श्रीमंत-3

 आणि तिला वाटायचं ती सर्वात सुंदर दिसत असल्याने तिच्याकडे सर्वजण पाहताय,

नवऱ्याने पाहिलं, त्याने तिला विचारलं,

“हा काय अवतार करून आली आहेस?”

“अवतार काय अवतार, मेकप केलाय..तुम्हाला नाही कळणार, सोडा..”

नवऱ्यालाही तिने धुडकवलं आणि कार्यक्रमात मिरवू लागली,

आरतीला सर्वजण जमले, तिची ती मोलकरीणही आलेली..

तिला पाहून ही मोठ्याने म्हणाली,

“हिला कशाला बोलावलं?”

त्या मोलकरणीला आणि इतर ऐकू गेलेल्या सर्वांना हे ऐकून तिचा रागच आलेला खरा,

आरती झाली,

तिथे एक समाजसेवी संस्थेचे काही लोक आले होते,

एका नव्या धार्मिक कार्याची सुरवात म्हणून देणगी मागायला ते आलेले,

सोसायटीतील सर्वजण देणगी द्यायला पुढे आले,

त्यांना पाहून शिवानीही पुढे गेली,

देणगी घेणाऱ्यांनी सांगितलं,

“आम्ही चांगल्या कार्यासाठी देणगी मागतोय, ते कार्य सत्कारणी लागावं म्हणून येणारी देणगी सुदधा शुद्ध असावी अशी आमची ईच्छा आहे..”

“म्हणजे? आम्हाला कळलं नाही..” सोसायटीतील लोकं म्हणाली,

“म्हणजे जो देणगी देणार त्याची ती स्वकमाई असावी, कुणाकडून घेतलेली नको”

हे ऐकून अर्ध्याहून जास्त लोकं मागे झाले,

मोजकेच लोकं पुढे उरले,

माणसांनी देणगी दिली,

स्त्रियांची वेळ आली, तेव्हा शिवानी ज्यांना तुसडेपणाने वागवत होती अश्या सोसायटीतील शिवणकाम करणाऱ्या, साड्या विकणाऱ्या बायका तिथे पुढे उभ्या होत्या. शिवानीला काय चाललंय काही कळेना,

ती तिथेच उभी होती,

हातात पाचशेच्या भरपूर नोटा घेऊन,

तिला दाखवायचं होतं की सर्वात जास्त दान तीच करणार म्हणून,

देणगीदाराने तिला विचारलं,

“ताई ही देणगी तुमच्या स्वकमाईची आहे ना?”

तिला बोलवेना, 

कसेबसे शब्द बाहेर पडले,

“नाही..”

मग बाजूला व्हा..

तिचा भयंकर अपमान झाला,

तेवढ्यात शेजारून तिची मोलकरीण आली,

तिने तिच्या पाकिटातून अकरा रुपये काढून दानात टाकले,

शिवानीचा अहंकार गळून पडला, सकाळी हेच अकरा रुपये तिने मोलकरणीच्या तोंडावर फेकून मारले होते,

पण ते तिच्या स्वकमाईचे होते, 

शिवानीने हिशोब केला,

दानात टाकण्यासाठी स्वकमाईचा असा एकही रुपया तिच्याकडे नव्हता..

त्याक्षणी ती मोलकरण तिच्यापुढे तेजस्वी दिसू लागलेली..

आणि गणपती सोबतच तिच्या गर्वाचं विसर्जन झालं..

*****

स्त्रियांनी स्वावलंबी असावे की नसावे हा मुद्दा नाही,

पण प्रत्येक स्तरावरच्या माणसाला सारख्याच आदराने वागवलं तर तो व्यक्ती श्रीमंत ठरतो…

6 thoughts on “श्रीमंत-3”

  1. खूप सुंदर कथा. मनोरंजन करणारी आणि उद्बोधक.

    Reply

Leave a Comment