संयम

 प्रत्येकवेळी घरी भेटायला आलेल्या नवऱ्याच्या मित्रांची नजर तिला खटकायची, कितीतरी वेळा तिने दुर्लक्ष केलं पण माणसाची नजर स्त्रीच्या नजरेत लगेच लक्षात येते. सई सारखी सोज्वळ, पतिव्रता आणि घरंदाज स्त्री हे पाहून हैराण होते. बरं एकच नाही, सर्वच जण एका वेगळ्याच नजरेने तिच्याकडे बघत. तिने नवऱ्याच्या कानावर एकदा घातलं असता त्यानेच तिला गैरसमज म्हणून शांत केलं. 

एके दिवशी मिस्टर ऑफिसला गेले असता दारावरची बेल वाजली, तिने दार उघडलं तेव्हा नवऱ्याचा मित्र सागर घरी आलेला. तोंडाला दारूचा वास येत होता, तिने आत घेतलं नाही तरी तो बळजबरी आत शिरला.

“हे बघा, नितीन घरी नाहीयेत, ते आले की या..”

“पण तू आहेस की घरी, तुझ्यासाठीच आलोय..”

सई घाबरली, तिने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ.

“अशी काय करतेस, हे काही पहिल्यांदाच करतेय का तू?”

“म्हणजे?”

“तू कोण आहेस हे कळलं आहे मला..लाजू नकोस, तुझ्या नवऱ्याला नाही सांगणार मी..”

“तुम्ही वाटेल ते बोलताय..आत्ताच्या आत्ता इथून जा नाहीतर मी आरडा ओरडा करेन..”

मित्र चिडतो, त्याच्या मोबाईल मध्ये काही व्हिडीओ  तो तिला दाखवतो आणि म्हणतो..

“मग हे काय आहे?? हा??”

व्हिडीओ बघून सईला चक्करच येते, ती प्रचंड घाबरते, अंगाला दरदरून घाम फुटतो..धीर करत त्या मित्राला घराबाहेर हकलते आणि दार लावून आत रडत बसते. मोबाईल मध्ये एका साईट वर तिचे फोटो मोर्फिंग करून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले होते, कुणीतरी हे पाहिलं अन मित्रांच्या ग्रुप मध्ये ते शेयर केलेलं, बघता बघता ते व्हिडीओ जवळपास सर्व मित्रांच्या मोबाईल मध्ये आले आणि त्यांच्या नजरेमागे असलेलं कारण तिला आज समजलं. आयुष्यात कधी कुणा मुलाकडे बघितलं नाही, नवऱ्याला पूर्णपणे समर्पित केलं अन त्याचं असं फळ? सई आतून पूर्ण कोसळते, दिवसभर विचार करून डोक्याचा भुगा झालेला असतो. अखेर विचारांती ती दोर घेते अन फास घ्यायला निघते, दोर अडकवताच नितीन तिला पकडतो अन किंचाळतो..

“हे काय करतेय??”

दोर सोडवून नितीन तिला खाली उतरवतो, 

“सोड मला जाऊदे. जगून काही उपयोग नाही आता..”

नितीन चक्रावतो, सगळं काही आलबेल असताना हे काय मधेच??

“काय झालंय? मी कुठे चुकलो का?”

“सांगण्यासारखं नाहीये नितीन..तुझं आयुष्य माझ्यामुळे बरबाद झालं..”

अखेर खूप खोदून विचारल्यानंतर सई नितीनला सत्य सांगते, नितीन ऐकून हैराण होतो, घरी आलेल्या मित्राबद्दल त्याला चीड येते आणि हे सगळं झालंच कसं या विचारात तो पडतो.

परिस्थितीला सावरून घेत तो तडक सायबरला तक्रार करतो आणि मग सत्य उघडकीस येते.. सई कॉलेजला तिचा फोन चोरीला गेला होता, जुनाच फोन म्हणून त्यांनी तक्रार न देता शोध घेतला नाही, पण फोन ज्याने चोरला त्याने त्यातील फोटो चोरून त्याचा गैरवापर केला होता. पोलिसांनी शोध घेऊन ते व्हिडीओ तात्काळ डिलीट करायला लावले अन गुन्हेगारांना बेड्या घातल्या. घरी आलेल्या मित्रालाही पोलिसांच्या स्वाधीन केलं, बाकीच्या मित्रांनी गैरसमज दूर करून नितीनची माफी मागितली. 

नवऱ्याचा बायकोवर असलेला विश्वास, कठीण प्रसंगी दाखवलेला संयम आणि वेळीच केलेली कारवाई.. यामुळे सईचा जीव वाचला..नाहीतर हे असलं पाहून एखाद्याने काय केलं असतं विचार न केलेलाच बरा..

मित्रांनो, आपणही आपला फोन चोरीला गेल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, फोनच्या किमतीपेक्षा त्यातील डेटा हा सर्वात किमती असतो. 

*****

वाचकांनो, ईरा वरच्या वेगवेगळ्या उपक्रमात आपले लेखक तसेच बाल कलाकार बक्षिसं मिळवतच असतात, आता वाचकांनाही या उपक्रमात सामील करून घेण्याची संधी ईरा देत आहे. आम्ही घोषित करत आहोत वाचकांसाठी एका नव्या पुरस्काराची घोषणा,

“प्रगल्भ वाचक पुरस्कार”

लिखाणाला जसे प्रोत्साहन दिले जाते तितकेच वाचनालाही दिले जावे असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही घोषित करत आहोत “प्रगल्भ वाचक पुरस्कार”

कशी असेल ही स्पर्धा?

या स्पर्धेसाठी तुम्हाला ईरा दिवाळी अंकावर आधारित उपक्रम करायचे आहेत ते खालीलप्रमाणे

1. दिवाळी अंकातील कुठलीही एक रेसिपी बनवून त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे.
2. दिवाळी अंकातील आपल्याला आवडलेल्या कथांबद्दल आम्हाला प्रतिक्रिया द्यायच्या आहेत.
3. दिवाळी अंकातील कुठलीही एक कविता म्हणून अथवा गाऊन आम्हाला ऑडिओ स्वरूपात पाठवायची आहे.
4. दिवाळी अंकातील कुठलाही एक लेख सुंदर हस्ताक्षरात लिहून आम्हाला फोटो पाठवायचा आहे.

वरील चारही उपक्रम पूर्ण करून त्याचे फोटो आणि ऑडिओ आम्हाला खालील नंबरच्या whatsapp वर पाठवावे.
8087201815

विजेत्यांना प्रगल्भ वाचक पुरस्कार म्हणून ट्रॉफी आणि सर्टिफिकेट घरपोच देण्यात येईल. आहे ना interesting? चला तर मग, कामाला लागा..आणि हो, दिवाळी अंक मागवला नसेल तर आजच मागवून घ्या खालील फॉर्म भरून, अथवा वर दिलेल्या नंबर वर संपर्क करून..

https://forms.gle/ka3vMa5Mv17KryvW9

Leave a Comment