लॉकडाऊन मध्ये आपल्या पोरांचे उद्योग….

लॉकडाऊन मध्ये आपल्या पोरांचे उद्योग….

तुम्ही अख्ख जग लॉक डाऊन करा हो, पण आमच्या पोरांच्या सुपीक डोक्यातून येणारी पिकाला कधीही कीड लागणार नाही, आता हेच बघा ना, सर्वजण घरी आहेत…काही कामधंदा नाही…खाली दिमाग शैतान का घर होऊन गेलंय आमच्या पोरांचं…

आता बघा ना, अश्याच एकाच्या डोक्यात नांगरणी करण्याचं फॅड घुसलं… कसली? मातीची? नाही हो…फेसबुक चे फोटो उकरून काढण्याची…मग काय, या पोरांनी मार्क झुकरबर्ग लाही सोडलं नाही…

जुने फोटो उकरून काढण्याचा बाजारच मांडला, आणि “हा आपलाच फोटो आहे?” असा question mark आपल्याच तोंडावर पडला…कंमेंट तर बघा….

“साखरेचे पोते सुई ने उसवले,
भाऊंनी पोरींना पावडर लाऊन फसवले.🔥❤”

“काय तो अंदाज आणि काय ती कला,
हाच फोटो पाहून कोरोना भारतात आला..😂😂🤣🤣🤣”

“विराट अपने बैटिंग से बॉलर्स को करता है बावला…
कैसा था बे तू कवला कवला..🤣🤣🤣”

“लपाछपी खेळताना देतात धप्पा,
भाऊंचा फोटो बघुन पोरी म्हणतात, हेच होणार आमच्या सोनू चे पप्पा! 🔥🔥”

बरं ज्याला कंमेंट आल्या तोही कसला शांत बसतोय, तो म्हणतोय…

“माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
माझ्या फोटोला तुम्ही दिलात खूप चांगल्या कंमेंट😀
#कोरोना गेला की, मी देईन तुमचा पेमेंट😝😝😂🤣😜”

मग आलं साडी चॅलेंज..मिस वर्ल्ड ची स्पर्धाच जणू…साडीतल्या असंख्य फोटोतुन चांगला निवडताना सर्व भगिनींनी चांगलीच दमछाक झाली…

Lockdown मध्ये बाहेर पडणाऱ्यांना चांगलाच प्रसाद मिळत होता…पण बाहेर पडण्याची खाज कुणाला सुटवेना…
काहींची तंबाखू ची तल्लफ कोरोना च्या भयापेक्षा भयानक होती…अन तो कर्फ्यु मध्येही सुसाट सुटला तंबाखू शोधत…पोलिसांनी एका दमात त्याची तल्लफ उतरवली नसेल तर शपथ…

एकाने तर पोलिसांच्या काठीला न जुमानता सुसाट गाडी नेली, पोलिसांनी काठीने मागच्या बाजूला मार दिला… पोलिसांची काठीही गाडीला लटकवत तो निघूज गेला…

पोलिसांची “तेलही गेले अन तूपही गेले” अशी अवस्था झाली…

माननीय पंतप्रधानांनी काही सांगायचा उशीर, पोरं ढोल ताशा घेऊन हजर…काहींनी पराती फोडला, काहींनी मोर्चे काढले…असे बाहेर दिवे लावल्याने मोदींनी वैतागुन अखेर यावेळी घरातच दिवे लावा असं फर्मान काढलं…

आता आपल्या सारख्यांना घरात काय अन बाहेर काय…सगळं सारखंच…पण काहीजण या अचानक झालेल्या lockdown च्या निर्णयाने असे काही फसले की विचारूच नका..

एकाचं नुकतंच लग्न झालेलं…बायकोचं माहेर कोसो दूर…पहिल्या मुळाला ती गेली आणि lockdown झालं…ती तिथेच अडकली …गाड्या जाऊ येऊ देत नव्हते…बस बंद..सगळंच बंद…बरं तरी काहीतरी सोय करून बायकोला घ्यायला जावं म्हटलं तर…काय कारण देणार पोलिसांना?

“धीर धरायला शिक जरा…” यापलीकडे त्याला उत्तर मिळणार नाही…कुणाचं काय तर कुणाचं काय 🤣🤣🤣

आता काही म्हणतील, हा संवेदनशील विषय आहे…आम्ही कुठे नाकारतोय…काळजी तर घ्यावीच लागेल….पण मग पोरांनी घरी बसून करावं तरी काय? दिवसभर बातम्या पाहून चळचळ कापावं? की मनस्वास्थ्य बिघडवून घ्यावं?….घरात बसलेत शांत….हेही नसे थोडके….काहीही न करण्यापेक्षा असले उद्योग चालताय की…”होऊ दे खर्च…”

Leave a Comment