Marathi story |
तेजु आपल्या वडिलांजवळ जाते..
“डॅड… डॅड उठ…तू मला सोडून जाऊ शकत नाहीस…”
तेजु स्वतःला आवरू शकत नव्हती…तिने आईकडे पाहिलं… आई तेजुवर आधीच रागावलेली होती…आईने तेजुकडे पाहिलही नाही…मग तेजुचा मामा तिला तिथून घेऊन गेला आणि तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला…
वातावरण अगदी स्तब्ध झालेलं…बाहेर कार्यकर्ते येऊन एकच धुमाकूळ घालत होते, मीडिया वाले ताटकळत उभे होते, गर्दीला सावरत नाईकांची अंतयात्रा निघाली…
“आत्ता येतेयस?? तुझे बाबा कधीचे तुला बोलावत होते..त्यांची तब्येत खालावत चालली होती… पण तुला आपल्या वडिलांबद्दल काही वाटलही नाही??”
“आई…मला कुठे असं सांगितलं की बाबांना बरं नाहीये म्हणून…” तेजु रडतच म्हणाली..
“त्यांनी मनाई केली होती…तुला जर असं सांगितलं तर तू काळजी करशील… नाहीतर तुला वाटेल की मुद्दाम तू येण्यासाठी आम्ही नाटक करतोय म्हणून…”
मामा पुढे येऊन त्यांना गप करतात..
“बास आता…ज्याला जेव्हा जायचं तो जातोच…ताई…पुढे काय??”
तेजुची आई डोळे पुसते…
“कार्यकर्त्यांना बोलवा…नाईक साहेबांचा मुख्यमंत्री काळ संपत आलेला आणि निवडणूकाही तोंडावर आल्या आहेत…आपला उमेदवार ठरवायला हवा आता..”
“आई?? बाबा जाऊन 2 दिवस झाले नाही आणि तू..”
“बाळा…बाबा फक्त तुझे नव्हते… पूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांनी आपली मानली होती…केवळ घराचा विचार त्यांनी कधी केलाच नव्हता.. ही जनताच त्यांचं कुटुंब होतं.. अश्या वेळी मी हतबल होऊन चालणार नाही…खूप मोठी जबाबदारी सोडून गेले आहेत हे..”
तेजु ला खरं तर रागच आला…बाबा सोडून गेले आणि आई पुन्हा राजकारणाकडे पाहायला लागली म्हणून…
तेजु गर्दीतून सुटका म्हणून बंगल्याच्या टेरेस वर गेली…खाली कार्यकर्ते आणि जनतेची गर्दी अजूनही होती…तिचं लक्ष कोपऱ्यातल्या एका माणसाकडे गेलं…तो तिथे एकटाच होता आणि झाडाला दोर बांधत होता…
“ए थांब….”
तेजु पळतच तिकडे गेली…त्याच्या हातातून दोर हिसकवला..
“काय करताय तुम्ही???”
“का जगू मी सांगा?? माझा पोशिंदा नाही राहिला…या देवमाणसाने मला रस्त्यावरून उचलून माणसात आणलं…माझे दोन वेळचे खायचे वांदे होते…पण या माणसाने मला जीवनदान दिलं…”
तेजु ने त्या माणसाला कार्यकर्त्यांच्या हवाली केलं…
तिथे सर्व मंडळी तेजु भोवती जमा झालेली..तेजु सर्वांच्या मध्ये उभी…सर्वजण वेगळ्याच नजरेने तिच्याकडे पाहत होते..
एक जण म्हणाला..
“नाईक साहेबानंतर आता कोण बघेल जनतेला?? कोण होईल आमचा पोशिंदा??”
“कुण्या ऐरा गैरा चालणार नाही…त्याचंच रक्त हवं…”
तेजु ला त्यांचा इशारा समजला…तिने तातडीने तिथून काढता पाय घेतला…खोलीत आल्यावर तिने मोबाईल वर लारा चा मेसेज पाहिला…
“We are with you…I know it’s really a tough time for you…take care…I hope you will return soon..”
लंडन ला ती आपलं सगळं सोडून आली होती…आता तिला परत जावंसं वाटू लागलं…इथे राहिली तर बाबांच्या आठवणीत अजून त्रास होईल हे तिला समजलं..
ती आईजवळ गेली…आई कार्यकर्त्यांशी बोलण्यात मग्न होती…इतक्यात एक वकील येतात आणि तेजु शी बोलतात..
“नाईक साहेबांच्या इस्टेटीबाबत काही फॉर्मलिटीज पूर्ण करायच्या आहेत…मला त्यांचे काही documents हवे आहेत…”
“बसा तुम्ही..मी आणते..”
वकिलांना बसवून ती बाबांच्या खोलीत जाते..कागदपत्र शोधत असताना तिला कपाटात एक डायरी सापडते..
