साधी गोष्ट-3

 “तिने कानं भरलीत की काय तुमची?”

“तशी नाही माझी सून बरं का…मीच पाहिलं सकाळी, आपली लेक घरी आली… तू तिथे नव्हती म्हणून सुनबाई तिला चहा पाणी करणार नाही का? तुझ्या आदेशाची वाट बघत थांबणार होती का ती? तू येईपर्यंत तिचा चहा नाष्टा सगळा उरकला होता..आणि येऊन परत तेच तू सूनबाईला सांगितलं तर तिला वाईट नाही का वाटणार?”

“अगं बाई, विचारच केला नाही मी याचा..पण तिला याचं एवढं वाईट वाटत असेल?”

“आज एक दिवस फक्त तुझ्याशी तसं वागलो तर चिडलीस माझ्यावर, तिला तेही करता येत नाही… ती तर गेले 20 वर्षे हेच सहन करतेय”

दुसऱ्या दिवशी सकाळी सासू सासरे दोघे हॉलमध्ये येऊन बसले,

सकाळी उठल्यावर दहाव्या मिनिटाला हातात गरम चहाचा कप मिळे,

सासुबाई पेपर वाचत होत्या,

वाचता वाचता म्हणाल्या,

“सुनबाई चहा टाक गं.”

तिकडून काही उत्तर आलं नाही,

त्यांनी पेपर बाजूला केला अन पाहिलं की चहा समोरच होता,

सासरेबुवा रागाने त्यांच्याकडे बघत होते,

सासूबाईंनी जीभ चावली अन म्हणाल्या,

“सवय हो…दुसरं काय..वेळ लागेल बदलायला”

*****

गोष्ट अगदी साधी होती, पण या साध्या गोष्टीही मनावर खूप परिणाम करून जातात…

57 thoughts on “साधी गोष्ट-3”

  1. खरंच खूप छान, सर्व सासुबाईंना हेच वाटत की मी आहे तर सर्व आहे

    Reply
  2. इतकी वर्षे झाली तरी सासुला सुनेचा स्वभाव आणि गुण ओळखता येत नाहीत खरं तर सुनेचे कौतुक करुन तिला प्रोत्साहन दिले पाहिजे

    Reply
  3. सुनेने असे daily सोप sarkhe nokar banuch naye…jamel tevdhe ksm सर्वानी करावीत

    Reply
  4. You can shelter yourself and your family by being alert when buying pharmaceutical online. Some pharmacopoeia websites function legally and put forward convenience, solitariness, sell for savings and safeguards for purchasing medicines. http://playbigbassrm.com/

    Reply

Leave a Comment