शेलार मामा-1

 काही लोकांचे अगदी चित्रविचित्र छंद असतात..

असाच एक विचित्र छंद जोपासलेली माणसांची एक प्रजात म्हणजे “मध्यस्थी” लोकं..

ही लोकं आपल्या आसपास आढळू शकतात,

लग्न जमवणारे, कुणाचं भांडण चालू असेल तर मोठायकी मिरवत मध्ये पडणारे, बिन बुलाये मेहमान सारखं कुठेही घुसणारे, आणि एवढी समाजसेवा करून सर्वात जास्त शिव्या खाणारे ही लोकं…

(तुमच्या लग्नाची मध्यस्थी केलेला माणूस आठवून दातओठ आवळले गेले असतीलच)

असो,

याच प्रजातीतील आमचा एक माणूस म्हणजे “शेलार मामा”

“मध्ये मध्ये” करणारा यावरूनच “मामा” नाव पडलं असावं..

आजही आसपासच्या पुढारी व्यक्तीला मामा संबोधन द्यायची पद्धत आहे, मग भलेही त्याचा आपल्या आईशी संबंध असो व नसो…

तर हे शेलार मामा,

बालकापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण त्याला मामा म्हणत…

त्याची एक मानलेली बहीण,

संध्या..

तिचे नवऱ्याशी उडाले खटके..

***

भाग 2
भाग 3

Leave a Comment