वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 1)

पोलीस स्टेशन मध्ये आज जोरदार धावपळ सुरू होती. शहरात नवीन ACP मॅडम येणार होत्या, एक तर कुणी पुरुष पोलीस असता तरी पोलीस स्टेशन मध्ये इतकी धावपळ नसे..पण महिला पोलीस म्हटली की कडेकोट शिस्त, दरारा..त्यात महिला असल्याने एक जबरदस्त अभिमान.. हे त्या पोलीस स्टेशन ने बऱ्याचदा अनुभवलं होतं..

“ए शूज पॉलिश केलेत का..”

“हा आज केलेत..”

“बरं केलं..नाहीतर मागच्या वेळी…आठवतंय का??”

“हो मग, आल्या आल्या त्या नवीन मॅडम ने मला धारेवर धरलं होतं..म्हणे..पोलीस आहात, कसं राहायचं याचीही शिस्त हवी. यावेळी नवीन काही शोधायला नको..कोण येणार आहेत काय माहीत, कश्या असतील..काय करतील देव जाणे..”

“ते पिक्चर मध्ये दाखवतात ना..एखादी ऑफिसर येते..सर्वजण सलाम ठोकतात. आल्या आल्या ती काहीतरी कुरापत काढते आणि सर्वांना धारेवर धरते..पहिल्याच दिवशी आपली हवा करायचा प्रयत्न करते..तसच काहीतरी होणार बघ..”

“देव जाणे कुणाच्या तावडीत आपण सापडणार आता…”

“पण मॅडम आल्या नाहीत अजून, 2 वाजता येणार होत्या..”

“वाट बघण्याशिवाय काय पर्याय आपल्याला आता..”

इतक्यात समोर एका बस मधून एक बाई उतरते..हातात जड पिशव्या, अंगावर विस्कळीत साडी, एक पोरगं कडेवर तर दुसरं वडिलांच्या मागे..उतरत उतरत ती पोलीस स्टेशन मध्ये येते..

“नमस्कार..”

“नमस्कार, तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर आत जाऊन नोंदवा..”

ती स्त्री रागारागाने आपल्या नवऱ्याकडे बघते..

“तरी तुम्हाला सांगत होते, दुसरी साडी नेसते म्हणून, पण नाही ना..बायकोचं ऐकायचंच नसतं तुम्हाला..तुमच्या लाडक्या बहिणीने सांगितलं असतं तर लगेच मान डोलावली असती नंदीबैलासारखी..”

“ओ मॅडम, तुम्हाला नक्की कुणाविरुद्ध तक्रार करायची आहे?? नवरा की नणंद??”

“सगळ्यांचीच… खानदानच मुळात येडपट यांचं..” मनातल्या मनात..

हा सगळा गोंधळ चालू असताना मागून एक आलिशान कार थांबते…

“काय झालं?? काय गोंधळ चालला आहे??”

गाडीतून एक उंच, देखणी, निळी जीन्स आणि शुभ्र कुर्ता परिधान केलेली स्त्री उतरते…पोलीस लोकं तिला सलाम ठोकतात..

“रस्ता का अडवला आहे?? हे बघा…मला घाई आहे..”

“मॅडम दोनच मिनिट, मी यांची तक्रार लिहून घेतो..नाहीतर पब्लिक आजकाल मीडिया मध्ये बोंबाबोंब करते…आमची गाडी तुम्हाला सोडेन..”

“कशाला?? ओ मिस्टर…चला निघा इथून, ए बाई…तुझ्या पोरांना सांभाळ नीट अन हो बाजूला..”

“बाई…थोडं थांबा…माझं डोकं चालेना झालंय..”

“बाई कुणाला म्हणते?? …माझी पोजिशन माहितीये का तुला??..आणि फालतू बडबड करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही..” असं म्हणत ती धक्काबुक्की करते.त्यात एका हवालदाराला धक्का लागून तो मागे पडतो…”

कडेवर मूल असलेली स्त्री कडेवरच्या बाळाला नवऱ्याकडे देते…हातातल्या बॅग खाली ठेवते..पदराने कपाळावरचा घाम टिपते… पदर खोचते आणि त्या महिलेसमोर जाऊन खाडकन तिच्या गालावर एक चपराक लावते..

भयाण शांतता…

“ही माझी पोझिशन आहे.. हवालदार नाईक…सरकारी कामात अडथळा आणलाय यांनी, चौकशी साठी मध्ये घ्या या बाईला..”

“ओ हॅलो…तुम्हाला माहितीये का मी कोण आहे?? डिव्हिया ची टॉप मॉडेल..”

“आणि तुम्हाला माहितीये का मी कोण आहे?? या पोलीस स्टेशन ची टॉप ऑफिसर..ACP शौर्या महाजन..”

उभे असलेले पोलीस चटकन सलाम करतात,

शौर्या आपलं आयकार्ड पर्स मध्ये शोधायला लागते.

“मेलं तिच्यायला..आयकार्ड हरवलं..” शौर्या मनातल्या मनात…

इतक्यात तिचं तिच्या मुलाकडे लक्ष जातं. चोखून चोखून त्याचं पार वाईट अवस्था केलेली असते…

“आण ते इकडे..”

“नाssssssही…”

“बंदूक काढू?? काढू??”

“घे…”

बंदुकीचा धाक दाखवून शौर्या आपलं आयकार्ड मिळवते…

“मॅडम, माफ करा..मला माहित नव्हतं…”

“मला पण माहीत नव्हतं. ते काय झालं, आमची बस चुकली, पोलीस क्वार्टर मध्ये युनिफॉर्म घालायला जाऊ म्हटलं तर रस्त्यात तुम्ही…असो, चला आता आत.”

“मॅडम प्लिज सोडा ना मला..”

“आत चला..” इतका वेळ मिश्किल वागणारी शौर्या एकदम गंभीर होते अन तिला आत नेते..

क्रमशः

_____________________

138 thoughts on “वर्दी माझी झक्कास 👌👌👌 (भाग 1)”

  1. hello….so nice story. shourya chi entry zali to part me ataparyant 5 vela vachala ahe..pn pratyek veli ekdm bharii vatat vachtana.. next means 3rd part kadhi taktay.mhnje tumhi ks thrvl ahe, kiti days ne story part post karnar ahet..pn story khup ch bhari ahe tumche baki stories pn me vachlya ahet tya suddha khup mst ahet.asch lihit raha..mst mst..

    Reply
  2. फारच छान! लेखनशैली आवडली. आजच वाचले. पुढच्या "शौर्य लीला" नाहीत का?

    Reply
  3. buy generic clomiphene without prescription where to buy clomiphene without dr prescription where to get clomid price clomiphene generic can you buy cheap clomiphene without a prescription can i purchase cheap clomiphene for sale clomid prices in south africa

    Reply
  4. ¡Saludos, jugadores dedicados !
    Todo lo nuevo en casinoextranjerosenespana.es este mes – п»їhttps://casinoextranjerosenespana.es/ casino online extranjero
    ¡Que disfrutes de giros espectaculares !

    Reply
  5. ¡Bienvenidos, descubridores de riquezas !
    Casino fuera de EspaГ±a sin pasos innecesarios – п»їhttps://casinoporfuera.guru/ п»їcasino fuera de espaГ±a
    ¡Que disfrutes de maravillosas tiradas afortunadas !

    Reply

Leave a Comment