धुरा (भाग 1) ©संजना इंगळे

 
political story, marathi political story, must read marathi story,

“डॅड मी तुला आधीच सांगितलं होतं की मला इंडियात बोलवायचं नाही, मला माहित आहे तू मला तिथे आल्यावर कशात घालणार आहेस ते…”

“पोरी भेटायला ये गं फक्त…मी तुला कुठे म्हणतोय की इथल्या राजकारणात भाग घे म्हणून? तुला राजकारणाचा तिटकारा म्हणून मी आधीच तुला लांब ठेवलं होतं…तू हट्ट केला म्हणून लंडन ला पाठवलं, पण म्हणून बापाला भेटायलाही येणार नाहीस?”

“डॅड, मला अजिबात भरोसा नाही…तिथे आल्यावर मला इमोशनल ब्लॅकमेल कराल… आणि व्हिडिओतून बोलतोच ना डॅड आपण रोज..कशाला भेटायला हवंय??”

तेजु अन तिच्या वडिलांचं हे रोजचंच बोलणं…तेजु ला आता वैताग आलेला…आधी तरी दुसऱ्या विषयांवर बोलणं व्हायचं पण इतक्यात तिच्या वडिलांचं भेटायला ये म्हणून सारखं तुणतुनं सुरू झालं… तेजु ला शंका येऊ लागली की तिला राजकारणात सामील करून घ्यायला सर्वांचं इतकं चाललंय…. आणि म्हणून तिने भारतात येण्यास साफ नकार दिला….

तेजु लंडन मध्ये शिक्षणासाठी गेली अन तिथेच नोकरीला सुरवात केली…तिला काहीही झालं तरी भारत नको होता…इथली व्यवस्था, इथलं राजकारण तिच्या डोक्यात जात होतं… त्यामुळे तिने आता लंडन मधेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला…जेव्हाही तिला घरून फोन येई तेव्हा तेव्हा तिच्या डोक्यात तिडीक जाई….आणि डोकं हलकं करायला मित्र मैत्रिणींना एक फोन केला की सर्वजण एका हाकेत बार मध्ये हजर होत…

एकदा तेजु ला या सर्वाचा वीट आला, अन एक दिवस तिने घरून फोन उचललाच नाही…वैताग आला होता तिला…..तिने स्वतःचा फोन बंद करून ठेऊन दिला..श्रिया, जॉन, राकेश अन लारा ला फोन करून बार मध्ये बोलावलं…
वैतागलेल्या तेजुने आज जरा जास्तच घेतली…त्यांचा कार्यक्रम आटोपला आणि पाचही जण रस्त्याने चालत जायला लागले…. रात्र बरीच झाली होती, driving ला मनाई असल्याने जवळच असलेल्या त्यांच्या रूम वर ते पायी जात होते… बियर जास्त झाल्याने सर्वजण झिंगतच चालत होते…त्यांच्या बोलण्याला आज लागमच राहिलं नव्हतं…
तेजुला आज ड्रिंक्स घ्यायचा का मूड झाला हे त्यांना समजलं होतं..

“हेय तेजु, आज इंडियात राहिली असतीस तर काय केलं असतं तू??”

“मी सांगतो..एक टिपिकल साडी घालून, दोन्ही हात जोडून आणि गळा फोडत मॅडम म्हटल्या असत्या…माझ्या प्रिय बंधू अन भगिनींनो…”

“stop it guys…don’t do this…I will die by laughing…”

“Hey teju…just imagine, you are in that bloody white saree…and giving speeches on the roads…”

तेजु चं मन हलकं करण्यासाठी सर्वजण तिची खिल्ली उडवत होते, तेजु राजकारण असती तर काय केलं असतं, ती कशी दिसली असती, काय बोलली असती हे सर्वजण नानाविध कल्पना रंगवून हसत खिदळत रस्त्याने जात होते….

त्यांच्या हसण्याच्या नादात समोरून एक गाडी आली आणि गाडीने कचकन ब्रेक दाबला…ब्रेक चा आवाज आला अन सर्वजण भानावर आले…

तेजुचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं. कसंबसं स्वतःला दोन पायावर उभं ठेवण्याचा प्रयत्न करून ती सॉरी सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत होती…

गाडीतून एक भारतीय माणूस बाहेर आला…त्याने तेजुला ओळखलं आणि तो प्रचंड आश्चर्याने तेजु कडे पाहू लागला…

“नाही, ही नाईकांची मुलगी नाही…खरंच ती असती तर इथे का दिसली असती…”

असं म्हणत तो आपल्या गाडीत बसू लागला…इतक्यात श्रिया ने तेजु ला आवाज दिला..

“ओ मिस तेजस्विनी नाईक….तिकडे कुठे चाललात… इकडून जायचंय..”

गाडीतला माणूस आता तावातावाने तेजुपाशी आला…त्याला खात्री पटली की ही तीच….

“मिस तेजस्विनी नाईक?…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. नाईक यांची कन्या???”

“यानेही ओळखलं…ओह सेलिब्रिटी….” राकेश अर्धे डोळे मिचकावत बोलू लागला….

तेजु परत त्या माणसासमोर आली..

“YeSsssss… मी…मीच ती श्र…श्र….श्री नाईकांची…”

“कै. नाईक….”

“काय??? काय बोललात?”

“आता त्यांच्या नावाआधी श्री नाही, कै. लागलंय…”

तेजु चा नशा एक सेकंदात उतरतो, तिच्या नसानसात रक्त उसळू लागतं…. छातीतली धडधड जोराने होऊ लागते…पूर्ण अंग घामाने चिंब होतं…ती त्या माणसाच्या खांद्याला पकडून म्हणते…

“काय बोलताय भान आहे का? श्रिया….आपण जास्त घेतली का गं? मला काहीबाही ऐकू येतय…”

श्रिया आणि राकेश धावत तिथे येतात, त्यांना परिस्थिती चं गांभीर्य समजतं… लारा आणि जॉन ला समजत नाही काय चाललंय ते…ते हळूच राकेश ला विचारतात..

“What happened man?”

“Teju’s dad is no more…”

तेजु ला ते ऐकू जातं आणि रागारागाने ती राकेश ला बोलते…

“राकेश…तोंड सांभाळून बोल….काहितरी अभद्र बोलू नकोस…काही झालं नाही माझ्या डॅड ला…काही झालं नाही…”

असं म्हणत तेजु आपल्या खोलीकडे पळत सुटते…तिच्या मागोमाग हे चौघे जातात…

तेजु आपला फोन शोधते… स्विच ऑफ केलेला फोन तिला थरथरत्या हातानी चालूही करता येईना…दोन वेळा हातातून फोन पडला…लारा ने तो हातात घेऊन चालू करून दिला…

“89 missed calls from mom…67 messages…”

तेजु तोंडाला हात लावून रडते…

फेसबुक, व्हाट्सअप्प स्टेटस, ट्विटर सगळीकडे श्री. नाईक यांना श्रद्धांजली च्या पोस्ट दिसतात…तेजु खाली कोसळते आणि एकच हंबरडा फोडते…

“डॅड……”

क्रमशः

 
 

1 thought on “धुरा (भाग 1) ©संजना इंगळे”

Leave a Comment