The mirror (द मिरर) – भाग 4 ©संजना इंगळे

भाग 3
https://www.irablogging.in/2020/04/the-mirror-3.html

पटनाईक आता पुरते धास्तावतात. पलाश च्या कथेतील अक्षय सोबत एका पोलिसाचेही पात्र असते आणि त्यांच्या बाबतीतही सगळं तसंच घडत असतं.

पण पटनाईक आता मनाशी ठरवतात, काहीही झालं तरी मी स्वतः ही केस सोडवणार…कारण कथेत लिहिल्याप्रमाणे सगळं घडणं हे आपोआप नक्कीच नाही, त्यात कुना मानवाचा हस्तक्षेप आहे. आणि मी तो शोधून काढणारच.

पटनाईक पुन्हा ते पुस्तक उघडतात..पुढे लिहिलेलं असतं..

“अक्षय आता पोलिसांची भेट घेतो. पोलीस त्याच्या घरच्यांची चौकशी करतात. आई वडील अतिशय साधे, काका आणि त्यांचा मुलगा आकाश नाईलाजाने त्यांच्या घरी राहत होते, घरातला नोकर बंडू अत्यन्त प्रामाणिक. पोलीस घरी जाऊन सर्वांची चौकशी करतात आणि एकेकाची जबानी लिहून घेतात. अक्षय ला लिखानाचं व्यसन लागलेलं असतं. या सगळ्यात कावेरी त्याला सोडून जाते म्हणून त्या दुःखात तो अजून काव्य रचत असतो. अक्षय ला आता समजलेलं असतं की आपण लिहिलेलं सगळं खरं होतं. इथेच त्याची मती खुंटते, चांगलं काही लिहण्यापेक्षा आपल्याला आयुष्यात ज्यांनी ज्यांनी त्रास दिला आहे त्यांचं आयुष्य रसातळाला कसं जातं हे अक्षय लिहतो आणि तसंच होत जातं..”

पटनाईक पुस्तक बंद करतात, पलाश कडे जातात आणि त्याच्या घरच्यांची चौकशी करतात. आई वडील अतिशय साधे आणि सरळ.पण काका आणि त्यांचा मुलगा आकाश यांच्या डोळ्यात एक ईर्षा दिसत होती. आई घरातल्या नोकराला एकेक ऑर्डर देत होती आणि बंडू एका हाकेवर अगदी यंत्रवत सगळं काम करत होता. एकही शब्द पडू देत नव्हता.

सर्वांची चौकशी झाल्यावर पटनाईक पलाशशी एकट्यात बोलतात.

“मिस्टर पलाश..तुमच्या कथेतील पात्र अक्षय हा त्याच्या आयुष्यातील त्याला त्रास दिलेल्या माणसांबद्दल चुकीचं लिहतो आणि त्यांच्या बाबतीत तसं होत जातं..मग तुमच्या बाबतीतही तसं होईल?”

“ज्याची भीती होती तेच तुम्ही विचारलं सर…होय, अक्षय ला ज्यांनी त्रास दिला होता ती माणसं म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यातील माणसं.. नावं बदलून आणि काल्पनिक म्हणून अश्या माणसांचा उल्लेख मी केलेला. पण प्रत्यक्षात ही माणसं खरी आहेत…माझ्याच आयुष्यातील..”

“सुरवात कुणापासून आहेत सांगू शकाल?”

“राजेश..”

“राजेश? कावेरी चा होणारा नवरा..”

“काय होतं त्याच्या बाबतीत?”

“एका चोरीच्या केस मध्ये तो अडकतो…लग्न मोडतं…”

“आपल्याला राजेश ला गाठावं लागेल..”

पलाश चे पाय काही हलत नाहीत..

“मिस्टर पलाश? हे खरं व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं?”

पलाश वरमतो..पटनाईक सोबत राजेश कडे जातो..
राजेश च्या घरी जाताच घरचे धास्तावतात..

“साहेब…आमच्या राजेश ला सोडून द्या हो..त्याने काहीही केलं नाही..”

“म्हणजे?”

“तुम्हीच त्याला घेऊन गेलेलात ना चोरीच्या आरोपाखाली??”

पटनाईक हॉल मध्ये लावलेल्या त्याच्या फोटो कडे बघतात आणि त्यांना आठवतं की कालच या माणसाला चोरीच्या आरोपाखाली पकडून नेलं होतं.