सगळी कागदपत्रे जमा करुन ती वकिलांना देते आणि त्यांना निरोप देते…हातातली डायरी उघडून बघते…बाबांनी लिहिलेलं असतं…
“ही जनता म्हणजे माझं सर्वस्व आहे…तिच्या सेवेसाठी जीवाची बाजी लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही…पण काही गोष्टी मनाला काहीतरी इशारा करून जातात…ज्या पद्धतीने माझ्या शरीरात बदल होताय त्याअर्थी माझं आयुष्य जास्त दिवस नसणार हे आता समजू लागलंय.. या क्षणी माझी मुलगी जवळ हवी असं वाटतंय, पण तिच्या आयुष्याला धक्का लागू देणार नाही…देवाची कृपा म्हणून मुख्यमंत्री काळ संपत असताना मला या आजाराने जखडल…माझं काम मी पूर्ण केलं…पण उद्या काय?? या जनतेला कोण वाली असेल? कोण घेईल ही जबाबदारी? मी जरी नसलो तरी माझं रक्त हा भार उचलेल अशी अपेक्षा आहे…पण तेजु? नाही…तिच्या आयुष्याला मी धक्का लावणार नाही..मी तिच्यावर जबरदस्ती करणार नाही…”
ते वाचून तेजु च्या मनात स्वतःबद्दल संतापाची लाट उसळते… समोरच्या आरशात तिचं प्रतिबिंब दिसत असताना हातात जे येईल ते उचलून त्या आरशाला ती मारून फेकते….पण त्या आरशात तिला वेगळंच दिसू लागतं…
आधी बाबांचा चेहरा दिसतो, मग बंगल्या बाहेरची प्रचंड गर्दी, जनता, गळ्याला फास लावण्याचा प्रयत्न करणारा तो माणूस…
“माझ्या बाबांनी खरंच इतकं मोठं साम्राज्य उभं केलं होतं? इतकं प्रेम दिलं होतं जनतेला की बाबांसाठी ती मारायला तयार होती? आणि त्यांच्या नंतर ज्या व्यक्तीची
ते वाट बघत होते अशी मी…बार मध्ये मजा करत बसली…?”
तिच्या मनात काहूर उठतं.. आई ज्या कार्यकर्त्यांशी बोलत असते ती तिथे जाते…
तिला तिथे पाहून आई ला विशेष वाटतं..
तेजु त्यांच्यात जाऊन बसते…आई सांगत असते..
“आपला पुढचा उमेदवार कोण असेल हे आता शोधा… मान्य आहे की हे अवघड आहे..कारण आपला उमेदवार हा नाईक साहेबांचं प्रतिरूप असायला हवा…केवळ जिंकण्यासाठी नाही, पण जनतेची जबाबदारी एका योग्य माणसाकडे असावी म्हणून….”
सर्वजण एकमेकाकडे पाहू लागतात.असा योग्य उमेदवार कुठून आणावा हाच सर्वांपुढे प्रश्न असतो…त्यांची मिटिंग उरकते… आई तेजु ला सांगते..
“बाळा तू जा आता परत…इथे हे रोजच होत राहील आणि तुला काही ते आवडणार नाही..”
तेजु ला लंडन ला जावंसं वाटत होतं पण बाबांची ती डायरी वाचल्यापासून तिला काही चैन पडेना…कशीबशी तिने तयारी केली… आपली बॅग भरली, पासपोर्ट घेतला आणि लारा ला मेसेज केला..”I am coming back to london..”
ती बाबांच्या खोलीत एकदा जाऊन आली… नंतर त्यांच्या ऑफिसात गेली….तिथे काही माणसं आईची वाट बघत अगोदरच बसलेले…त्यांचं बोलणं तिच्या कानावर पडतं..
“आता तूच होणार बघ मुख्यमंत्री.. तुझं नाव आम्ही पुढे करतो…पण आपली डील लक्षात आहे ना? 5 करोड प्रत्येकी??”
तेजु ते ऐकते अन तिचा एकच संताप होतो…
इतक्यात आई येते…
“तेजु? गेली नाहीस अजून?? बस इथे, मी कार्यकर्त्यांशी बोलून घेते…”
तेजु बॅग उचलते आणि बाहेर काही वेळ बसते…कार्यकर्त्यांशी बोलून झाल्यावर ते बाहेर जायला निघतात, आईही त्यांच्यासोबत असते..
“तेजु बाळ…सोडायला लावू का द्रायव्हर ला?”
“तेजु मॅडम नमस्कार…मी भावी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार…खरं तर या पदासाठी साहेबांना तुम्हीच हव्या होत्या…पण तुम्हाला हे सगळं आवडत नाही असं कळलं.. असो, काही हरकत नाही…”
तेजु बॅग घेऊन बाहेर पडते… अन तिला ती जागा दिसते, जिथे तो माणूस गळफास घेऊ पाहत होता…
ज्या माणसासाठी ही माणसं मारायला तयार झाली…त्याची सत्ता आता या लालची माणसांजवल जाईल… हे सत्य फक्त मला ठाऊक आहे…शेवटच्या क्षणी मी वडीलांजवळ नव्हते…पण माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बाबांच्या स्वप्नाला तोलून धरेल…
तिच्या हातातली बॅग झटकन खाली पडली…तो आवाज आला तसे सर्व कार्यकर्ते पाहू लागले…
ती मागे फिरली…आई जवळ गेली…
“मी परत जाणार नाहीये…”
“मग इथे राहून काय करशील??”
“बाबांचं रक्त आहे…बाबांचं स्वप्न तोलून धरेन…”
क्रमशः
👌👌👌
After speaking, Joan Grisby s figure immediately walked forward, Nancie Lanz and Laine Lupo looked at each other With one glance, without concealing the joy in his eyes, he hurriedly followed closely As for the four eyes, because of the news that Tama Mongold was about to leave the customs, Dion vitamins that lower blood sugar how to buy priligy im 16 years old Why is the number of overweight people increasing when the weight loss industry is booming and we have more healthy food and exercise options than ever before