Corona virus – निसर्गाचा संकेत

Korona virus – आता तरी निसर्गाचा संकेत ओळखा..!!!

चीन सारख्या बलाढ्य देशात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातलाय. लागण झालेल्यांची संख्या आणि मृतांची संख्या ऐकून अंगावर काटा उभा राहतोय..कुठून आला असेल हा व्हायरस? त्याची उत्पत्ती कुठून झाली? या सर्व प्रश्नांची उत्तरं संशोधकांना सापडेपर्यंत बरीच जिवीतहानी होऊन गेलेली असेल.
या व्हायरस संबंधी कुतूहल म्हणून मी चिनी लोकांच्या राहणीमान आणि आहाराबद्दल शोध घेतला…आणि जी माहिती समोर आली त्यावरून हे होणं साहजिक आहे असं वाटू लागलं.
चिनी लोकं चार पायाचा कुठलाही प्राणी खाऊ शकतात. होय..अगदी कुठलाही. अगदी सापापासून ते डुकरापर्यंत…आपण ज्या किड्या माकोड्यांची किळस करतो ते हे लोकं अगदी शिजवून चवीने खात असतात. प्राण्यांचे गुप्त अवयव खाणं त्यांना “रॉयल” वाटतं.
निसर्गाने हे जैविक विविधता निर्माण केली, त्यात माणसाला सर्वोच्च स्थान दिलं. पण म्हणून जबाबदारीने न वागता माणसाने दुसऱ्या जीवसृष्टी वरच आक्रमण केलं. आपल्यासारखीच त्यांनाही जैविक अधिकार आहे..त्यांनाही जगण्याचा समान अधिकार मिळाला आहे हे समजून न घेता त्यांच्यावरच माणसाने आक्रमण केलं. निसर्गातील सर्व गोष्टी फक्त आमच्या उपभोगासाठी म्हणून त्याने निसर्गावर आक्रमण सुरू केलं.
चीन सारख्या देशाने आपलं आर्थिक वर्चस्व गाजवावं यासाठी जंगले नष्ट केली..जागतिक संस्थेने सुद्धा चिनमधील जंगले धोक्यात आहेत असा इशारा दिला. बीजिंग मधील हवेच्या प्रदूषनाणे इतकी मोठी पातळी गाठली की लोकांना शुद्ध हवा हवी असेल तर घरातच air purifier लावून बसावं लागतं.
कॅन्सर सारख्या रोगाने तिथे इतकं थैमान घातलंय की काही गाव “कॅन्सरयुक्त” घोषित करण्यात आली. नद्यांचे पाणी काळेकुट्ट आणि इतकं प्रदूषित झालंय की कुठल्याही शुद्धीकरण प्रक्रियेने ते शुद्ध करता येणार नाही.
विषारी रसायने आणि धातू, ज्यांना जगाने बंदी आणलीय ते तिथे सर्रास सापडतात. जगावर राज्य करण्याच्या हेतूने चीन ने निसर्गावर प्रचंड अत्याचार करून आपलं आर्थिक आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर जोर दिलाय.
हे झालं चीन चं, पण आपलं काय? थोडं आपल्या इतिहासाकडे पाहिलं आणि संस्कृती कडे एक नजर टाकली की लक्षात येतं, आपल्या ऋषी मुनींनी पुढील कित्येक पिढ्यांचा विचार करून आपल्याला काही शिकवण दिली आहे..ज्यात निसर्गाला देव मानण्याची परंपरा त्यांनी दिली.
रुद्राणां शङ्करश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्‌ । वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम्‌ ॥
गीतेच्या दहाव्या अध्यायात म्हणजेच विभूतीयोगात या निसर्गातील चराचर जैविक विविधतेतील भगवंताचा वास याचा उल्लेख आहे.
वृक्ष, वज्र्य, शस्त्र इतकंच नाही तर सर्पामध्येही माझा वास आहे असं श्रीकृष्ण भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे.
थोडक्यात काय, तर जमिनीला धरणीमाता, पाण्याला जीवन आणि सूर्याला पिता म्हणून त्यांचा आदर करण्याची शिकवण आपली संस्कृती देते.
जेव्हा माणूस निसर्गाच्या वरचढ होऊ पाहतो, तेव्हा निसर्ग आपलं सामर्थ्य अशा पद्धतीने जगाला दाखवून देत असतो.

मग आता हे स्वाइन फ्लू, बर्ड फ्लू, कोरोना व्हायरस कसला परिणाम आहे हे तुम्ही ओळखलं असेलच…
©संजना इंगळे

Leave a Comment