जोडीदार

 अरविंद अन त्याच्या बायकोचा वाद आता लग्न तोडण्याच्या निर्णयापर्यंत आलेला. अरविंदची बायको तापट स्वभावाची, चुकीचं काही सहनच होत नसे तिला. पण अगदी साफ मनाची, स्पष्ट बोलून ती मोकळी व्हायची. पण हा स्वभाव जुनाट विचारांच्या घरी तरी कसा मानवणार? रोज नवीन कटकट, नवीन वाद. एखाद्या कामात चार जणांचे हात लागले की एकमेकांना दुसऱ्याचं पटेना. अरविंद ची … Read more

एक विनंती.. सर्व पुरुषांना

 नात्यातील जवळच्या माणसाने अचानक जग सोडलं अन मृत्यू किती भयानक असतो याची पुन्हा एकदा जाणीव झाली. तो आक्रोश, ते अश्रू, ते दुःखं.. सांत्वनापलीकडचं होतं. एकवेळ वृद्धापकाळाने आलेल्या मरणाला माणूस सज्ज असतो पण अकाली मरण म्हणजे कधीही न भरून काढता येणारी पोकळी. नुसत्या बातमीनेच कापरं भरलं होतं, माझीच अवस्था अशी असताना त्यांच्या बायका मुलांची काय झाली … Read more

दुनिया गोल है

 “अमित अरे येतोय ना घरी? जेवायची वाट बघतोय आम्ही..” “अगं थांब बॉस च्या परवानगी साठी थांबलोय, मिटिंग मध्ये आहे तो..” “अरे देवा..अजून परवानगी मागायची बाकिये??” “हो..हवं तर तुम्ही जेऊन घ्या.” “नको, आम्ही वाट बघतो.. “ “बरं..” अमितच्या घरी आज पुरणपोळीचं जेवण होतं. संक्रांतीची सुट्टी कंपनीने काही दिली नव्हती, डबा न नेता दुपारी जेवायला घरीच जायचं … Read more

भाकित (भाग 4) ©संजना इंगळे

सारंगचे मित्र अवाक होतात, “भविष्याचं भाकित??” “होय..” “अरे कसं शक्य आहे हे??” “का शक्य नाही??” “भविष्यात काय घडू शकतं हे कुणालाही माहीत नाही रे..” “भविष्य हे आपला भूतकाळ अन वर्तमानकाळावर अवलंबून असतं..” “कालच आमच्या शेजारचे काका अचानक अटॅक ने गेले..काहीही आजार नाही ना दुखणं नाही..आता याचं भाकित कसं केलं असतं??” “अचानक काहीही होत नाही, त्यांच्या … Read more

भाकित (भाग 3) ©संजना इंगळे

“केशवा..बरं झालं तुझी सोबत झाली बघ..” “काळजी करू नका साहेब..सगळं व्यवस्थित होईल..” “तुला कसं कळलं की सगळं अव्यवस्थित आहे ते??” “साहेब माणसांचे चेहरे ओळखतो मी..नक्कीच काहीतरी घडलंय अन तुम्ही फार उदास आहात..” “हो रे..कसं सांगू तुला आता..अगदी जीव द्यायचा विचारही मनात आलेला. पण इकडे आलो अन जगण्याची जरा उर्मी आली बघ..” “असला विचार आणू नका … Read more

शेरास सव्वाशेर

 “अरे हिचा बायोडेटा नीट पाहिला नव्हतास का? डिओर्स झालाय तिचा..तुला हीच मिळाली का?” “अगं आई मी खरंच नीट पाहिलं नाही, फोटो बघितला अन आमंत्रण देऊन आलो..” “अरे देवा..आमंत्रण देऊनही आलास? कर्म माझं..आता काहीतरी वेगळं कारण सांगून नकार द्यावा लागेल..” “हो पण आमंत्रण दिलं गेलंय, येऊ देत त्यांना..नंतर बघू..” “बरं.. दिसायला सुंदर आहे, शिक्षण आणि नोकरी … Read more

भाकित (भाग 2) ©संजना इंगळे

साधूच्या त्या बोलण्यात खूप आत्मविश्वास होता. त्याला कसं समजलं असावं की सॉफ्टवेअर क्षेत्रात artificial intelligence आणि machine learning मध्ये माझा हातखंडा आहे ते? आणि भविष्याचं भाकित? आजवर चित्रपटात किंवा गोष्टीतच अश्या प्रकारचं वर्णन असायचं, मग वास्तवात हे होणं शक्य आहे का? का शक्य नाही? तू आजवर कित्येक प्रोजेक्ट यशस्वी बनवलेत, अमन मल्होत्रा तर तुला कोटीचं … Read more

