सुवर्णमध्य-1

आज आवरता आवरता तिची नुसती धडधड वाढत होती..

आज महत्वाचे क्लाएंट येणार होते ऑफिसमध्ये,

बॉसने आठवडाभर आधीच तिला बजावून सांगितलेलं,

की प्रेझेन्टेशन नीट व्हायला हवं,

आठवडाभर तिने मेहनत घेतली होती,

रात्रभर जागून एकेक काम पूर्ण केलं,

त्यात घरात सासू, सासरे, मुलगी आणि नवरा,

यांचंही पाहायचं होतं,

काल रात्री उशिरापर्यंत तिने प्रेझेन्टेशन तपासून घेतलं होतं,

सकाळी चांगले तीन अलार्म लावले,

पण शेवटी जे व्हायचं तेच झालं,

अलार्म बंद करून तिला झोप लागली ती डायरेक्ट साडे सात ला उठली,

9 वाजता प्रेझेन्टेशन,

घरातून साडेआठला निघावं लागणार,

आता एक तासात कसं आवरणार?

तिने पटापट अंघोळ केली,

आधी स्वतः तयार झाली,

चहा केला आणि सासू सासऱ्यांना नेऊन दिला,

***

भाग 2

सुवर्णमध्य-2

Leave a Comment