देवदूत -1

दोघांचं नवीनच लग्न झालं होतं, एका लहानशा देवळात, ओळखीतले चार नातेवाईक आणि तिचे आई वडील.. लग्न कसलं ते, तडजोड होती. तिला 3 वर्षाचा एक मुलगा, आणि तो अविवाहित. लग्न करून ती आणि तिचा मुलगा त्याच्या घरी गेले. त्याने घर दाखवलं… बेडरूममध्ये तिने आपल्या मुलाला झोपवलं, पण पुढे काय होणार म्हणून तिला धास्ती वाटायला लागली. जीवनात … Read more

आशा

  आशा एक सुसंस्कृत गृहिणी होती, घरकाम आणि घरच्यांची सेवा यापलीकडे तिचं जगच नव्हतं. आशा पूर्वी अशी नव्हती, अतिशय शिस्तबद्ध आणि जशास तसे उत्तर देणारी, पण सासरी मर्यादेत राहावं म्हणून तिने तिच्या स्वभावाला आवर घातला होता.  दोघांमध्ये या ना त्या कारणाने खटके उडू लागले, नवऱ्याला तिच्या प्रत्येक गोष्टीत चूक काढून तिला बोल लावायला मिजास वाटायची, … Read more

Truth of life

  Suvarna, who was in a coma for almost a year, regained consciousness today. The family had given up hope, but today the doctor suddenly called and all the relatives gathered at the hospital. Son Sudhir, mother-in-law, husband Subhanrao and some of her own family members were all watching her with tears in their eyes. … Read more

दैवलेख (भाग 15)

 #दैवलेख (भाग 15) सईने लग्नाची बातमी देवांगच्या घरी येऊन सांगितली, पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. सई एकटी तेवढी उसळ्या मारत होती. देवांग आता कचाट्यात सापडला, सईला लग्नाचं वचन देऊन ठेवलेलं आणि इकडे साखरपुडा वैदेहीसोबत केलेला. सईने बातमी दिली, देवांगकडे पाहिलं.. आणि म्हणाली, “काय रे ही मुलगी कोण?” देवांग मौन राहिला, देवांगच्या आईने ठसक्यात सांगितलं.. “देवांगची … Read more

दैवलेख (भाग 14)

 #दैवलेख (भाग 14) देवांगने वैदेहीचा साखरपुडा मोडला, तत्क्षणी तो तिच्याशी साखरपुडा करायला तयार झाला. आजूबाजूला असलेली माणसं सगळं बघत होती, कुजबुजत होती. वैदेहीच्या आईने डोळे पुसले..तिने देवांगचा हात धरून वैदेहीसमोर आणलं आणि म्हणाली, “तुझं मत बदलायच्या आत घाल तिला अंगठी..” देवांगने क्षणाचाही विचार न करता तिला अंगठी घातली. गुरुजींनी इतर विधी पूर्ण केले आणि वैदेही … Read more

आंघोळी आणि ती

  “अंघोळा करा ना रे पटापट, मशीन लावायचं आहे, 10 वाजून गेले, कपडे धुणार केव्हा वाळणार केव्हा?” सुट्टीच्या दिवशी घरोघरी ऐकू येत असलेलं वाक्य. मीनाच्या घरीही तेच. आज रविवार, एक 9 ला उठलं, एक 10 ला..घरातल्या चार मेम्बर साठी चारवेळा चहा झाला. चहाच्या पातेल्याने पार जीव सोडला होता. सुट्टीच्या दिवशी उशिराने अंघोळ करण्याची मजा आईला … Read more

Show must go on

  जवळपास वर्षभर कोमात असलेली सुवर्णा आज शुद्धीवर आली होती. घरच्यांनी तर आशा सोडूनच दिलेली, पण आज डॉक्टरांनी अचानक फोन केला आणि सर्व नातेवाईक दवाखान्यात जमा झाले.  मुलगा सुधीर, सासू, नवरा सुभानराव आणि माहेरची काही मंडळी, सर्वजण तिला डोळे भरून पहात होती. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर सुवर्णाला घरच्यांनी घरी नेलं.  आपण गेले वर्षभर कोमात होतो या … Read more

दैवलेख (भाग 13)

