“देवांग, कधी येतोयस? आजीची तब्येत ढासळत चाललीये..तुझी आठवण काढतेय सारखी”
“आई मी उद्याच निघतोय, संध्याकाळी पोहोचेन..”
देवांग, नावाप्रमाणेच दैवी अंग लाभलेला. कला त्याच्या नसानसात भरली होती. उपजतच चित्रकलेची देणगी लाभलेला देवांग..कलेसाठी त्याने आपलं जीवन समर्पित केलं होतं. एका मोठया आर्ट कंपनीत त्याला भरघोस पगाराची नोकरी होती. त्याने डिजिटल ग्राफिक डिजाइनिंग सुद्धा शिकून घेतलं होतं. त्यामुळे चित्रही त्याला सुचायची आणि प्रत्यक्षातही तोच आणायचा. एरवी इतर डिझाइनर फक्त कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वापरण्यात कुशल असायचे, पण कल्पनाशक्तीचा अभाव, कुणीतरी काहीतरी सुचवलं, दाखवलं की जसच्या तसं उतरवायचं हेच ते करत, पण देवांगकडे हे दोन्ही कौशल्य असल्याने कंपनीने त्याला चांगली ऑफर देऊन जवळच ठेऊन घेतलं होतं.
देवांगने कंपनीत रीतसर रजा टाकली आणि संध्याकाळी आपली बॅग भरायला घेतली. बॅग भरत असतानाच त्याचा मोबाईल खणाणला..तिकडून सई फोन करत होती.
“हॅलो देवांग.. चाललाय तू? कधी येशील परत? आणि आपल्या लग्नाचं बोलणार होतास ना तू घरी?”
“हो यावेळी बोलणार आहे नक्की, आजीची तब्येत खूपच खराब आहे सई.. मी योग्य वेळ बघून आजीला सांगेन. तसं आई बाबांना तू पसंत आहेसच, मग झालं तर”
“ग्रेट..मी खूप excite आहे लग्नासाठी”
“बरं चल मी आवरतोय, नंतर बोलू”
“Ok बाय, लव यु”
देवांगने हसतच फोन ठेवला.
सई, देवांगच्याच ऑफिसमध्ये काम करणारी त्याची सहकारी मैत्रीण. शहरात वाढलेली, मॉडर्न आणि महत्त्वाकांक्षी मुलगी. देवांग सोबत काम करतांना ती त्याच्या प्रेमात पडली नसती तर नवलच. उंच, देखणा, रुबाबदार या त्याच्या व्यक्तिमत्वात त्याच्या अंगात असलेली कला अजूनच भर पाडत होती. त्याच्या अबोल, शांत पण हुशार व्यक्तिमत्वाची सईला भुरळ पडली होती. पण एकमेव ते कारण नव्हतं, देवांग वरिष्ठांच्या मर्जीतला माणूस होता. नोकरी टिकवण्यासाठी देवांग सोबत सलगी करणं तिच्यासाठी फायद्याचं होतं. त्यात देवांग इथे एकटा राहत असे, त्यामुळे सासू सासरे यांची कटकट नसणार होती. सर्व बाजूने विचार करून सईने देवांगला आपला पार्टनर बनवण्याचं ठरवलं होतं. पतीची प्रेमाची व्याख्या वेगळी होती, आयुष्य सुंदर करणारा पार्टनर हवा..सुंदर म्हणजे दोघांचं राजा राणीचं आणि भरपूर पैसे गाठीशी असलेलं आयुष्य.. जे तिला देवांग सोबत सहज मिळणार होतं.
सर्वप्रथम सईनेच देवांगला प्रपोज केलं होतं. तोवर त्यालाही याबद्दल काही कल्पना नव्हती. तोही तिच्यात गुंतू लागला, आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय ही भावनाच फार सुखद होती त्याच्यासाठी. एकुलता एक म्हणून लाडात वाढलेला पण शांत स्वभावामुळे एकटा असलेला देवांग, त्यालाही तिचं बोलणं, तिची साथ हवीहवीशी वाटू लागलेली. मग सुरू झाला दोघांचा प्रवास, प्रेमाच्या दिशेने.
देवांग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला आणि आपली बॅग घेऊन त्याने ट्रेन पकडली. ट्रेनमध्ये बसताच त्याने आपली बॅग जागेवर ठेवली आणि खिडकीबाहेर बघू लागला. काही वेळाने फोनवर बोलत एक मुलगी त्याच्या समोरच्या सीट वर बसली. ती जरा चिडलेली दिसत होती, तिने आपली बॅग जवळजवळ आपटलीच आणि फोनवर बोलणं सुरू ठेवलं.
