सूनबाईचा मित्र (भाग 11 अंतिम)

अनावधानाने का होईना, श्वेता आणि श्रीधर जोडीने नमस्कार करतात..श्रीधर श्वेताकडे बघतो..श्वेतालाही कळेना काय करावं. समोरून केदार हे सगळं बघत होता, त्यांच्या नजरेतूनच केदारला त्यांच्यात काही चालू असल्याची शंका येते. तो संतापातच गाडीत बसतो, बक्कळ पुरावा नसल्याने तो सरळ सरळ काही विचारूही शकत नव्हता. केदारला तसं काही श्वेतावर प्रेम वगैरे नव्हतं, पण बायको म्हणून अजूनही ती त्याचीच होती अन अधिकार गाजवायला तो विसरला नव्हता.

घरी आल्यावर सर्वजण आपापल्या कामाला लागतात, प्रभा आणि केदार समोरासमोर येतात.
आजूबाजूला कुणीही नाही हे पाहून प्रभा त्याला म्हणते,

“का आलास तू?? तुझं तोंडही पहायची इच्छा नाही माझी…”

“नको बघुस, मायरा ने नव्या घराची सोय केली की जाईन मी तिकडे..”

“वा…चांगलं आहे..”

“आता तुम्ही जर आम्हाला घरात घेतलं असतं तर..एक काम कर, या श्वेताला घराबाहेर काढ, तिला मूल होत नाही असं कारण सांग..आणि मी मायराशी लग्न करतो…मस्त सगळे एकत्र राहू आपण..”

हे ऐकताच प्रभा त्याच्या जोरदार कानाखाली मारते..

“लाज वाटते तुला असं काही बोलायला? खबरदार श्वेता बद्दल एक शब्द जरी काढला तरी..मूल न व्हायला ती नाही तू कारणीभूत आहेस…मला इथे तमाशा नकोय, नाहीतर लगेच बाहेर काढलं असतं तुला..”

केदार पाय आपटत निघून जातो..

संध्याकाळी एक तरुण मुलगा दार ठोठावतो..श्वेता दार उघडते…

“कोण पाहिजे??”

“क्रांती आहे का??”

“हो माझ्या खोलीत आहे..”

*****

श्वेता त्याला खोलीत नेऊन सोडते…आणि खाली येते.केदार तिथेच असतो..तो तिच्यावर ओरडायला लागतो..

“काय गं? हा श्रीधर कोण? काय संबंध आहे तुझा अन त्याचा?? लाज वाटत नाही का त्याच्यासोबत असं गावभर हुंदडायला..”

“अहो तुम्हाला सांगितलं ना ती क्रांती..”

“अरे सुभाष ऐक माझं…तसं काही नाहीये..”

“क्रांती?? कोण आहे हा??”

“मी हिचा होणारा नवरा…सुभाष..कॉलेजमध्ये असताना आमचं जुळलं ..आता लग्नही ठरलं..पण ही मात्र तिच्या घरी सापडेल तेव्हा खरं.. कायम इथेच .”

“ऐकलं?? म्हणे क्रांतीला श्रीधर आवडतो..खोटं बोलतेस?? क्रांतीचं नाव पुढे करून मला फसवतेस??”

असं म्हणत केदार तिच्यावर हात उचलायला जातो ..तोच हात श्रीधर अडवतो आणि जोरदार त्याचा कानफटात मारतो..

“स्वतः बाहेर हवे ते धंदे करायचे अन बायकोच्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवतोस?? लाज नाही वाटत??”

“आलास? तुझीच कमी होती…हा बघा, आमच्या बायकोचा दिलबर…काय दिवस पाहायला मिळालेत वा..”

एव्हाना घरातली सगळी मंडळी जमा होतात..

“जावईबापू अहो असं काही नाहीये हो..आमची मुलगी नाही हो तशी??”

“मला काय सांगताय, विचारा तुमच्या मुलीला..या श्रीधर सोबत प्रेमाच्या गप्पा मी स्वतःच्या कानाने ऐकल्या आहेत..”

