समर्पण-1

 “तिला कशाला सांगतो उगाच, जमणार नाही तिला..”

परेश आपल्या सहकाऱ्याला सांगत होता..

परेश आणि अश्विनी,

नवरा बायको,

एकाच ठिकाणी कामाला,

एकाच डिपार्टमेंट मध्ये,

म्हटलं तर सहकारी, म्हटलं तर मित्र,

अन म्हटलं तर प्रतिस्पर्धी,

त्याचं कौतुक झालं की तिला आनंद व्हायचा,

पण तिचं कौतुक झालं की तो आतून जळायचा,

पुरुषी अहंकार,

दुसरं काय,

असाच एक नवीन प्रोजेक्ट आलेला,

बॉसने कसलाही विचार न करता अश्विनीला ते काम दिलं,

इतर सहकाऱ्यांना हेवा वाटला,

पण काय करणार,

अश्विनीचं कामच फार उत्तम होतं,

तिने अल्पावधीतच प्रोजेक्ट उत्तमरीत्या पूर्ण केला,

सगळीकडे वाहवा झाली,

परेश वरवर खूप खुश होता,

पण आतून सहन होत नव्हतं,

भाग 2

https://www.irablogging.in/2023/01/2_68.html?m=1

1 thought on “समर्पण-1”

Leave a Comment