श्रीमंत-2

शिवानीचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच भोगवादी होता, केवळ मजा करायची, महागडे कपडे दागिने घालून मिरवायचं, आपल्याहून चांगलं कुणी दिसलं की हेवा करायचा आणि आपण अजून चांगलं राहावं यासाठी सतत खटाटोप,

आयुष्यात काही ध्येय नाही,

कसली मेहनत नाही,

नवऱ्याला सांगून घरातही सर्व कामांना बायका असायच्या,

नवरा म्हणायचा,

अगं पुढे शिक, काहीतरी कर,

पैशासाठी नाही, तुझ्यासाठी..

तुझं मन रमेल, नवीन काहीतरी करण्याचं समाधान मिळत जाईल,

पण तिला मेहनत नको होती, काम नको होतं,

फक्त आयुष्य एन्जॉय करायचं होतं,

गणपतीचे दिवस होते,

सोसायटीने मिळून गणपतीउत्सव एकत्र साजरा करायचा ठरवला होता,

त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते,

सर्व महिला उत्साहाने कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा हे ठरवत होते,

पण शिवानीची वेगळीच लगबग,

कार्यक्रमात मी सर्वात उठून कशी दिसेन, माझ्याच साड्या महागड्या कश्या दिसतील आणि सोसायटीत सर्वजण माझ्याकडेच कश्या बघतील यासाठी तिने जीवाचं रान केलं,

ठरल्याप्रमाणे गणपतीच्या पहिल्या काही दिवसात वेगवेगळे कार्यक्रम झाले,

सर्वांचं लक्ष कार्यक्रमात असल्याने शिवानीकडे पाहायला कुणाला वेळ नव्हता, आणि इतर सर्वच महिला छानपैकी तयार होऊन आल्याने सुंदरच दिसत होत्या,

शिवानी बोलायच्या निमित्ताने जवळ जायची आणि साड्यांची किंमत विचारायची,

“ही साडी का? अहो माझ्या आईने दिली होती, दिवाळीला..”

“अच्छा हो का? ही तर बाई मी विकत घेतलेली, 6 हजार ची आहे..”

तिचं हे वागणं सोसायटीतील इतर महिलांना माहीत असल्याने त्या चार हात दूरच राहत,

आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही हे बघून शिवानीची चिडचिड झाली,

शेवटच्या दिवशी तिने पार्लर मध्ये जाऊन काहीतरी वेगळाच अवतार करून आणला,

संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला, शिवानीकडे सगळेजण बघू लागले,

गडद रंगवलेले डोळे, केसांची उचकटलेली रचना, भडक लिपस्टिक आणि चेहऱ्यावर थापलेले क्रीम…हे बघून सर्वजण जवळपास घाबरलेच होते,

****

भाग 3

श्रीमंत-3

4 thoughts on “श्रीमंत-2”

  1. Wow, wonderful blog structure! How lengthy have you ever been running a blog for?

    you make running a blog glance easy. The overall glance of your site is wonderful, let alone the content material!

    You can see similar here dobry sklep

    Reply

Leave a Comment