श्वेता कावरीबावरी होते, इतके टोकाचे आरोप तिच्यासारख्या साध्या सरळ मनाच्या मुलीला सहन होत नव्हते..आता बाहेर पळत जावं अन विहिरीत उडी टाकून द्यावी असं तिला वाटू लागतं..

ती डोळे पुसत बाहेर पडायला जाते तोच प्रभा तिचा हात पकडते अन ओढत तिला परत घरात नेते..

“श्वेता सारख्या पवित्र मुलीवर माझ्या नालायक मुलाने आरोप केले अन तुम्ही खुशाल ऐकताय?? खरी गोष्ट काय आहे ऐकायचीय?? ऐका मग..

माझा मुलगा.. बाहेर एका मुलीसोबत त्याचं सूत जुळलं अन श्वेताला त्याने धोका दिला..बिचारी श्वेता, तिला यातलं काहीही माहीत नव्हतं…आम्ही आमच्या परीने मुलाला समजावलं, पण तो हाताबाहेर गेला होता…मग मी इथे आले, श्रीधरच्या डोळ्यात मला श्वेताबद्दल असलेलं निरागस प्रेम दिसलं..तिचा बालपणीचा मित्र, हेच तिचं प्रेम असेल हे सांगायची हिम्मतही नव्हती तिच्यात, लग्न करून आली अन स्वतःला तिने घरासाठी पूर्णपणे वाहून दिलं…श्रीधर बद्दल तिच्या मनात पुन्हा प्रेम फुलावं म्हणून मीच प्रयत्न केला..”

श्वेता साठी हे सगळे एकावर एक धक्के होते, इतर मंडळीही कान देऊन ऐकत होती..

“त्या दिवशी पिंट्याने मनातलं बोलून दाखवलं, की आजीला वाटत होतं की श्रीधर आणि श्वेता एकत्र यावे..तिथेच क्रांतीही आलेली..मग आम्ही सर्वांनी मिळून एक नाटक केलं..क्रांती श्रीधर च्या प्रेमात आहे असं सांगून श्वेताच्या मनातलं बाहेर काढायचं आणि श्रीधरलाही श्वेताचा सहवास आवडावा म्हणून क्रांतीने खोटं प्रेम आणि पत्राचं नाटक केलं..त्या निमित्ताने दोघांनी एकमेकांबद्दल मनातल्या भावना बाहेर काढल्या… आणि आज श्वेतावर उचललेला हात श्रीधरने रोखला…हेच ते प्रेम, ज्याची श्वेता हकदार आहे…”

श्वेताच्या आई बाबांकडे प्रभा हात जोडुज उभी राहते..

“हे बघा, माझा मुलगा नालायक निघाला, पण श्वेता मला मुलीसारखीच आहे..तिचं लग्न श्रीधरशी लावून द्या अन तिला तिच्या प्रेमाचा हक्क मिळवून द्या…”

सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. एक सासू आपल्या सुनेच्या प्रेमासाठी काय काय करते हे सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं..

***

क्रांती आणि सुभाष चं लग्न होतं, लागलीच श्वेता अन श्रीधरच्या लग्न असतं..

“पिंट्या…इकडे ये…हा घे डबा, मागे आचारी लोकं जेवण बनवताय ना, 4-5 गुलाबजाम आन उचलून..”

सुनेच्या लग्नातही प्रभाचा आगाऊपणा काही कमी होत नाही..

“चला…नवऱ्या मुलाला बोलवा…”

“श्रीधर..”

“आलो…अरे माझे बूट सापडत नाहीये…कुठे गेले..”

“असतील की इथेच…नीट बघ..”

“जावईबापू…बूट हवे असतील तर 3000 लागतील..”

वरील वाक्य कोण कोणास म्हणाले तुम्हीच सांगा 🤣🤣🤣

समाप्त

2 thoughts on “सूनबाईचा मित्र (भाग 11 अंतिम)”

Leave a Comment