सांता-1

 “अरे रात्री सांताक्लॉज येतो आणि आपल्या उशाशी गिफ्ट ठेऊन जातो म्हणे..”

झेड पी च्या शाळेत शिकणाऱ्या मुलांची आपापसात चर्चा सुरू होती..

कुणाल मन लावून त्यांचं बोलणं ऐकत होता,

आजवर दिवाळी, पाडवा, संक्रांती या ऐकलेल्या सणात ख्रिसमस नावाची भर पडली,

सहा वर्षांचं लेकरू ते,

नुकतंच शाळेत जायला लागलेलं,

एका बिल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्याच्याच बाजूला पत्र्याचं शेड टाकून कुणाल अन त्याचे आई वडील राखणदारी आणि मजुरी करत होते.

आज इथे तर उद्या तिथे, असं फिरतीचं काम त्यांचं..

आई वडील कामाला निघून जायचे,

कुणाल दप्तर उचलून शाळेत जाई,

बरोबरची मुलंही याच स्तरावरची..

कुणाचे आई वडील मोलमजुरी करत तर कुणाचे भंगार विकत घेत..

सगळी पैशाच्या समस्येने पोळलेली,

त्यात ही मुलं शिकत होती,

ख्रिसमस, सांताक्लॉज ही नावं त्यांनी नव्याने ऐकली,

रस्त्याने जाताना लाल गोंडयाची टोपी घातलेला अन पांढऱ्या दाढीवाल्या बाबाला त्यांनी कपड्यांच्या दुकानात पाहिलं होतं..

यालाच सांताक्लॉज म्हणतात, त्यांना नवीन माहिती समजली..

एक आकर्षण निर्माण झालं..

पण सर्वात जास्त कुतूहल या गोष्टींचं की हा खरंच गिफ्ट देतो का? रात्री येऊन आपल्यासाठी काही ठेऊन जातो का? प्रयत्न करायला काय हरकत आहे?

भाग 2

https://www.irablogging.in/2022/12/2_28.html?m=1

भाग 3

Leave a Comment