सत्य-1

“आई दरवेळी का तू त्याचा विषय काढतेस? लग्न झालंय माझं आता..तो माझा भूतकाळ होता. खरं तर हे एका आईने मुलीला सांगायला हवं पण इथे तर उलटंच..”

मीनाक्षी चार दिवस माहेरी राहून सासरी परत जात होती तेव्हाचा त्यांचा हा संवाद..

जय…मिनाक्षीचा भुतकाळ..

तिची आणि त्याची ओळख एका लग्न समारंभात झालेली..

पाहताक्षणी त्याला ती आवडली होती..

तोही साधा नव्हता,

प्रचंड रुबाबदार,

पाहताक्षणी कुणीही प्रेमात पडावं असा..

त्याच्या मागे मुलींची रीघ असायची…

पण हा कसला कुणाला भाव देतोय..

पण त्याला मात्र मीनाक्षी आवडली होती,

ओळख पाळख काढत नंबर मिळवला..

बोलणं सुरू झालं..

तीही त्याच्या प्रेमात पडली..

प्रेमाच्या आणाभाका घेऊन झाल्या..

तिच्या घरी समजलं..

आईने मुलाची माहिती काढली,

तो नात्यातलाच निघाला..

सुंदर, हुशार आणि सुशिक्षित..

घरच्यांना अजून काय हवं होतं..

****

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-3/

Leave a Comment