भाकित (भाग 1) ©संजना इंगळे

भाकित (भाग 1) ©संजना इंगळे स्वतःचा गळा आवळून घ्यायला साधा दोरही त्याला घरात सापडत नव्हता. घराबाहेर पडण्याइतपत त्याच्यात शारीरिक अन मानसिक त्राणही उरले नव्हते. मग मरणाला काही दिवस पुढे ढकललं. शॉपिंग साईटवरून हा दोर ऑर्डर करावा म्हणून तो मोबाईलवर बोटं फिरवू लागला. मरणाला जवळ करताना आयुष्याचा पूर्ण पट त्याच्या डोळ्यासमोरून गेला. काशीत गेलेलं त्याचं बालपण, … Read more

घराणं (भाग 15 अंतिम) ©संजना इंगळे

एव्हाना पूर्ण घरात या 500 करोडची माहिती समजली. वीणा आजोबांना भेटायला तातडीने दवाखान्यात आली. आजोबांना भेटल्यावर ती आधी शुभदाला भेटली, “वहिनी..कमाल केलीस हा..” “कमाल मी कसली, या पुस्तकाने केलीय..बघ ना, रश्मीला या पुस्तकानेच मार्ग दाखवला..मिनलच्या चित्राचा श्राप यानेच दूर केला..दिगंबरपंतांना बरं केलं अन आर्थिक प्रश्न सोडवला तेही यानेच..” “खरंच गं.. वहिनी पण हेही तितकंच खरं … Read more

तो फक्त बायकोचं ऐकतो 😏😏😏

   “अरे ए कमलेश, इकडे ये जरा..” “काय गं आई, बोल तिथूनच..” “समोर येऊन बोलायलाही जड जातं का??” “आई मी ट्रेकिंगला जातोय मित्रांसोबत..बॅग भरतोय आधीच उशीर झालाय..” “हो हो..जा..परवा म्हटलं चल आमच्यासोबत खंडोबाच्या टेकडीवर तर नको म्हणालास..आता मित्रांनी विचारलं तर एका पायावर तयार..” हे बोलेपर्यंत कमलेश निघूनही गेला. कमलेश गेला अन शेजारच्या सुशिलाबाई हळदी कुंकवाचं … Read more

घराणं (भाग 14) ©संजना इंगळे

“काय? 500 करोड? कसं शक्य आहे??” “शक्य आहे..हे ज्यांनी कुणी केलं आहे त्यांनी खूप हुशारीने दूरदृष्टी ठेऊन हे सगळं केलंय..” “मला अजून समजलेलं नाही, काय आहे हे नक्की??” “साधारण 1890 ते 1950 मधला काळ असेल, काही उद्योजकांनी मिळून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ची म्हणजेच BSE ची स्थापना केली. शेयर मार्केट म्हणतात ना ते हेच, त्याकाळी याची … Read more

व्रत

 “गीतांजली कोणत्या ब्राह्मण गुरुजींकडे जाते जरा बघा ओ..” “कशाला??” “मागे एकदा सांगत होती ती, गुरुजींनी व्रत दिलंय म्हणे. ते व्रत ती पाळतेय, कुणाकडून काहीही घ्यायचं नाही, अगदी ओटी सुद्धा भरून घ्यायची नाही म्हणे..फार कडक व्रत आहे..मीही करू म्हटलं..” “तुला झेपेल का? नवी साडी नेसवणार म्हणून कायम तुझ्या पाहुण्यांकडे फेऱ्या चालूच असतात..” “काहीही बोलू नका..खरं सांगतेय..ते … Read more

घराणं (भाग 13) ©संजना इंगळे

दिगंबरपंत हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकताच घरातले सर्वजण हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. दिगंबरपंतांची स्थिती अत्यंत गंभीर होती. त्यांना ऑक्सिजन वर ठेवण्यात आलेलं. पुढील काही दिवस इंस्पेक्शन केल्याशिवाय काहीही समजणार नव्हतं. घरावर फार मोठं संकट कोसळलं. ऋग्वेद, विनायक आणि संतोष हॉस्पिटलमध्ये थांबले. बाकीचे घरी आले. घरी येताच बँकेच्या माणसांनी घेरा घातला. जमीन अनाधिकृत असल्याची बातमी एव्हाना सगळीकडे पोहोचली … Read more

