मागील भाग
https://www.irablogging.in/2020/04/the-mirror-1.html
https://www.irablogging.in/2020/04/the-mirror-2.html
त्या बेशुद्ध झालेल्या मुलाला उचलून सर्वजण खुर्चीवर बसवतात…पलाश जागेवरून उठत नाही..पटनाईकांना खरं तर राग येतो..ते पलाश कडे येतात..
“अश्या नाजूक वेळी तरी स्वतःचा अहंकार सोडावा..”
“ते मागच्या टेबल वर बसले आहेत ना, ते डॉक्टर आहेत…त्यांचं फोनवर बोलून झालं की ते जातील त्या मुलाजवळ…”
“तुला कसं माहीत?”
पलाश पटनाईकांकडे विचित्र नजरेने बघतो..पटनाईकांना समजतं… की हे सगळं लिहिलेलं आहे…
“पटनाईक साहेब…म्हणून मी नाही म्हणत होतो हॉटेलमध्ये यायला..”
“Wait..मी doctor आहे…let me check..”
पलाश च्या मागच्या टेबल वर बसलेला माणूस उठतो आणि मुलाजवळ जातो..पोलीस पलाश कडेच बघत असतात…
पटनाईकांना आता काय करावं समजत नाही..ते वैतागून पलाश ला विचारतात..
“असं काय काय लिहिलं आहे तुमच्या पुस्तकात?”
“बरीच पात्र आहेत…तुम्ही त्यातलेच एक…आता जसं लिहिलंय तसंच तुमच्या बाबतीतही घडणार..”
“शक्य नाही…माझं आयुष्य दुसऱ्या कुणाच्यातरी म्हणण्यावर चालणार नाही..”
“नाईलाज आहे..”
“मिस्टर पलाश…मला शंका आहे की हे सगळं तुम्हीच तर करत नाहीये ना??”
“तसं असतं तर मी तुमच्याकडे आलोच नसतो..”
नंतर दोघेही कितितरी वेळ शांत बसून असतात…
घरी गेल्यावर पटनाईक विचार करत असतात…
“ही तर सुरवात आहे…पुढे आता माझ्या बाबतीत काय होणार हे आता पुस्तक ठरवणार? कुठे अडकलो मी…कसा शोध लावणार आता…”
पटनाईक रात्रभर विचार करतात..सकाळी सकाळी पलाश ला फोन लावतात. त्याला घरी बोलवतात..
पलाश पटनाईकांच्या घरी जातो. पटनाईक टेबलपाशी बसलेले असतात, टेबलवर कागदांचा खच…पटनाईक काहितरी प्लॅन करण्यात गुंग असतात..पलाश आला हे त्यांना समजतही नाही..
“सर..”
पलाश ने आवाज दिला तसं पटनाईक दचकले..
“ये बस…”
“काही सुगावा लागला सर?”
“सुगावा तेव्हा लागेल जेव्हा केस नीट समजेल..”
“म्हणजे?”
“मला एक कळत नाही…तू एक लेखक, तू जे पुस्तक लिहिलं आहे त्यातला नायकही लेखक…आणि तो नायकही एक पुस्तक लिहतोय…ज्यात तो एका लेखकाचं चरित्र लिहतोय…हे सगळं confusing आहे…लेखक लेखकाला लिहतोय…पण ही साखळी कुठपर्यंत आहे??? काहीच समजत नाहीये..”
पलाश एक दीर्घ श्वास घेतो…खोलीतल्या एका जागेतून आरसा काढून आणतो आणि ड्रेसिंग टेबल च्या आरशासमोर धरतो…
“काय दिसतंय सर?”
“मिरर..”
“मिरर मध्ये??”
“मिरर मध्येही मिरर..”
“आणि त्या मिरर मध्ये?”
“म्हणायचं काय आहे तुम्हाला?”
“ही केस अशीच आहे…एकाचे अनेक प्रतिबिंब तुम्हाला दिसत जातील…अगदी अगणित…तुम्हाला त्याची खोली मोजता येणार नाही .”
पटनाईक जवळ येतात….आणि पलाश च्या हातातून आरसा घेऊन बाजूला ठेऊन देतात…
“आता दिसतंय काही?”
“नाही..”
“मुख्य नायक जर बाजूला करता आला तर सगळी प्रतिबिंब क्षणात नाहीशी होतात. ही केस अशीच सोडवावी लागेल..”
दोघेही टेबलापाशी येऊन बसतात..
“तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुस्तकातल्या अक्षय सोबत जे होतंय तेच तुमच्या बाबतीत होतंय, बरोबर?”
“होय..”
“आज आपण पूर्ण पुस्तकाचा आढावा घेऊ…तर…पुढच्या पराग्राफ मध्ये लिहिलं आहे की….अक्षयला हे सगळं विचित्र वाटतं, आपल्या दैवी शक्तीचा वापर असाही होत असेल याची अक्षय ला कल्पना नव्हती, तो पोलिसांना भेटतो, पण लिहिलेलं सगळं खरं होत जातं आणि कुणीही काहीही करू शकत नाही..”
“म्हणजे आता अक्षय च्या कथेत कुणीही काहिही करू शकलं नाही आणि जे व्हायचं ते होऊन गेलं..”
कथेतल्या नायकाचं लिखाण पूर्ण होतं. आणि त्याला त्या लिखाणातील एकेक गोष्ट खरी झाल्याचा अनुभव येऊ लागतो…पुढच्या सर्व गोष्टी पलाश सोबत घडलेल्या असतातच…
तो हॉटेल मधला मुलगा बेशुद्ध होतो इथवर वाचून झालेलं, पुढचं वाचायला पटनाईकांचे हात थरथरत होते…
पुढे लिहिलेलं असतं…
“हॉटेल मधल्या संवादानंतर पोलीस धास्ती घेतात…अक्षय ला ते घरी बोलवतात…आणि दोघांत चर्चा होते…दोघेही अक्षय ने लिहिलेल्या कथेचा आढावा घेतात..”
क्रमशः