हक्क-2

बाकी घर खर्चात त्यातली काहीही मदत होत नसे…

पण ती काय बोलणार..

एके दिवशी नणंदबाई सोन्याचा नेकलेस घालून घरी आल्या..

आईने भरभरून कौतुक केलं..

पेन्शनच्या इतक्याश्या पैशात एवढं महागडं कसं परवडत असेल?

तिला प्रश्न पडायचा,

पण विचारणार कोणाला…

त्या दिवशी घरातले सार्वजण बाहेर गेलेले..

घरी नवऱ्याच्या कंपनीतलं एक जोडपं घरी आलं..

दोघे नवरा बायको, तिच्या नवऱ्याचा तो मित्र…

तिने त्यांना घरात बोलावलं..

तिचं लक्ष सहज त्या बाईच्या नेकलेसकडे गेलं..

“अय्या सेम असा हार माझ्या नणंदेने केला..”

त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले,

तिला लक्षात आलं प्रकरण,

तिने तिला किचनमध्ये नेलं आणि म्हणाली,

“सेम हार म्हणजे? तुझ्या नवऱ्याने नाही दिला तुला?”

“मला नको हो इतका महागडा हार, खरं तर ओझं होतं मला..मला काही हौस नाही याची..”

“उगाच सारवासारव करू नकोस, तुला माहीत नाही? यांच्या कंपनीतून हा हार सर्व कर्मचाऱ्यांना गिफ्ट मध्ये दिलाय…आणि दरवर्षी प्रमाणे मोठी रक्कम बोनस म्हणून पण..”

“दरवर्षी प्रमाणे म्हणजे?”

त्या बाईच्या लक्षात आलं..हिच्या नवऱ्याने हिला अंधारात ठेवलं होतं..

“तुला पचवणं कठीण जाईल..पण तुला हे काहीच माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटतंय…तुझ्या नवऱ्याने तुला हे सांगायला हवं होतं…”

ते जोडपं निघून गेलं..

तिच्या डोळ्यात अंगार दिसू लागला..

आत्तापर्यंत स्वतःच्या गरजा आणि हौसेचा त्याग करून ती संसार चालवत गेली..

सोनं तर दूरच, साधी आवडती वस्तूही कधी घेतली नव्हती..

तिला वाटायचं नवऱ्याचा पगार कमी आहे,

कशाला उगाच त्याला त्रास द्यावा…

आपली हौस होत नाही हे बघून आधीच त्याला जास्त त्रास होत असावा..

पण सगळा गैरसमज होता..

सगळा पैसा सासूबाई आणि नणंदेला जाई..त्यांची हौस पुरवली जाई..

भाग 3

2 thoughts on “हक्क-2”

Leave a Comment