सुवर्णमध्य-3

 पण घरातल्या सर्वांची मनं सांभाळून..

तिकडे त्याच्या आईच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला,

“मेलं या वयात अंगावर कामं पडताय, पोरी मस्त नटून थटून कामावर जाणार, आम्ही घरातलं बघत बसणार आयुष्यभर”

त्याला वाईट वाटलं,

संध्याकाळी प्रेझेंटेशन छान झाल्याच्या खुशीत ती घरी आली,

आल्यावर छानपैकी स्वयंपाक केला,

सगळे जेवायला बसल्यावर ती आनंदाची बातमी सांगणार होती,

की प्रेझेन्टेशन क्लाएंटस ला इतकं आवडलं की त्यांनी मला बेंगलोर ला visit करायची संधी दिली,

पण ती काही बोलणार तोच सासूबाई म्हणाल्या,

उद्यापासून लवकर उठत जा, माझ्याकडून काही कामं होत नाही, आणि कामवाल्या बायकांचं काही खरं नसतं,

नवराही म्हणाला,

आईचं अंग दुखतंय कालपासून, तरी तिने आज केलं,

आई मला काल सांगितलं का नाही? आपण कालच गेलो असतो ना डॉ कडे..

तू कामात व्यस्त होतीस,

तिचा सगळा मूडच गेला,

तर अश्या प्रकारे सुरवात झाली,

घरात धुसफूस,

एकमेकांबद्दल तिरस्कार…

सासूला वाटे सुनेने किमान आपल्यावर काही कामं पडू देऊ नयेत,

सुनेला वाटे सासूबाईंनी कधीतरी कामात मदत करावी,

सासऱ्यांना वाटे सून मुलाने आपल्या म्हातारपणी आपल्याला फिरवावं,

नवऱ्याला वाटे बायकोने आई वडिलांची सेवा करावी,

अपेक्षा.. अपेक्षा अन नुसत्या अपेक्षा…

मग अपेक्षाभंग..

आणि मग कौटुंबिक कलह…

लग्न होतं, दोन जीव एकत्र येतात,

पण त्याचसोबत जन्म घेतात त्या हजारो अपेक्षा…

सुनेला वाटतं आपल्या करियर मध्ये घरच्यांनी आपल्याला सपोर्ट करावा,

सासूला वाटतं आयुष्यभर केलेल्या कामातून निवृत्ती घ्यावी,

नवऱ्याला वाटतं बायकोची तक्रार यायला नको,

सासऱ्यांना वाटतं या निवांत क्षणी मुलांसोबत फिरण्याचा आनंद घ्यावा..

मुलाला वाटतं वडिलांचा काळ वेगळा होता, त्यांनी प्रत्येक गोष्टीत त्यांचं उदाहरण काढू नये…

या सर्व अपेक्षा जेव्हा एकमेकांना छेडल्या जातात तेव्हा उडतो भडका,

कौटुंबिक कलह..

म्हणूनच प्रत्येकाने याचा सुवर्णमध्य काढायला हवा,

या अपेक्षा समांतर दिशेने धावायला हव्या,

एकमेकांवर त्याचा परिणाम होऊ न देता,

सुनेने समजून घ्यावं, आयुष्यभर कष्ट केलेल्या सासूला आता निवांतपण हवं आहे,

सासूने समजून घ्यावं, काळ बदलला असून मुलीला कमावणे भाग आहे, त्यासाठी तिला हातभार गरजेचा आहे,

नवऱ्याने समजून घ्यावं की बायकोला घर आणि नोकरी अशी आपल्याहून दुप्पट कसरत आहे,

सासऱ्यांनी समजून घ्यावं की आज स्पर्धा प्रचंड वाढली आहे आणि मुलांची प्राथमिकता बदलली आहे,

मुलानी समजून घ्यावं की आयुष्यभर आपल्यासाठी राबलेला बाप आता परत मूल होऊ पाहतोय,

जेव्हा आपली वाट न सोडता एकमेकांच्या अपेक्षा समजून घेऊन सुवर्णमध्य काढता आला तरच आयुष्य सुखकर होईल…

त्यासाठी महत्वाचं आहे दुसऱ्याचा अपेक्षा जाणून घेणं,

आणि आपल्या अपेक्षा समजावून सांगणं,

त्यासाठी हवा संवाद..

मनाचा मनापर्यंत…

समाप्त

6 thoughts on “सुवर्णमध्य-3”

  1. नोकरी करून निवृत्त सासू जास्त cooperative असू शकते कारण तिन सर्व भोगलेल असत घरात तसच बाहेर. नोकरी करणार्‍या कोणाहीसाठी दोन्ही सांभाळणे सोप्पे नसते.

    Reply
  2. त्यामुळे घरातील मुख्य पुरुषाने ह्यातून मार्ग काढणे आवश्यक.

    Reply
  3. काय ऊत्तर देणार? समजुन घेणे।।मनाची समजुत घालण? गाडे पुढे ढकलणे।बस एवढेच हातात असते.

    Reply

Leave a Comment