रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे

मनाली फ्लॅट मध्ये जाण्याचा निर्णय काही काळ स्थगित करते,

“विशाल…आपण घाई नको करायला इथून जायची..”

“असं अचानक काय झालं तुला? छोटू साठी घर सोडवत नाहीये ना तुला?”

“ते तर कारण आहेच, पण…”

“पण काय?”

“सासुबाईंचं स्वप्न होतं… त्यांचं कुटुंब रामराज्य म्हणून ओळखलं जावं…”

“हो…पण रामराज्यात सर्वांना आदर दिला जायचा…समान वागणूक दिली जायची..इथे तू बघतेय ना? मी केलेल्या चुकीला सतत टोकलं जातंय… आणि तुला मूल होत नाही म्हणून कशी वागणूक दिलेली विसरलीस?”

“रामराज्या बद्दल बोलत असाल तर नीट आठवा… रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं…लक्ष्मण उर्मिलेला सोडून रामा सोबत राहिलेला…त्या त्यागाची तुलना तरी आहे का आपली? मोठ्या भाऊजींना मुंबई ला पाठवायचा निर्णय बाबांचा होता…पितृआज्ञा त्यांना मान्य करावीच लागली…आणि तिकडे ते मजेत जगताय असं वाटतं तुम्हाला? करुणा वहिनिंकडे पाहिलंय कधी? फक्त चार साड्या आलटून पालटून वापरताय त्या…अंगावर एक दागिना आहे फक्त…किती हलाखीत राहताय तिकडे हे तुम्हाला नाही माहीत…इथे आले असते तर खूप सुखात राहिले असते आणि सर्व सोयी मिळाल्या असत्या त्यांना… पण बाबांमुळे ते तिथे राहिले….”

“पण माझं काय? मी एक चूक काय केली, त्याची इतकी मोठी शिक्षा?”

“वडील म्हणून त्यांचा राग साहजिक आहे, पण महेश आणि प्रताप च्या मनात तुमच्याबद्दल काहीही सल नाही…तुम्ही उगाच स्वतःवर ओढून घेताय…तुम्ही लक्ष्मणाच्या जागी आहात…लक्ष्मण हवं तर राजोपभोग घेऊ शकला असता…पण भावासाठी इतका त्याग? हाच त्याग तुम्हाला करायचा आहे…वहिनींसाठी…सासूबाईंच्या स्वप्नासाठी… तुम्हाला सहन करावा लागेल बाबांचा राग…”

करुणानंतर मोठी सून म्हणून मनाली अगदी योग्य विचार करत होती. .कितीही झालं तरी ती मोठी सून…करुणा तर मुंबई ला होती…इथला डोलारा मनाली ने सांभाळला होता…वृषाली आली, नंतर तारा आली..दोघींना तिनेच सांभाळून घेतलं होतं.. घरातल्या परंपरा आणि सवयी तिनेच शिकवल्या होत्या…थोड्याश्या अपमानाने तिने दुसरीकडे राहायचा निर्णय घेतला होता, पण तो किती चुकीचा होता हे तिला आता समजलं…कारण आपण ‘मोठे’ असतो तेव्हा ‘त्याग’ आणि ‘सहनशीलता’ अंगी बाळगावी लागते हे तिला कळून चुकलं….

वृषाली तिचा हा निर्णय ऐकून जरा चिंतेत पडते..वहिनीने असा निर्णय का घ्यावा? केवळ छोटुमुळे? ती मनाली कडे गेली..

“वहिनी, भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावताय असं नाही वाटत तुम्हाला?”

“स्वातंत्र्यासाठी आम्ही वेगळे राहणारच नव्हतो…”

“मग काय कारण होतं?”

“आता मला बोलायला लावू नकोस..”

“मला कारण समजलंच पाहिजे…”

“मला मूल होत नाही म्हणून होणारा अपमान, आणि विशालना पैश्याच्या नुकसानीवरून ऐकावे लागणारे बोल..हे सगळं असह्य झालेलं आम्हाला..”

“काय?? हे कारण होतं?? पण मी समजत होते की…घरात राहून तुम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही, प्रायव्हसी मिळत नाही, तुम्हाला पूढे जाता येत नाही म्हणून…आणि कसला अपमान वहिनी? मान्य आहे सुरवातीला मी तुम्हाला छोटू जवळ येऊ देत नव्हते..पण आईचं काळीज समजून घ्या…आणि झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते…आणि विशाल भाऊंना वाटत असेल की महेशना त्यांचाबद्दल गैरसमज असेल… पण तसं
काहीही नाहीये…उलट मोठा भाऊ म्हणून त्यांना भाऊजींबद्दल कमालीचा आदर आहे…”

मनालीला हे ऐकून हलकं वाटतं…

“माझा जाण्याचा निर्णय मी मागे घेते…”

घरात वातावरण अगदी वेगळंच होतं… तेव्हाच दारात करुणा चा नवरा येऊन ठाकला…

“तुम्ही?”