 दैवलेख (भाग 13) वैदेहीला साखरपुड्यात बघून देवांगला धक्का बसतो. खरं तर काही कारण नव्हतं एवढं बैचेन होण्याचं. दोघांचं ना लग्न ठरलेलं असतं ना दोघांमध्ये काही संवाद असतो, तरीही देवांगची अनामिक असुरक्षितता जागी होते. त्याचं मन थाऱ्यावर राहत नाही. तो आई बाबांना शोधतो, धाप टाकत त्यांच्याजवळ जातो. “आई, बाबा.. वैदेही..” आई बाबांना समजत नाही हा नक्की … Read more

तो एक मोहाचा क्षण

 एक क्षण मोहाचा हॉस्पिटलमध्ये बहिणीला बघून बेडवर असलेल्या सुमितने मान वळवली, बहिणीचे अश्रू थांबत नव्हते. अपराधीपणाचं ओझं तिच्या मनावर अजूनच दाट झालं. आई पलंगाशेजारी बसून तिच्याकडे बघत होती. दोन्ही मुलांचं आयुष्य बरखास्त झालेलं बघून ती आई कोरडी झाली होती. मुलाला धीर द्यावा की सुमतीच्या अपराधीपणाचं ओझं कमी करावं तिलाच कळत नव्हतं. त्याची बायको सुन्नपणे फक्त … Read more

दैवलेख (भाग 12)

 #दैवलेख (भाग 12) वैदेहीने परत एक तयारी केली, तडजोड करण्याची. पण एरवी एक समाधान असे, हेही दिवस जातील म्हणत ती सामोरं जायची. पण आता आयुष्यभराची तडजोड, रजत सोबत. नाईलाज असला तरी ती आशावादी होती. रजतला आपण बदलू, प्रेम करण्यालायक माणूस बनवू असा विचार तिने केला.  विचार करत असतांनाच वैदेहीची आई तिच्याजवळ आली, “वैदेही, बाळा…तुझा होकार … Read more

एक ट्रिप-मोबाईल विना

 फिरायला जाऊयात म्हणून बायकोने सतत तगादा लावलेला, नवऱ्याने होकार देताच ती खुश झाली.  आपल्या बेडरूममध्ये गेली, छानपैकी कपडे अंगावर चढवले, तासभर मेकप केला, चांगली दिसतेय याची खात्री झाल्यावर बाहेर आली,  “अहो आवरलं नाही अजून? आवरा पटकन..” नवऱ्याने तिच्यासमोरच दोरीवरची वाळत घातलेली जीन्स आणि शर्ट काढला आणि जागीच बदलला, खिशातून छोटा कंगवा काढत केस विंचरले आणि … Read more

दैवलेख (भाग 11)

 दैवलेख (भाग 11) “हॅलो मी रजत पवार..” रजत शेकहॅन्ड साठी हात पुढे करतो, वैदेही ईच्छा नसतानाही शेकहॅन्ड देते. रजत बराच वेळ तिचा हात सोडत नाही, ती कसाबसा आपला हात सोडवून घेते. पुढे तोच म्हणतो, “माझ्याशी लग्न झाल्यावर जॉब वगैरे दे सोडून, माझ्याच कंपनीत मोठ्या पदावर बसवेन तुला” “माफ करा पण असं आयतं यश मला पटणार … Read more

मनस्थिती आईची…मुलाच्या शाळेचा पहिला दिवस असणाऱ्या सर्व आयांना समर्पित

आज कितीतरी वर्षांनी ती आरशासमोर खुर्ची टाकून बसली, स्वतःला एकदा न्याहाळत.. आज चक्क 5-6 पांढरे झालेले केस तिला जाणवले, डोळ्यांभोवती थकवा स्पष्ट जाणवू लागला, चेहऱ्याची त्वचा तर एकदम निस्तेज झाली होती.. तिने कंगवा डोक्यातुन फिरवला, अलगदपणे.. एरवी असं निवांत केस कुठे विंचरता येत होते, सकाळी नवऱ्याच्या डब्याची धावपळ, घरातली कामं, त्यात मुलांची अंघोळ, नाष्टा.. कंगवा … Read more

दैवलेख (भाग 10)

