मनस्थिती आईची…मुलाच्या शाळेचा पहिला दिवस असणाऱ्या सर्व आयांना समर्पित

आज कितीतरी वर्षांनी ती आरशासमोर खुर्ची टाकून बसली, स्वतःला एकदा न्याहाळत..

आज चक्क 5-6 पांढरे झालेले केस तिला जाणवले, डोळ्यांभोवती थकवा स्पष्ट जाणवू लागला, चेहऱ्याची त्वचा तर एकदम निस्तेज झाली होती..

तिने कंगवा डोक्यातुन फिरवला, अलगदपणे..

एरवी असं निवांत केस कुठे विंचरता येत होते,

सकाळी नवऱ्याच्या डब्याची धावपळ, घरातली कामं, त्यात मुलांची अंघोळ, नाष्टा..

कंगवा डोक्यातून फिरवत नाही तोच लेकरू काहीतरी उद्योग करून घरभर पसारा करायचं..

तेवढ्यात कचरागाडी यायची, गॅसवर काहीतरी ठेवलेलं असायचं त्याच्याकडे अर्ध लक्ष, दूध उतू न जाण्यासाठी कसरत ती वेगळी,

कामवाली ची वाट बघत दाराकडे अर्ध लक्ष..नाष्टा जिरत नाही तोच मुलांच्या आरोळ्या..”आई भूक लागली”.

मग पुन्हा फोडणी देऊन समोर डिश आणायची..

तोच लेकरू म्हणतं,

“मला हे खायचं नाही..”

मग परत डबे चाफलायचे..

सगळं करत करत दुपार व्हायची..

लेकराला पटकन जेवू घालून झोपवायचं असं ती रोज ठरवायची..

पण लेकरू सगळे प्लॅन फ्लॉप करायचं..

कसंबसं झोपलं की म्हणायचं…”हुश्श…”

मग जरावेळ मोबाईल बघायचा आणि पडायचं..

डोळा लागत नाही तोच लेकरू सेवा करवून घेण्यास जागं…

तिला सगळं आठवलं,

पण आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस,

सकाळी धावपळ झाली, पण लवकर कामं आवरून झाली..

मुलं शाळेत निघून गेली..नवरा ऑफीसला निघून गेला..

घरी ती एकटीच होती..

पसारा भरपूर होता, पण तिने दुर्लक्ष केलं..

स्वतःला छानपैकी तयार केलं आणि मोबाईल घेऊन बसली..

व्हाट्सअप्प मेसेज, स्टेट्स, फेसबुक, इन्स्टाग्राम..सगळं सगळं मनसोक्त पाहिलं…छानपैकी चहा केला आणि निवांत प्यायला बसली..

आज कुणी तिला सतावणार नव्हतं..

ती खुश होती, आज तिला स्वतःचा असा वेळ मिळाला होता..

टोपलीतून एक आंबा काढला, चव जिभेवर रेंगाळत राहिली..

काही क्षण स्वतःसाठी मनसोक्त जगली.

पण शेवटी आईच ती,

असं स्वतःसाठी इतका वेळ दिल्यावर तिला चुकल्यासारखं झालं..

लेकरू आवाज देतंय असा भास होऊ लागला..

घड्याळाकडे लक्ष गेलं..

अजून अडीच तास बाकी..

तिला करमेना..

लेकराची आठवण येऊ लागली..

इकडून तिकडे येरझारा घालू लागली..

काय करावं सुचेनासे झाले..

कसंबसं आवरून लेकरू यायची वाट बघू लागली..

निवांतपणाचा आनंद आणि रुखरुख या दोन्ही भावना फक्त एकच व्यक्ती अनुभवू शकते..
ती म्हणजे,

“शाळेचा पहिला दिवस असणारी आई…”

(आज शाळेत पाठवलेल्या सर्व मुलांच्या आयांना समर्पित, याच निवांत वेळेत ब्लॉग वाचताय ना 😊)

©संजना सरोजकुमार इंगळे

381 thoughts on “मनस्थिती आईची…मुलाच्या शाळेचा पहिला दिवस असणाऱ्या सर्व आयांना समर्पित”

  1. medication from mexico pharmacy mexican border pharmacies shipping to usa or mexican mail order pharmacies
    http://katiefreudenschuss.com/termin.php?veranstaltung=freudenschuss+plus&tag=mo&datum=19.12&zeit=20%3A00&location=hamburg&stadt=schmidt+theater&info=freudenschuss+plus…%0D%0A%0D%0A…ist+wie+ein+gelungener+abend+mit+guten+freunden.+ehrlich%2C+spontan+und+voller+%DCberraschungen.%0D%0Akatie+freudenschuss%2C+s%E4ngerin%2C+musikerin+und+sachensagerin+aus+hamburg%2C+liebt+es+gastgeberin+zu+sein.+in+ihrer+brandneuen+show+l%E4dt+sie+nun+k%FCnstler+und+k%FCnstlerinnen+auf+ihr+sofa+und+die+showb%FChne+ein%2C+um+in+hamburgs+bekanntestem+kieztheater+gemeinsam+mit+ihnen+einen+fulminanten+abend+zu+erleben.%0D%0Ain+heimeliger+atmosph%E4re+wird+gesungen%2C+getrunken%2C+geplaudert%2C+improvisiert+und+musiziert%2C+und+das+publikum+ist+ganz+nah+mit+dabei.%0D%0Azu+%84freudenschuss+plus%85%93+kommt+man+als+gast+und+geht+als+freund.%0D%0Adiesmal+dabei%3A+regy+clasen%2C+carrington-brown+und+rolf+clausen&url=mexicopharmacy.cheap%20 medicine in mexico pharmacies
    mexican mail order pharmacies mexican border pharmacies shipping to usa and mexican rx online purple pharmacy mexico price list

    Reply
  2. Hey! Do you know if they make any plugins to help with SEO?
    I’m trying to get my website to rank for some targeted keywords but I’m not seeing very good
    gains. If you know of any please share. Many thanks!
    You can read similar art here: Blankets

    Reply

Leave a Comment