हक्क-3

 

नवऱ्याला मिळालेला नेकलेस सुद्धा नणंदेला गेला होता..

नवरा घरी आला..

तिचं अवसान आज वेगळं दिसत होतं..तो सावध झाला..

तिने एकेक गोष्टीचा जाब विचारला..

त्याला समजलं, आपलं पितळ उघडं पडलं..

पण त्यात त्याला काहीही चुकीचं वाटत नव्हतं..

“तुला काय करायचं आहे? माझा पगार, मी ठरवीन काय करायचं ते”

“ठरवा ना, तुम्हीच ठरवा…हे सगळं मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी खुशीने स्वतःहून तुमच्या बहिणीला हार घातला असता…प्रश्न पैशाचा किंवा सोन्याचा नाहीये…प्रश्न विश्वासात घेण्याचा आहे, बायको म्हणून सत्य सांगण्याचा आहे..”

त्याने ऐकून घेतलं,

वर तिलाच दटावलं….

तुला राहायचं तर नीट रहा…”

तिने अखेर धमकी दिली,

“माझ्या कर्तव्यात मी चुकत नसेल तर मला माझे हक्कही मिळायला हवेत..नाहीतर..”

“नाहीतर… हे घर मी सोडून जाईल..”

तो हसायला लागला…

ही जाणार कुठे? माहेरी अठरा विश्व दारिद्र्य…

त्याला वाटलं दोन तीन दिवस राग धरेल आणि विसरून जाईल..

लक्ष्मीपूजन चा दिवस उजाडला…

तो सकाळपासून मित्रांसोबत फिरायला बाहेर गेलेला…आणि नेहमीप्रमाणे पूजेसाठी आपल्या बॅचलर मित्रांना घरी घेऊन आला…

पण घर सुनसान…

त्याला बायको दिसत नव्हती..

आई आणि बहीण नट्टापट्टा करण्यात मग्न..

पूजेची काहीच तयारी नाही,

ओटा पूर्ण मोकळा, कसला स्वयंपाक नाही…

त्याने आई बहिणीला विचारले,

“अरे आम्ही तयारी करत होतो,तिला पहिलंच नाही आम्ही…आम्हाला वाटलं स्वयंपाक करत असेल..”

म्हणजे आजवर आई आणि बहीण घरात कशातच लक्ष देत नसायच्या हे त्याला कळलं..

तो एकेक खोली शोधू लागला तसतशी त्याची धडधड वाढली..

ती खरंच घर सोडून गेलेली, मुलाला घेऊन…

घर सुन्न पडलं होतं…

लक्ष्मीपूजन च्या दिवशीच घरातली लक्ष्मी निघून गेलेली…

तो डोक्याला हात लावून बसला…

तिकडून बहिणीचा जोरात किंचाळायचा आवाज आला..

ती बाहेर उभी असताना दोन चोरट्यांनी तिच्या गळ्यातला हार ओढून नेलेला…

तिला पाहायला जात असताना आई धपकन दारात पडली…

लक्ष्मी गेली आणि अवकळा सुरू झाली…

म्हणून जुनी लोकं म्हणतात,

घरातल्या लक्ष्मीला कधी दुखवू नये,

तिला तिचा हक्क द्यायलाच हवा..

अन्यथा तुम्ही कितीही प्रयत्न करा…

तुमचा सर्वनाश निश्चित…

समाप्त

13 thoughts on “हक्क-3”

  1. घरच्या लक्ष्मीला दूखवू नये. तीचा योग्य तो मान द्यायलाच हवा. बायको म्हणजे नूसती नवर्याच्या घरचे सर्व करणारी मोलकरणी नव्हे.

    Reply
  2. खूप छान वाटली कथा पण जरा त्याला अक्कल कशी आली हे जरा सांगितलं असतं तर मज्जा आली असती…

    Reply
  3. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा सहनशील आणि समजूतदार स्त्रियांनाच असे अनुभव अभावितपणे समोर येतात.

    Reply
  4. असे नवरे हातातल सगळ निसटून गेल त२ी त्याचा माज उतरत नाही.

    Reply
  5. कमी जास्त प्रमाणात सारीकडे असेच असते. एरवी भांडण करणारी भावंडे लग्नानंतर जरा जास्तच एकत्र येऊन विशेष करून बहीण,आर्थिक लाभ उठवत असते कधी भावनिक होऊन कधी गरिबीचे नाटक करून स्वतःची तुंबाडी भारतात वर कौटुंबिक अत्याचार करतात.

    Reply
  6. खूप सुंदर कथा, कथा नाही ही तर अती समजदार गृहिणीची व्यथा. तिच्यात मला माझं प्रतिबिंब दिसलं,पहिल्या दोन भागात. धस्स झालं काळजात…..

    Reply
  7. बायकोने कितीही केलं तरी समाधानी नसतात च हे नवरे… उलट गैरफायदा घेतला जातो…😏

    Reply
  8. खरं आहे ज्याने घरातील स्त्रीचाग ती आई, बहीण, बायको, वहिनी, मुलगी कुणी असो मान ठेवला नाही त्याचा सर्वनाश नक्कीच होतो…आपल्या आई, बहिणी विषयी मान सन्मान हवाच पण आपलं सर्वस्व त्यागून फक्त तुमच्या भरवश्यावर आलेल्या तिचा ही तेवढाच मान ठेवावा

    Reply
  9. अति समजुतदारपणाचा नवरा किती फायदा घेतो.पत्नीसाठी नवरा म्हणून आपलं काही कर्तव्य आहे याची जाणीव कशी नाही याचं नवल वाटले

    Reply

Leave a Comment