दैवलेख (भाग 15)

 #दैवलेख (भाग 15) सईने लग्नाची बातमी देवांगच्या घरी येऊन सांगितली, पण कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद नव्हता. सई एकटी तेवढी उसळ्या मारत होती. देवांग आता कचाट्यात सापडला, सईला लग्नाचं वचन देऊन ठेवलेलं आणि इकडे साखरपुडा वैदेहीसोबत केलेला. सईने बातमी दिली, देवांगकडे पाहिलं.. आणि म्हणाली, “काय रे ही मुलगी कोण?” देवांग मौन राहिला, देवांगच्या आईने ठसक्यात सांगितलं.. “देवांगची … Read more

दैवलेख (भाग 14)

 #दैवलेख (भाग 14) देवांगने वैदेहीचा साखरपुडा मोडला, तत्क्षणी तो तिच्याशी साखरपुडा करायला तयार झाला. आजूबाजूला असलेली माणसं सगळं बघत होती, कुजबुजत होती. वैदेहीच्या आईने डोळे पुसले..तिने देवांगचा हात धरून वैदेहीसमोर आणलं आणि म्हणाली, “तुझं मत बदलायच्या आत घाल तिला अंगठी..” देवांगने क्षणाचाही विचार न करता तिला अंगठी घातली. गुरुजींनी इतर विधी पूर्ण केले आणि वैदेही … Read more

आंघोळी आणि ती

  “अंघोळा करा ना रे पटापट, मशीन लावायचं आहे, 10 वाजून गेले, कपडे धुणार केव्हा वाळणार केव्हा?” सुट्टीच्या दिवशी घरोघरी ऐकू येत असलेलं वाक्य. मीनाच्या घरीही तेच. आज रविवार, एक 9 ला उठलं, एक 10 ला..घरातल्या चार मेम्बर साठी चारवेळा चहा झाला. चहाच्या पातेल्याने पार जीव सोडला होता. सुट्टीच्या दिवशी उशिराने अंघोळ करण्याची मजा आईला … Read more

Show must go on

  जवळपास वर्षभर कोमात असलेली सुवर्णा आज शुद्धीवर आली होती. घरच्यांनी तर आशा सोडूनच दिलेली, पण आज डॉक्टरांनी अचानक फोन केला आणि सर्व नातेवाईक दवाखान्यात जमा झाले.  मुलगा सुधीर, सासू, नवरा सुभानराव आणि माहेरची काही मंडळी, सर्वजण तिला डोळे भरून पहात होती. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर सुवर्णाला घरच्यांनी घरी नेलं.  आपण गेले वर्षभर कोमात होतो या … Read more

दैवलेख (भाग 13)

 दैवलेख (भाग 13) वैदेहीला साखरपुड्यात बघून देवांगला धक्का बसतो. खरं तर काही कारण नव्हतं एवढं बैचेन होण्याचं. दोघांचं ना लग्न ठरलेलं असतं ना दोघांमध्ये काही संवाद असतो, तरीही देवांगची अनामिक असुरक्षितता जागी होते. त्याचं मन थाऱ्यावर राहत नाही. तो आई बाबांना शोधतो, धाप टाकत त्यांच्याजवळ जातो. “आई, बाबा.. वैदेही..” आई बाबांना समजत नाही हा नक्की … Read more

तो एक मोहाचा क्षण

 एक क्षण मोहाचा हॉस्पिटलमध्ये बहिणीला बघून बेडवर असलेल्या सुमितने मान वळवली, बहिणीचे अश्रू थांबत नव्हते. अपराधीपणाचं ओझं तिच्या मनावर अजूनच दाट झालं. आई पलंगाशेजारी बसून तिच्याकडे बघत होती. दोन्ही मुलांचं आयुष्य बरखास्त झालेलं बघून ती आई कोरडी झाली होती. मुलाला धीर द्यावा की सुमतीच्या अपराधीपणाचं ओझं कमी करावं तिलाच कळत नव्हतं. त्याची बायको सुन्नपणे फक्त … Read more

दैवलेख (भाग 12)

 #दैवलेख (भाग 12) वैदेहीने परत एक तयारी केली, तडजोड करण्याची. पण एरवी एक समाधान असे, हेही दिवस जातील म्हणत ती सामोरं जायची. पण आता आयुष्यभराची तडजोड, रजत सोबत. नाईलाज असला तरी ती आशावादी होती. रजतला आपण बदलू, प्रेम करण्यालायक माणूस बनवू असा विचार तिने केला.  विचार करत असतांनाच वैदेहीची आई तिच्याजवळ आली, “वैदेही, बाळा…तुझा होकार … Read more

