हक्क-1

“तुम्हाला नसतो का हा दिवाळीचा बोनस?”

तिने गदगदून विचारले,

कित्येक वर्षांपासून दिवाळीला चांगली साडी घेतली नव्हती..

यावेळी हौस म्हणून नाही पण निदान शेजारी पाजारी स्वतःची लाज राखायला तरी घ्यावी म्हणून तिने विचारलं..

तो मौन होता..

त्या मौनातच तिला त्याच्या वेदना कळून आल्या,

तीच म्हणाली,

“काही नाही हो, सहजच विचारलं..”

तिचा हिरमोड झाला खरा,

तिचा काटकसर करत संसार सुरू होता..

महिनाअखेरला जीव अगदी मेटाकुटीला यायचा..

घरात ती, तिचा नवरा, तिची सासू, नणंद आणि लहान रवी असं कुटुंब..

तिच्या कर्तव्यात ती कधीही चुकली नाही..

आणि जर कधी चुकलीच तर तिचा नवरा तिची चांगलीच खबर घ्यायचा..

“घरात राहायचं असेल तर माझ्या आईशी आणि बहिणीशी नीट वागावं लागेल”

अशी ताकीदच दिलेली त्याने तिला..

तीही कुठे जाणार?

करत होती सहन सगळं..

दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपली..

तिने घराची आवराआवर सुरू केली..

सासू आणि नणंद खरेदीला गेल्या,

गेलेल्या सासऱ्यांचं पेन्शन सुरू होतं त्यामुळे तो खर्च दोघींची हौस पूर्ण करण्यात जाई..

****

भाग 2

हक्क-2

भाग 3

हक्क-3

Leave a Comment