वीज-1

लिफ्टमध्ये अडकलेल्या त्या तिघांसाठी ती 20 मिनिटं आयुष्यात मोठी उलथापालथ करून जाणारी होती,

ती, तिचा नवरा आणि तिचा पूर्वकालचा प्रियकर,

योगायोग म्हणा किंवा दैवी इशारा,

तिघे एकत्र आले होते आणि तेही अश्या अवस्थेत,

दोघे नवरा बायको हॉस्पिटलमधून घरी जाणार होते,

ती तापाने बेजार होती,

नवऱ्याने सोबत नेऊन तपासून आणलं,

घरी जायला दोघे लिफ्टमध्ये गेले, तेवढ्यात तो प्रियकरही आत शिरला,

त्याच्याही ध्यानीमनी नव्हतं की हे दोघे इथे असतील,

नवऱ्याला तिने सगळं सांगितलं होतं, लग्नाआधीच..

तिचा प्रियकर आणि तो,

एकमेकांच्या प्रेमात होते, अगदी आकंठ बुडालेले,

पण परिस्थिती, समाज, रीती..

सगळं आड आलं आणि दोघांना एक होता आलं नाही,

नवऱ्याने सगळं मान्य करत तिच्याशी लग्न केलं,

तिच्या भूतकाळाशी त्याला काही घेणं नव्हतं,

तिच्या निर्मळ मनावर आणि निरागस स्वभावावर त्याने प्रेम केलं होतं,

त्याला तिला गमवायचं नव्हतं,

प्रियकर लिफ्टमध्ये आला तसं तिने डोळे विस्फारत त्याच्याकडे पाहिलं,

दोघे काहीक्षण एकमेकांकडे बघत होते,

नवऱ्याला सगळं समजलं होतं,

पण ती परिस्थिती आणि वेळ अशी होती की तिथून निघण्यापेक्षा मोठं दुसरं काही वाटत नव्हतं,

सिक्युरिटीसोबत फोन झालेला, टेक्निशियन काम करतोय, 20-30 मिनिटं लागतील अशी त्याने हमी दिली,

त्यांना हे नवीन नव्हतं, त्या लिफ्टमध्ये बऱ्याचदा असं व्हायचं,

आता तिघांना एकत्रितपणे वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता,

तिघेही मॅच्युअर्ड होते, प्रॅक्टीकल होते,

भाग 2

वीज-2

भाग 3

वीज-3

2 thoughts on “वीज-1”

Leave a Comment