एक ट्रिप-मोबाईल विना

 फिरायला जाऊयात म्हणून बायकोने सतत तगादा लावलेला, नवऱ्याने होकार देताच ती खुश झाली.  आपल्या बेडरूममध्ये गेली, छानपैकी कपडे अंगावर चढवले, तासभर मेकप केला, चांगली दिसतेय याची खात्री झाल्यावर बाहेर आली,  “अहो आवरलं नाही अजून? आवरा पटकन..” नवऱ्याने तिच्यासमोरच दोरीवरची वाळत घातलेली जीन्स आणि शर्ट काढला आणि जागीच बदलला, खिशातून छोटा कंगवा काढत केस विंचरले आणि … Read more

दैवलेख (भाग 11)

 दैवलेख (भाग 11) “हॅलो मी रजत पवार..” रजत शेकहॅन्ड साठी हात पुढे करतो, वैदेही ईच्छा नसतानाही शेकहॅन्ड देते. रजत बराच वेळ तिचा हात सोडत नाही, ती कसाबसा आपला हात सोडवून घेते. पुढे तोच म्हणतो, “माझ्याशी लग्न झाल्यावर जॉब वगैरे दे सोडून, माझ्याच कंपनीत मोठ्या पदावर बसवेन तुला” “माफ करा पण असं आयतं यश मला पटणार … Read more

तुम्ही ‘घरीच’ असता का?

  “रोहन बाळा प्लिज मला अनुराधा मावशीकडे सोडून दे, वाटल्यास तू घरी येऊन जा, मी येईन तिथून पायी” “काय आहे इतकं अर्जंट?” “अरे हळदी कुंकवाला बोलावलं आहे तिने, मागे ती येऊन गेलेली आपल्याकडे, मग मलाही जायलाच हवं ना” सुट्टीच्या दिवशी रोहन हॉल मध्ये मस्तपैकी मोबाईलवर विडिओ बघत असतांनाच आईने असं काम सांगितलं म्हटल्यावर त्याचा खरं … Read more

बेस्ट फ्रेंड

 ती: तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे बरं? तो: (हसून) असं काय विचारतेय शाळेतल्या मुलांसारखं?  ती: आपल्या रोहितला आपल्या बेस्ट फ्रेंड साठी ग्रीटिंग बनवायला लावलं आहे शाळेत, त्यावरून आठवलं..मीही माझ्या बेस्ट फ्रेंड साठी बनवतेय.. तो: (अजूनच हसायला लागतो) बरं बरं..कर, चांगला टाईमपास आहे ती: सांगा ना, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण? तो: आता या वयात बेस्ट फ्रेंड … Read more

कितीसा वेळ लागतो?

 ती: अहो आज कॉलनीत कार्यक्रम आहे, आपण जाऊया..जेवणही आहे त्यामुळे स्वयंपाकाचं टेन्शन नाही तो: माझी काही ईच्छा नाही, तुला जायचं तर जा. ती: अहो मग तुमच्यासाठी पुन्हा वेगळं काहितरी बनवावं लागेल, चला की..तेवढाच मला एक दिवस स्वयंपाकापासून आराम तो: त्यात कसला आराम, कितीसा वेळ लागतो? खिचडी टाकुन दे फक्त ती: (वैतागून) एक दिवस आराम म्हटलं … Read more

भाजीतला केस..!!!

 “नवस फेडायला जातेय कोल्हापूरला, दोन दिवस अरविंदकडे राहून येते म्हटलं…3 वर्षांपासून ते इकडे आले नाहीत आणि आपणही गेलो नाही..” “कसं जाणार आपण तरी, lockdown मुळे सगळेच अडकले, त्यात आपल्या मुलीचं बाळंतपण… आता जातेय ना, चांगली आठ दिवस राहून ये..” “नको बुवा, सूनबाईला आवडतं नाही आवडत काय सांगता येतं..” “प्रेमळ आहे गं ती, का नाही म्हणेल … Read more

