शेलार मामा-3

 जीवाचं काही बरेवाईट केले नसेल ना?

तो धास्तावला..

तेवढ्यात जिना चढून दोघे वर येताना दिसले..

मस्त हसत खिदळत वर येत होते..

त्याला काळजी वाटली..

आत जाताच बहिणीला बॅग भरायला लावून घेऊन जाऊ… त्याने ठरवलं..

बहिणीने आत बोलावलं..चहा ठेवला..

“अहो तुम्ही पण घेणार का?” तिने लाजत नवऱ्याला विचारलं..

“तुम्ही देणार असाल तर घेईल हो..” नवऱ्यानेही लाडात येऊन उत्तर दिलं..”

मामाचं डोकच गरगरायला लागलं..

चहा पिऊन तो उठला..

नवरा बायकोची कुजबुज ऐकू आली..

“आग लागो आपल्यात भांडणं लावणाऱ्यांना..”

मामाच्या बुडाला आग झोंबली…

चरफडत तिथून निघाला..

“ज्याचं करावं भलं…” मनातल्या मनात बोलला..

आपले पूर्वज खरं सांगून गेले..

नवरा बायकोच्या भांडणात पडू नये…

नवरा बायको गोड होऊन जातात,

मधल्या मध्ये अडकतो मध्यस्थी…

मामाचं तेच तर झालं..

तेवढ्यात मामाला फोन येतो..

“मामा लवकर या, सोसायटीत भांडणं सुरू आहेत..”

झालं गेलं गंगेत सोडून मामाही डबल स्पीडने निघाला…

समाप्त

Leave a Comment