स्त्रीधन-1

रंजना काकू आपल्या सोडून गेलेल्या आईचा सोन्याचा हार कवटाळून बसल्या होत्या..

रंजना काकू तश्या वयस्करच, पण आई शब्द म्हटला की भलेभले लहान होऊन जातात..

एका आजाराचं निमित्त झालं आणि रंजना काकूंची आई सोडून गेली..

आई गेली अन दहा दिवस मुली माहेरी राहिल्या,

सगळे विधी झाले,

शेवटच्या दिवशी भावाने आईचे दागिने बाहेर काढले आणि बहिणींसमोर ठेवले,

“तुम्हाला जे हवंय ते घेऊन टाका यातून”

आई गेली आता हे घेऊन काय करू?

मुली भावनिक झाल्या,

पण माणसाच्या जातीला रडून कसं चालेल?

म्हणून भावाने आवंढा आतच गिळला, आणि म्हणाला..

“सोन्या नाण्यासाठी भांडणारी भावंडं आपण नाही, पण हे असंच ठेऊन कसं चालेल? प्रत्येकाने काहीतरी घ्या, आईची आठवण म्हणून”

सामंजस्याने सर्वांनी एकेक दागिना वाटून घेतला..

मुली आपापल्या घरी आल्या,

रंजना काकु आईची आठवण आली की दागिना काढून रडत असत..

दिवस सरतात तसं दुःखही सरतं..

रंजना काकूंच्या घरी सून आली..

तशी कमी शिकलेली, पण कर्तबगार..

***

भाग 2

स्त्रीधन-2

भाग 3

Leave a Comment