जेव्हा माहेरपण उमगतं

 तेव्हा बायकोचं माहेर समजतं.. “अगं जातांना जास्तीचा फराळ घेऊन जा तुझ्या माहेरी, तुझा भाऊही आलाय ना यावेळी गावी…आणि हो, अप्पांसाठी मी हे श्रवणयंत्र आणलं आहे, नेताना आठवणीने ने हो..” भाऊसाहेबांचं हे रूप कल्पनाने गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा पाहिलं होतं. मानापानाच्या बाबतीत अगदी कडक, कौटुंबिक रीती भाती अगदी तंतोतंत पाळणारे भाऊसाहेब आज इतके नरम कसे झाले … Read more

Facebook, instagram, whatsapp is down today

 Facebook whatsapp is down? Today, 4th Oct 2021, facebook, whatsapp and instagram is down since 9pm. This is the biggest flaw ever in facebook and whatsapp servers. Millions of businesses and ad companies are using facebook as their primary marketing sources, will facebook pay back to those trusted users?  Facebook is down and so as … Read more

प्रतिकार

 आपल्या मनोरुग्ण झालेल्या लेकीला भेटून देसाई जोडपं आणि शरयूचा भाऊ नुकतेच परतत होते.. लेकीची अशी अवस्था बघून दोघांनाही अश्रू अनावर होत नव्हते..भाऊ तर शून्यात नजर भिडवून बघत होता..शरयूची आई आवंढा गिळत बोलत होती.. “सोन्यासारखा संसार सुरू होता माझ्या शरूचा..कुणाची नजर लागली कुणास ठाऊक…कधी कुणाचं वाईट केलं नाही माझ्या लेकीने..तिच्यावर अशी वेळ का यावी बरं..” “खरंच … Read more

चुकलीस तू..!!!

 अठरा वर्षीय रानुचा कामाचा चपाटा सर्वजण बघतच राहिले. काही दिवसांपूर्वीच तिच्या मावशीची मुलगी बाळंतीण झाली होती, घरी पाहुण्यांची लगबग सुरू झाली..मावशीला एकीकडे मुलीकडे लक्ष द्यावं लागे आणि दुसरीकडे पाहुण्यांच्या पंगती उठवाव्या लागे. अश्या धावपळीच्या प्रसंगी “रानुला बोलावून घ्या” हे वाक्य तिच्या कुटुंबात लोकप्रिय होतं.. रानुची आई, मनीषा…गेले कित्येक वर्षे माहेरीच रहात असे. नवरा दारू पिऊन … Read more

का मागे पडतो मराठी माणूस व्यवसायात?

“हॅलो, एक enquiry करायची होती..” “आज संडे आहे मॅडम, उद्या फोन करा..” असं म्हणत त्या बाईने घाईगाईने फोन ठेऊन दिला. मी फोन स्क्रीनवर त्या इन्स्टिट्यूट ची माहिती बघू लागले, गुगल रेटिंग फक्त 2 स्टार….मनातल्या मनात हसू आलं, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हे..!!! आधीच उतरती कळा लागलेली त्या इन्स्टिट्यूटला, वर असा attitude… बरं जाऊद्या, रविवार … Read more

अस्सं सासर सुरेख बाई

 “सुधा परत एकदा विचार कर, जॉईन फॅमिली आहे ती..दिसायला सगळं छान दिसतं बाहेरून पण एकदा त्यात अडकलीस की बाहेर पडता येणार नाही..तू एकुलती एक, लाडात वाढलेली..तुला ना कामाची सवय ना जबाबदारीची…फक्त प्रेम आहे तेवढं असून चालत नाही..” सुधा आणि अमित एकाच कॉलेजमध्ये, कॉलेज पासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. रुसवे फुगवे दुरावा करत करत शेवटी त्यांना … Read more

आपण पालक असाल तर नक्की वाचा..

 पालक झाल्यावर खालील ज्ञानात भर पडते.. 1. Tom and jerry व्यतिरिक्त pepa pig, wolfoo, pupu, Vlad and Nikki, masha and the bear अशीही कार्टून्स अस्तित्वात असतात. 2. कॅडबरी हे सर्वोच्च सुख नसून त्यात अनेक पोटजातीही असतात.  3. सहा फुटाच्या माणसापेक्षा 2 फुटाचे कपडे महाग असतात. 4. खेळणीतील गाड्या खेळण्यापेक्षा त्याचे पार्टस वेगळे करणं हा मनोरंजक … Read more