“परेश, उद्यापर्यंत मला बग्स फिक्स करून मिळायला हवेत. खूप होतंय तुझं आणि तुझ्या असिस्टंट चं. एक बग सोडवायला 15-15 दिवस? अरे कोळशाच्या खाणीतलं काम आहे का ते?”
बोलण्यावरून ती टीम लीडर वाटत होती. एका सॉफ्टवेअर कंपनीत. तिने ऑर्डर देत फोन ठेवला आजी आपला संताप शांत करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला. काही वेळाने तिचं लक्ष समोर गेलं..तिची हालचाल टिपत असल्याने देवांग अजूनही तिच्याकडेच बघत होता..तिचं लक्ष जाताच तो जरा बावरला, आणि खिडकीकडे मान वळवली. तिला हा चेहरा किंचितसा ओळखीचा वाटत होता..पण नक्की आठवेना. काही वेळाने देवांगलाही काहीतरी जुनं आठवत होतं पण लिंक लागत नव्हती. बराच वेळ दोघेही विचार करत राहिले आणि शेवटी विचार करणं थांबवलं.
बराच वेळ अबोल राहिल्यानंतर देवांगने संवादाला सुरवात केली.
“बाहेर काय दिसतंय?”
या अनपेक्षित प्रश्नाने ती मुलगी दचकली. हा काय प्रश्न आहे? बाहेर काय दिसतंय.. का विचारतोय हा? काय हवंय याला?
“अहो असं गोंधळून जाऊ नका.. मी माणसांच्या नजरेतील चित्र कागदावर उतरवतो..म्हणून विचारलं”
“तुम्ही चित्रकार आहात का?”
“हो, प्रोफेशनल चित्रकार..”
त्या मुलीची आता जरा भीती कमी झाली. तिने उत्तर दिलं..
“बाहेर मला हे जग दिसतंय.. सतत धावणारं, वेग पकडणारं.. या वेगाला जराही कात्री लागली तर तितक्याच वेगाने मागे पडणारं ठिकाण..आणि तुम्हाला काय दिसतंय?”
“या वाऱ्याच्या लयीत नाचणारं जग…लय पकडणारं, एक अदृश्य संगीत..जग तिथेच आहे, आपण गती पकडतोय…थोडं थांबून या जगाशी हातमिळवणी करावी, या झाडांशी बोलावं, या अनोळखी मातीशी ओळख करून घ्यावी असं वाटतंय”
“चित्रकाराला शोभेल असं बोलताय तुम्ही..”
“हो, माझी सवयच आहे..रोज रात्री एक तरी चित्र रेखाटायचं.. दिवसभरात जे काही अनुभवलं, घडलं त्यावर”
“गम्मतच आहे, लोकं रात्री डायरी लिहितात..तुम्ही चित्र काढतात..”
“होय…”
“मला बघायला मिळतील ही चित्र?”
देवांग त्याच्या मोबाईल मध्ये काही चित्र दाखवतो, ती मुलगी या चित्रात हरवून जाते. मघाशी आपल्या टीमला रागवताना झालेली चिडचिड ती क्षणात विसरते.
दोघेही इतक्या सहजतेने आणि मनमोकळेपणाने बोलत होते याचं त्या दोघांनाच आश्चर्य वाटलं. कारण दोघेही मितभाषी होते, पटकन कुणाशी मैत्री करत नसत… पण इतक्या सहजतेने त्यांची संवादाची नाळ जोडली गेली की त्यांनाच नवल वाटलं. त्यांना माहीत नव्हतं,पण निसर्गाला..त्या देवाला माहीत होतं..ही नाळ केवळ ट्रेनच्या प्रवासातील नसून आयुष्यभराच्या प्रवासातील आहे ते..!!
हा सुंदर आणि तितकाच थरारक प्रवास जाणून घेण्यासाठी तयार रहा…”दैवलेख”..
आपल्या प्रतिक्रिया आल्या तर पुढचे भाग अजूनच सुंदर 😪आणि लवकर लिहायला प्रेरणा मिळेल 😊👌🙏
क्रमश
[…] दैवलेख (भाग 1) […]
Mast aahe story & yes Nakki j 2nd part Vachaila Aavdel.. Waiting for the next part
हो नक्कीच
Avdel vachayla
खूपच छान.. नक्कीच आवडेल वाचायला पुढील दैव लेख
Thode lawkar post Kara pudhche bhag. Khup diwas waat pahili
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good. https://www.binance.com/ru/register?ref=W0BCQMF1
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.