दैवलेख (भाग 10) रजत पवार.. देवांग जगात एकमेव कुणाचा द्वेष करत असेल तर तो होता रजत.. (8 वर्षांपूर्वी) कॉलेज सोडून देवांगने नुकत्याच नोकरीच्या शोधात बाहेर मुलाखती देण्यास सुरुवात केल्या होत्या. एका मोठ्या इव्हेंट कंपनी कडून त्याला मूलखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. ही कंपनी मोठमोठ्या कंपन्यांचे इव्हेंट्स मॅनेज करत असे. त्यात क्रिएटिव्ह गोष्टी आणण्यासाठी त्यांना एक ग्राफिक … Read more

स्थळ, होकार आणि मध्यस्थी

रीना अगदी रडकुंडीला आली होती. तिच्यासाठी स्थळं बघणं सुरू होतं, जवळपास 9-10 स्थळं बघून झालेली, त्यात तिला काही मुलं पटेनात, काहींनी तर तिलाच नकार दिलेला. तिच्या काका, मामा, आत्या, मावशी सर्वांनी किमान एक स्थळ तरी दाखवलं होतं, पण तिची मात्र बऱ्याचदा नकारघंटा असायची. यावेळेस आत्या मात्र चिडली, “तुला काय आता रणबीर कपूर हवाय का? इतकी … Read more

पेन्शन

“ताई सर्वांनी धुण्या भांड्याचे शंभर रुपये वाढवलेत, तुम्हीही वाढवा की..” रमा अगतिक होऊन पंडित बाईंना विनंती करत होती. गेले 20 वर्षे रमा पंडित बाईंकडे प्रामाणिकपणे काम करत होती. तिला दुसरा पर्यायही नव्हता, नवरा मजुरी करून पगार आणायचा, त्यात दोन मुलं. संसार चालवायचा म्हणून हाताला येईल ते काम ती करत होती. गावाकडची जमीन तिच्या सासऱ्यांनी परस्पर … Read more

आईचा हस्तक्षेप…

“आपल्या संसारात तुझ्या आईचा हस्तक्षेप बंद झाला नाही तर माझ्याहून वाईट कुणीच नाही, लक्षात ठेव” नीरज आज जास्तच घुश्यात होता त्यात बायकोला आईशी फोनवर बोलताना पाहून त्याचं आणखीनच सटकलं. पण मीराही साधीसुधी नव्हती, तिनेही त्याच आवाजात विचारलं, “काय हस्तक्षेप केला हो माझ्या आईने, येऊन जाऊन माझ्या आईवर का लादताय सगळं?” “देव जाणे तुझी आई तुला … Read more

आयजीच्या जीवावर बायजी उदार

रमाला उत्तम स्वयंपाक येत असे, काहीही सांगा..तिखटातले प्रकार असोत वा गोड पदार्थ, अगदी सहजपणे तिला बनवता येई. आणि चव म्हणजे, अहाहा…माहेरी होती तेव्हा आई बाबा कौतुक करून करून अर्धे होत, पण सासरी मात्र..”तेवढं तर यायलाच हवं” असं म्हणत तिचे गुण मान्य करत नसत. पण फर्माईश मात्र अगदी पंचपक्वानाची.. “रमा आज खिचडीच बनव, पण सोबत छानपैकी … Read more

दैवलेख (भाग 9)

#दैवलेख (भाग 9) देवांगचं मन हलकं झालं, वैदेहीला त्याने खरं काय ते सांगून टाकलं होतं.. पण ती जेव्हा म्हणाली की ‘काळजी करू नकोस, तुझं लग्न तुझ्या मैत्रिणीशीच होईल’ तेव्हा का कोण जाणे एक वेगळीच कळ देवांगच्या हृदयात उठली. दोघेही घरात आले, घरी आई बाबा तर दोघांची वाटच बघत होते. तेवढ्यात वैदेहीच्या आईला तिच्या ननंदेचा फोन … Read more

दैवलेख (भाग 8)

दैवलेख (भाग 8) मुलगी पाहायला येणार..पण ती वैदेही म्हणजे तीच ट्रेन मध्ये भेटलेली मुलगी असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. वैदेहीला समोर बघताच तो स्तब्ध होतो. ऐन वैशाखात अंगावर पाण्याचा थंडगार शिडकावा पडावा असाच काहीसा भास त्याला झाला. त्याच्या मनात सुप्तपणे दडलेली ती, चित्रातून सतत डोकावू पाहत होती..ती आज समोर आली..!! “अरे तू..?” वैदेहीला आठवतं, … Read more