“आम्हाला माहीत आहे तुमचा मुलगा निर्दोष आहे, आम्ही त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, हेच सांगायला आलेलो..”

पटनाईक आणि पलाश तिथून निघतात, गाडीत बसतात…पटनाईक रागाने पलाश कडे बघत असतात…

“सर…मला तरी कुठे माहीत होतं की हे खरं होणार आहे ते..”

“सानिकाचा जीव गेला…हा मुलगा चोरीच्या आरोपाखाली अडकला…अजून काय काय पहायला मिळणार आहे?”

पलाश गंभीर झालेला पाहून पटनाईक जरा नरमतात..

“आपण यावर मार्ग काढू…घाबरू नकोस..”

“साहेब…मला एकच भीती आहे..पुस्तकाचा शेवट खरा व्हायला नको..”

“काय आहे पुस्तकाचा शेवट?”

“अक्षय पोलिसाचा खून करतो..”

पटनाईक कचकन ब्रेक दाबतात आणि पलाश कडे पाहतात…

“काय कारण? अक्षय आणि पोलिसाचं काय बिनसतं?”

“कावेरी..”

“काय संबंध?”

“कावेरी…माझी मैत्रीण.. अक्षय च्या मैत्रिणीलाही मी हेच नाव दिलं..”

“मग?”

“पोलीस आणि कावेरी मध्ये काहीतरी चालू आहे याची अक्षय ला शंका येते आणि..”

“चला…हे तरी शक्य होणार नाही म्हणजे आपल्या बाबतीत… तुझी कोण ती कावेरी..मी पाहिलेलं ही नाही तिला..”

पलाश ला घरी सोडून पटनाईक पोलीस स्टेशन ला जातात… गेल्या गेल्या तिथे एक ज्येष्ठ व्यक्ती घाबरलेला बसलेला दिसतो..

“काय तक्रार आहे तुमची?”

“साहेब..आमच्या घराला धोका आहे..काही दिवसांपासून घराभोवती एक माणूस घिरट्या घालतोय..त्याच्या हातात शस्त्र आहे…काल माझा मुलगा बाहेर निघाला तर त्याने त्याच्या पाठीवर वार केलेत..मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे साहेब… तुम्ही काहीतरी करा..आम्हाला प्रोटेक्शन द्या…मी कसाबसा इथपर्यंत आलो आहे..”

पलाशच्या प्रकरणापासून पटनाईकांना दूर जायचं होतं..

“ठीक आहे, मी स्वतः तुमच्या घरी प्रोटेक्शन दयायला येईन..”

पटनाईक त्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी पहारा देत असतो. घरातून ओरडण्याचा आवाज येतो तसं पटनाईक आत शिरतात, त्या माणसाची मुलगी खूप घाबरलेली असते..पटनाईक तिला धीर देतात आणि तिच्या खोलीच्या बाहेरच आहे असं तिला आश्वासन देत तिथेच रात्र काढतात.

पलाश ला काय करावं समजत नव्हतं, आधी असं काही झालं की तो आधी कावेरीजवळ मन मोकळं करायचा..आता त्याला कावेरी ची आठवण खुप त्रास देऊ लागली आणि सकाळी सकाळी तो कावेरी च्या घरी गेला. तिच्या वडिलांनी सांगितलं की कावेरी खोलीत आहे..

तो खोलीकडे जातो अन पाहतो तर काय, पटनाईक तिच्या खोलीतून बाहेर येतात.डोळे लाल झालेले असतात..

पलाश कावेरी कडे बघतो..

“मिस्टर पलाश? तुम्ही इथे?”

“तुम्ही इथे कसे?”

“मी रात्रभर इथेच होतो..”

पलाश च्या मनात शंका निर्माण होते…कावेरी सुद्धा त्याला तेच सांगते की पटनाईक रात्रभर तिथेच होते..

“मिस्टर पलाश…यांच्या घराच्या सुरक्षिततेचि जबाबदारी माझ्यावर होती, मी इथे पहारा देत होतो..”

“विश्वास बसत नाही साहेब… पोलिसांची इतकी फौज असताना तुम्ही इथे यावं??”

आता पलाश ला कस सांगणार की त्याच्या केसपाऊन दूर जाण्यासाठी पटनाईक स्वतः या गोष्टीत लक्ष घालत होते ते..

क्रमशः

Leave a Comment