मनस्थिती आईची…मुलाच्या शाळेचा पहिला दिवस असणाऱ्या सर्व आयांना समर्पित
आज कितीतरी वर्षांनी ती आरशासमोर खुर्ची टाकून बसली, स्वतःला एकदा न्याहाळत.. आज चक्क 5-6 पांढरे झालेले केस तिला जाणवले, डोळ्यांभोवती थकवा स्पष्ट जाणवू लागला, चेहऱ्याची त्वचा तर एकदम निस्तेज झाली होती.. तिने कंगवा डोक्यातुन फिरवला, अलगदपणे.. एरवी असं निवांत केस कुठे विंचरता येत होते, सकाळी नवऱ्याच्या डब्याची धावपळ, घरातली कामं, त्यात मुलांची अंघोळ, नाष्टा.. कंगवा … Read more