समर्पण-3

 असं करत चौथ्या दिवशी तो बेंगलोरला गेला,

तिथे आपलं प्रेझेन्टेशन दिलं,

पुढचं प्रेझेन्टेशन सुरू होणार होतं, 

नाव पुकारलं तेव्हा त्याला घाम फुटला,

अश्विनी तिथे आली होती,

प्रोजेक्ट सादर करायला,

तिने प्रेझेन्टेशन दिलं,

सर्वांनी उठून टाळ्या वाजवल्या,

आणि तिला बक्षीसही मिळालं,

पण विजयाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नव्हता,

कारण आपल्याच माणसांशी ती हरली होती,

स्टेजवर तिला बोलायला बोलवलं,

परेश पुरता घाबरला,

आता ही आपले वाभाडे काढणार,

पण ती म्हणाली,

माझ्या विजयाचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला…

तो अवाक झाला,

शरमिंदा झाला,

घरी दोघेही सोबत गेले,

तो मौन होता,

ती म्हणाली,

“माझ्या सहकाऱ्यांनी मला आग्रह केला नसता तर मी इथे आले नसते, हा प्रोजेक्ट मी तुझ्यासाठी बनवला होता.. तू जाऊन सादर करावा म्हणून…पण तू नव्हतास म्हणून मी आले, जिंकल्यावर तुला सरप्राईज द्यावं म्हणून काहीही बोलले नाही…पण तूच मला धक्का दिलास….”

तो तोडक्या मोडक्या शब्दात विचारू लागला,

“एवढं करून मला का श्रेय दिलंस?”

“कारण तुझ्यात आणि माझ्यात फरक आहे..”

एवढं ऐकून तो परत मौन झाला,

त्याचा पुरुषी अहंकार गळून पडला की नाही माहीत नाही,

पण एक गोष्ट सिद्ध झाली,

पुरुषी अहंकार कधी संपणार नाही,

आणि स्त्री कितीही शिकली,

तरी तिचा समर्पणाचा भाव,

 ती कधीच संपू देणार नाही.

समाप्त

4 thoughts on “समर्पण-3”

  1. थोडक्यात पण खूप छान समर्पक संदेश दिला आहे. खूप छान 🌹✔️👍

    Reply

Leave a Comment