घराणं (भाग 12) ©संजना इंगळे

दुर्गावती ने पुस्तकात बरोबर संकेत दिला होता, आपल्याला फक्त मुलीच आहेत म्हणून आपल्याला दुय्यम स्थान आहे असा चुकीचा समज स्त्रीमध्ये निर्माण होऊ शकतो, रेखाच्या बाबतीत तेच झालेलं. रत्नपारखी घराण्याचं नाव केवळ मुलं पुढे नेतील, इथली श्रीमंती मुलांनाच मिळेल, पण माझ्या मुलींचं काय होईल या विचाराने रेखाच्या मनात धुडगूस घातलेला. देव्हाऱ्यात असलेली ती वस्तू म्हणजे करोडोंची … Read more

थेंबभर तेल

 इतर बायकांप्रमाणे आपणही काहीतरी करावं असं केतकीला नेहमी वाटे. आजूबाजूला असलेल्या आणि ओळखीतल्या बायका काहीना काही काम करतच असायच्या, कुणी केक च्या ऑर्डर्स घ्यायच्या, कुणी शिवणकाम करायचं, कुणी जॉब करायच्या, कुणी रिसेलिंग ची कामं करायच्या. त्यांची धडपड पाहून केतकीलाही वाटायचं आपणही असं काहीतरी करावं. पण हे तात्पुरतच बरका, घरी आल्यावर पुन्हा तेच आपलं काम, मग … Read more

घराणं (भाग 11) ©संजना इंगळे

तुफानी समुद्रात हरवलेल्या नावड्याला अथक प्रयत्नानंतर किनारा दिसावा तशी अवस्था शुभदाची झालेली, पुस्तकाचा दुसरा भाग तिच्याजवळच होता, अगदी डोळ्यासमोर, अन आता तो मिळालाय समजताच शुभदाची अवस्था गड सर केल्यासारखी झाली. शुभदा अधशासारखे सर्व पान जमा करते, ही पानं पहिल्या भागाच्या पानांपेक्षा सुस्थितीत असतात. दुर्गा मातेचा आशीर्वाद त्यांना असतो. आता कधी या पानांचा अर्थ शोधून काढते … Read more

घराणं (भाग 10) ©संजना इंगळे

मिनलचा स्वतःवरच विश्वास बसेना, इतके दिवस या चित्रासाठी इतकी मेहनत केली पण आजवर जमलं नाही, मग आता शुभदाने असं काय केलं की सगळं चित्र बदलून गेलं?? चित्र पूर्ण झालं, सर्वांनी कौतुक केलं. इतक्या वेळ बसून राहिल्याने सर्वजण पाय मोकळे करायला निघून गेले.मीनल शुभदा जवळ जाते.. “शुभदा..अगं काय जादू केलीस?? जे काम आजवर जमलं नव्हतं ते … Read more

घराणं (भाग 9) ©संजना इंगळे

एक संपलं की दुसरं संकट शुभदा समोर दत्त म्हणून उभं राही. पुस्तकाच्या अनुवादाला सुरवात होत नाही तोच त्याचा अर्धा भाग गायब होतो. पण जेवढा भाग झाला आहे तेवढ्या भागात मात्र शुभदाला बऱ्यापैकी दुर्गावती देवीबद्दल समजलं होतं. दुर्गावती देवीचं जीवन, त्यांची आपल्या पुढील पिढीबाबत असलेली तळमळ, त्यांच्या वाट्याला जे भोग आले ते पुढच्या स्त्रियांना येऊ नये … Read more

घराणं (भाग 8) ©संजना इंगळे

____ घराणं (भाग 8) ©संजना इंगळे शुभदाला हे समजतं की पुस्तकाची उकल करणारी ती एकटी नव्हती, अजून कुणीतरी घराण्यात होऊन गेलेलं जिने याचा छडा लावायचा प्रयत्न केलेला. पुस्तकाला समजण्यासोबतच आधी आपल्या घराण्याची वंशावळ समजून घेणं तिला महत्वाचं वाटलं. दिगंबरपंत त्यांच्या आजी इतपत सांगू शकत होते पण त्या आधी कोण होतं? ती दिव्य स्त्री कोण होती … Read more

रिपोर्ट्स

  “तुमच्याकडे फक्त 6 महिने बाकी आहेत..” डॉक्टरांनी असं सांगताच काशीच्या पायाखालची जमीन सरकली. वयाच्या 56व्या वर्षी पोटाचा त्रास जो सुरू झाला त्याचे रिपोर्ट्स आज मिळाले अन मरणाची वाट त्यांना दिसू लागली. 6 महिने, फक्त 6 महिने? नातवाला खेळवायचं आहे, पोरीची बोळवण करायचीय, मुलाला मार्गी लावायचं आहे..सहा महिन्यात होईल?  हेकेखोर अन भांडकुडळ काशीचा स्वभाव गेल्या … Read more