3. बना महिला उद्योजिका । व्यवसाय । कोचिंग क्लासेस

व्यवसाय निवडताना कुठलीही घाई न करता विचारपूर्वक व्यवसायाची निवड करता आली पाहिजे. व्यवसायाची निवड करताना आततायीपणा करून चालणार नाही. अमुक एखाद्या व्यवसायात केवळ पैसा जास्त आहे म्हणून आपल्याला त्या व्यवसायाची माहिती नसताना त्यात जाणे चुकीचे ठरेल. व्यवसाय निवडताना खालील गोष्टी तपासून पहाव्यात.

1. या व्यवसायाची मला आवड आहे का?
2. या व्यवसायबद्दल मला थोडेफार ज्ञान आहे का?
3. या व्यवसायासाठी मला साधारण किती वेळ द्यावा लागेल? मी तितका वेळ देऊ शकेल का?
4. या व्यवसायात साधारणपणे किती तोटा होऊ शकतो? आणि त्याची भरपाई करणं मला शक्य आहे का?
5. या व्यवसायबद्दल अधिकाधिक माहिती घेण्याची, नवीन गोष्टी शिकण्यासाठी माझ्याकडे आवश्यक ते स्रोत आहेत का?

वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच व्यवसायाची निवड करा. असा व्यवसाय निवडा की ज्यात तुम्ही खुप निपुण आहात. एक साधा 10 रुपयाचा चहा विकून सुद्धा काही मोठे ब्रॅण्ड आज तयार झालेत, ज्यांची मासिक कमाई 12 लाख आहे..याचं कारण म्हणजे त्यांचे केवळ चहा बनवण्यात नैपुण्य होते. तुमचे नैपुण्य ओळखा आणि त्यानुसार व्यवसायाची निवड करा.

आज आपण पहिला व्यवसाय बघणार आहोत तो म्हणजे “कोचिंग क्लासेस”.
 तुम्हाला जर समोरच्याला एखादी गोष्ट समजवून सांगण्याची कला असेल तर नक्कीच हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे. 
तुम्ही कुठल्याही भागात असाल, तुमच्या आजूबाजूला अनेक विद्यार्थी असतात. केवळ शाळा कॉलेज नाही तर क्लासेस मध्ये कुकिंग, केक मेकिंग, शिलाईकाम, रांगोळी क्लास या सर्वांचा समावेश होतो. कुठलाही क्लास सुरू करताना काहीजण अनेक चूका करतात..

पहिली चूक म्हणजे क्लास सुरू केल्या केल्या आपल्याकडे खुप विद्यार्थी यायला हवे अशी अपेक्षा.

सुरवात अगदी एका विद्यार्थ्यापासून करायला हवी, त्या विद्यार्थ्याला अगदी मनापासून शिकवून त्याला चांगला रिझल्ट मिळवून दिलात तर पुढील 10 विद्यार्थी तुमच्याकडे येतील यात वाद नाही.

दुसरी चूक म्हणजे आत्यंतिक जाहिरात करणे. तुम्ही समजा शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणार असाल, तर तुम्ही तशी एक जाहिरात whatsapp, फेसबुकवर देत असतात. पण लक्षात असू द्या, की या आत्यंतिक जाहिरातीने समोरच्यावर एक नकारात्मक प्रभाव पडत असतो. आपले संभाव्य विद्यार्थी जे आहेत त्यांच्यापर्यंत ती जाहिरात करणे योग्य. व्हाट्सएप, फेसबुकवरील तुमचे मित्र वेगवेगळ्या परिसरात राहणारे असतात, त्यांच्यापर्यंत जाहिरात देऊन उपयोग नाही.

तिसरी एक चूक म्हणजे आपल्याकडे जे विद्यार्थी येतात त्यांना सतत “अजून विद्यार्थी आना” असं सांगणं.

जर तुमची शिकवणी योग्य असेल तर तुम्हाला तसं सांगण्याची गरज येणार नाही, तुमचे विद्यार्थी आपणहून इतरांना आणतील.

चौथी चूक म्हणजे अगदी सुरवातीला फीज चा तगादा लावणे. लक्षात ठेवा, तुमची ही सुरवात आहे, किती पैसे मिळतील याचा विचारही करू नका, केवळ आपण जास्तीत जास्त किती देऊ शकतो यावर भर द्या.

उदा. शाळेतील विद्यार्थ्यांना आपण इतरांहून वेगळं असं काय देऊ शकतो? त्यांना काही व्हिडीओ ट्युटोरिअल, स्वलिखित नोट्स असं काहीतरी दिलं तर आपलं वेगळेपण उठून दिसेल. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी नेहमी संवाद असू द्या. लक्षात ठेवा, पालकांना केवळ आपला पाल्य योग्य त्या शिक्षकाच्या हाताखाली आहे की नाही याचीच एक काळजी असते, त्यांच्याशी संवाद साधून त्यांना हमी देत चला.

पाचवी चूक म्हणजे विद्यार्थ्यांना कठोर वागणूक देणे, विद्यार्थ्यांना जर खेळीमेळीचे वातावरण दिले तर त्यांनाही क्लास ला हजर राहायला आवड निर्माण होईल.

क्लासेस ची जाहिरात ही शक्यतो तोंडी असू द्या, आपल्याला विद्यार्थी कुठून मिळू शकतील याचा अंदाज घ्या आणि त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायची सोय करा.

आपण जर कुकिंग अथवा शिलाई सारखे कौशल्याची कामं शिकवू इच्छित असाल तर आधी आपला सोशल प्रेसेन्स वाढवा. म्हणजे आपली कौशल्य डिजिटल बनवा.

स्वतःचे फेसबुक पेज, इन्स्टाग्राम अकाउंट तयार करा आणि त्यात सतत अपडेट देत जा.

शेवटचं पण महत्वाचं, क्लासेस च्या व्यवसायात उतरल्यावर किमान 6 महिने फक्त कामावर भर द्या, त्यानंतर त्याचा व्यावसायिक दृष्ट्या विचार करा.

मी स्वतः एका मुलावर इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा चे क्लासेस सुरू केले होते, अगदी घरात माझ्या खोलीत बसवून क्लासेस घेत होते. त्या मुलाला चांगला रिझल्ट दिल्यानंतर त्यापासून 50 विद्यार्थी तयार झाले. खोलीत होणाऱ्या क्लास चे 3 वेगळे क्लासरूम बांधावे लागले. व्याप वाढला तसा स्टाफ ठेवावा लागला..आणि दुसऱ्या एरियातही ब्रँच ओपन करावी लागली.

माझा हाच अनुभव मी तुमच्यापुढे सादर केला, तुम्हाला या व्यवसाया बद्दल काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये जरूर विचारा.

Leave a Comment