग वापरलाय…

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
कृती 8
आता यावर आपण आपल्याला हवे ते काढू शकतो, 

how to draw a rangoli, easy rangoli, rangoli designs for diwali, rangoli designs 2020
पुढील मोठ्या सिनरी काढण्यासाठी इतकं येणं महत्वाचं आहे,त्यामुळे ही रांगोळी साधी असली तरी पुढील दृष्टीने महत्वाची आहे.
पुढच्या ब्लॉग मध्ये आपण एक सुंदर अशी सिनरी काढायला घेऊ.
तुम्ही वरील रांगोळी try केली की मला कंमेंटमध्ये फोटो नक्की पाठवा, महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्री ला ही रांगोळी यावी अशी माझी इच्छा आहे, म्हणून हा लेख जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचवा..शेयर करा..
पुढील रांगोळी ची वाट बघताय ना? मला फॉलो करा म्हणजे मी लवकर तूमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि हो, खाली ❤ बटण आहे ते क्लिक करायला विसरू नका 😉😉😉

902 thoughts on “चला शिकूया रांगोळी (भाग 1) बेसिक”