उशाशी असलेली पिशवी बघायला गेला तर ती तिथे नव्हती,
तो शोधू लागला,
आत पाहिली,
बाहेर शोधली,
तो दुःखी झाला,
आईने विचारलं,
“काय दवडलं तुझं?”
“माई इथे यक पिशवी व्हती..”
“हा ती बघ दारामागे लटकवली हाये..
“
त्याने पिशवी पाहिली, त्यात काहीतरी भरलेलं दिसलं, तो आनंदाने उड्या मारू लागला..
त्याने पिशवी उघडली,
त्यात खूप चॉकलेट, न फुगवलेले फुगे, बिस्किटं आणि समोसे होते…
त्याचा आनंद गगनात मावेना..
पिशवी घेऊन पळत पळत मित्रांना सांताक्लॉजचं गिफ्ट दाखवायला गेला..
आईने आवाज दिला,
“आरं कुठं पळतुय…याले कसं माहीत?
की काल मालकाने त्याच्या पोराच्या वाढदिवसाचं उरलेलं सामान मले दिलं म्हणून? अन ही पिशवी याच्या उशाशी रिकामी दिसली म्हणून भरलं त्यात सगळं…याले इतकं उड्या माराले काय झालं?”
आईला मोठा प्रश्न पडला,
आई प्रश्नांची उत्तरं शोधत बसली,
आणि कुणालला त्याचा सांता भेटला…
समाप्त