शून्य-3

 वेळ पडायची तेव्हा एक वेळचे जेवण ती टाळे,

त्यांच्या कष्टाला फळ आलं,

शहरातल्या मोठ्या हॉटेल्स ने सेंद्रिय मालासाठी त्यांना काँट्रॅक्ट दिलं,

आगाऊ रक्कम दिली,

दोघे भरून पावले, कष्टाला फळ आलेलं,

तिकडे बहिणीने मौजमजा करून सगळा पैसा उडवून लावलेला,

नवरा दारूच्या आहारी गेला,

पैशाच्या जीवावर घरखर्च वाढवून ठेवलेला,

पण आता तो फेडायचा कसा हा प्रश्न उभा राहिला,

हळूहळू तिला समजलं,

भाऊ लाखोंच्या घरात कमाई करतोय,

मोठा झालाय,

आपल्याहून मोठं घर आणि गाडी त्याने घेतली,

पण आता माहेरी जायची तिला सोय नव्हती,

कोणत्या तोंडाने जाणार?

एके दिवशी वहिनी आणि दादा अचानक दारात उभे,

उंची पेहराव, वाहिनीच्या अंगावर महागडे दागिने,

आता तिलाच स्वतःची लाज वाटू लागली,

नवऱ्याने करून ठेवलेल्या कर्जामुळे तिचं उरलेसुरले दागिनेही गेले होते,

दादा वहिनी आत आले,

पण गर्वाचा लवलेशही नव्हता,

मीनलच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना होती,

वहिनीला ते समजलं,

ताईंना मदत म्हणून हळूच एक पैशांचं पाकीट बाजूला ठेवलं आणि म्हणाली,

वहिनी म्हणाली,

“ताई, त्या दिवशी तुम्ही मला झिरो म्हणाल्या होतात ना? पण एक सांगू? या शून्यातच खूप मोठी ताकद असते…

विश्वाचा आकार सुद्धा याच शून्यात सामावतो,

शून्यातून निर्माण केलेलं विश्व अबाधित असतं,

नुसता शून्य जरी निरर्थक असला,

तरी तो ज्याच्या मागे लागला त्याची किंमत कितीतरी पटीने वाढत जाते…

*****

शून्यातून निर्माण केलेलं सगळं अखंडित असतं,

मग ते स्वराज्य असो,

वा संसार…

8 thoughts on “शून्य-3”

  1. खूप सुंदर
    पैसा सर्व काही नाही
    नाती गोती महत्त्वाची आहे 🙏

    Reply
  2. यथार्थवादी चित्रण नसून नुसतं कल्पना चित्र च रंगवलं कुणीही पूर्ण पढ़ें राम नसतो तर रावण ही नसतो.

    Reply

Leave a Comment