“हो..तुला न्यायला आलोय…”

“मी येणार होते…पण…”

“समजलं मला…आता आवर आणि चल..”

राघवेंद्र ला पाहून घरातले सगळे बाहेर येतात..

“दादा…? कळवलं नाहीस येतोय ते…” विशाल म्हणाला…

“त्याचंच घर आहे…त्याला कशाला कळवायला पाहिजे. सासरेबुवा चिडक्या सुरात…

“भाऊजी या…जेवायला वाढू का लगेच? की आधी चहा घ्याल?”

“भाऊजी दमलेला दिसताय…जरा आराम करून घ्या..”

राघवेंद्र हे बघून आश्चर्यचकित होतो… घरात सर्वजण एकत्र? आणि इतक्या आपुलकीने चौकशी?

सासरेबुवा राघवेंद्रची गळाभेट घेतात..

“बाळा सगळं नीट आहे ना तिकडे?”

“हो..”

राघवेंद्र च्या डोळ्यातली दुःखाची लकेर करुणा ला दिसून येते..

“करुणा, निघायचं?”

“हे काय? आलात आणि लगेच निघालात पण?”

“होना दादा, असं काय करतोस…2 दिवस रहा की..”

भाऊ आणि त्यांच्या बायका आग्रह करत होत्या, पण राघवेंद्रच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं, ते करुणा ने ओळखलं..

“चला हातपाय धुवून घ्या, खोलीत..”

राघवेंद्र खोलीत जातो, करुणा खोलीत येते आणि दार लावून घेते..

“अहो, काय झालंय तुम्हाला?”

राघवेंद्र एकदम रडून पडतो…

“अहो??? हे काय?? काय झालंय? हे बघा मला असं टेंशन मध्ये आणू नका…सांगा…काय झालंय..”

“माझी नोकरी गेली गं… आमचा मालक अचानक पळून गेला आणि…”

करुणा खाली बसली…दाराबाहेरून काहीतरी पडल्याचा आवाज आला…करुणा ने दार उघडलं तर सासरे खाली कोसळले होते..

“बाबा? काय झालंय? उठा बाबा..”

दोघेही बाबांना आत नेतात…राघवेंद्र सगळी परिस्थिती सांगतो…

“आता मला इथेच काहीतरी काम पाहावं लागेल..”

“परत जा मुंबई ला…इथे काहीही नाहीये…” बाबा म्हणतात…

“बाबा, यावेळी मी ऐकणार नाही…आम्हाला इथेच राहायचं आहे, तुमच्या सोबत…आमच्या कुटुंबासोबत..”

“कशासाठी? इथल्या लोकांची अवहेलना सहन करायला?”

“बाबा आता सगळे किती बदलले आहेत पाहिलत ना तुम्ही?”

“पण..”

“तुम्ही आराम करा…उद्या बोलू आपण..”

करुणा त्या दिवशी रात्री खूप वेळ विचार करते…

“नोकरी गेली…पण एक संधी चालून आलीये..रामराज्य बनवायची….

राघवेंद्र ला काम मिळणं..
विशाल ला आत्मसन्मान मिळणं…
वृषाली चं स्वप्न पूर्ण होणं..
मनाली ची कूस उजवनं..
तारा ला मोठेपणा मिरवता येणं..
महेश आणि प्रतापला एका उंचीवर नेणं…
काय करता येईल?
हे सगळं कशातून शक्य होईल?

काहीही सुचत नसतं.. मग करुणा सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांच्या फोटो समोर हात जोडते..खिडकीतून जोरात हवा येते आणि एक कागद करुणा च्या पायाजवळ येतो..

एका कागदावर एका मोठ्या जमिनीचा विस्तार असतो…त्यावर कुठले व्यवसाय सुरू करता येतील याचं एक कच्चे काम केलेले असते…

क्रमशः

रामराज्य (भाग 10) ©संजना इंगळे

marathi katha, story of a marathi family, story of a joint family, ramrajya, lord rama, must read marathi story
Ramrajya

29 thoughts on “रामराज्य (भाग 9) ©संजना इंगळे”

  1. Titles that do this embody Thunderstruck, Mega Fortune and Wizard of Oz. For 1xbet instance, if a slot sport payout percentage is ninety eight.20%, the casino will on common pay out $98.20 for every $100 wagered. A computerized model of a traditional slot machine, video slots tend to include particular theming elements, similar to themed symbols, as well as|in addition to} bonus games and extra ways to win. To keep your money and personal information secure while playing on-line, do your research.

    Reply
  2. Palatable blog you procure here.. It’s obdurate to assign strong quality belles-lettres like yours these days. I really respect individuals like you! Rent care!!

    Reply
  3. Facts blog you be undergoing here.. It’s severely to assign great calibre script like yours these days. I justifiably respect individuals like you! Rent care!!

    Reply
  4. Proof blog you have here.. It’s severely to on elevated quality script like yours these days. I justifiably recognize individuals like you! Withstand guardianship!! prohnrg

    Reply

Leave a Comment