सुवर्णमध्य-2

नाश्त्याला चिवडा वर काढला आणि कांदे टमाटे कापून सुकी भेळ बनवून ठेवली,

पटकन मुगाची डाळ टाकली,

पोळ्यांना बाई येणार होती,

ती रोज आठ ला यायची पण आज पत्ता नव्हता,

सव्वाआठ झाले,

तिचा फोन आला,

“ताई माझ्या मुलाची तब्येत बरी नाही तर आज मी काही येत नाही”

झालं,

आता पोळ्या केल्या नाही तर डबे कसे देणार?

8:25 झाले,

तिने पटकन कणिक मळलं,

आता पर्याय नव्हता,

सासूबाईंकडे गेली,

त्यांना म्हणाली,

“आई प्लिज आजच्या दिवस पोळ्या बनवा, बाई सुट्टीवर आहे”

सासूबाईंचे कालपासून अंग दुखत होते,

आज तिला सुट्टी टाकायला सांगून दवाखान्यात न्यायला लावू असा त्यांचा विचार होता,

मुलापेक्षा सून मनावर घेते हे त्यांना माहीत होतं,

त्यांनी हो म्हटलं तशी ती निर्धास्त झाली आणि ऑफीसला गेली,

इकडे सासूबाईंचे अंग खूपच दुखत होते,

कशाबशा पोळ्या केल्या,

नवऱ्याने पाहिलं,

बायको कामावर,

आणि आजारी आई स्वयंपाक करतेय,

आल्यावर बोलू तिला,

त्याने ठरवलं,

नाष्टा करताना त्याचे वडील त्याला म्हणाले,

चार दिवस यात्रेला जाऊन येऊ म्हटलं सगळे,

आम्हा दोघांना एकटं शक्य नाही,

तुम्ही दोघे सोबत असाल तर आधार वाटेल,

त्याचीही कामाची धावपळ,

सतत मिटिंग, workload,

“बाबा आम्हाला तर नाही शक्य, तुम्ही बघताय ना आमची धावपळ”

बाबांना वाईट वाटलं,

मुलाने एवढीशी ईच्छा पूर्ण करू नये?

आम्हीही नोकरी केलेली,

***

भाग 3

सुवर्णमध्य-2

2 thoughts on “सुवर्णमध्य-2”

Leave a Comment