हनी ट्रॅप-1

अगदी दोन सेकंद जरी तिने उशीर केला असता तरी तिचं कुंकू पुसलं गेलं असतं..

नवऱ्याने आज सुट्टी घेतली होती,

दोन दिवसांपासून डोकं दुखतंय म्हणून झोपून होता,

डॉक्टर कडे जायलाही नकार देत होता,

ऑफिसचा लोड, डेडलाईन.. ही कारणं देत होता,

तिनेही विचार केला,

दोन दिवस घरी थांबेल, आराम करेल, मग वाटेल बरं..

पण तिला कुठे माहीत होतं,

त्याच्या डोक्यात भलतंच वादळ सुरू होतं ते,

संध्याकाळसाठी भाजीपाला संपलेला,

दरवेळी तोच जाई,

पण आता त्याला सांगायला नको, आपणच जावं,

असा विचार करत तिने पर्स आणि पिशवी घेतली अन बाहेर निघाली,

नवऱ्याला सांगितलं,

“चावी घेऊन जातेय, अर्ध्या तासात येईन परत”

ती निघाली,

लिफ्टने खाली पार्किंगमध्ये आली,

मोबाईल ठेवण्यासाठी पर्समध्ये हात घातला,

तिच्या लक्षात आलं,

पर्समधून पैसे काढून ठेवले होते,

आणि बऱ्याच विक्रेत्यांकडे gpay नसतं,

ती पैसे आणायला परत वर गेली,

चावीने दार उघडलं,

बेडमध्ये गेली आणि तिचा थरकापच उडाला,

नवरा गळफास लावून घेत होता,

****

भाग 2

हनी ट्रॅप-2

भाग 3

हनी ट्रॅप-3 अंतिम

4 thoughts on “हनी ट्रॅप-1”

Leave a Comment