लेहेंगा-2

दुकानातील सेल्समन ने त्यांना बसवलं, पाणी दिलं..

ते जरा शांत झाले..

“लग्नासाठी लेहेंगा दाखवा..” ती म्हणाली,

खूप महागडं दुकान होतं,

सगळे श्रीमंत लोकं तिथे येत..

तिथे एक सेल्समन होता..विकास नाव त्याचं..

पटकन पुढे आला..

“ताई कसा दाखवू? म्हणजे बजेट?”

“बजेट कितीही चालेल, चांगला दाखवा..” ती म्हणाली,

त्याने एकेक पीस दाखवायला सुरवात केली..

खूप जीव तोडून तो त्यांना लेहेंग्याची खासियत सांगत होता..

“ही बघा, ही एमरॉयडरी दुसरीकडे कुठेच मिळणार नाही..हा रंग बघा, खूप खुलून दिसतो..हे नक्षीकाम बघा..किती बारीक आहे..”

तिला काही पसंत पडत नव्हते,

ते बघून त्या विकासचा जीव खालीवर होत होता..

तिला एक तरी लेहेंगा पसंत पडावा म्हणून त्याचा खटाटोप सूरु होता…

त्याला कारणही तसंच होतं,

पुढच्या महिन्यात त्याच्या बहिणीचं लग्न होतं..

तिच्यासाठी एक खास लेहेंगा त्याने गपचूप बाजूला काढून ठेवलेला..

खूप महाग होता तो, पण त्याला हवाच होता…

एक लेहेंगा गेला की सेल्समन ला 500 रुपये कमिशन मिळे,

त्यासाठी त्याचा खटाटोप चालला होता..

रोज तो कमिशन साठी जीव तोडून ग्राहकाला पटवून देई..

बरेच पीस पाहून झाल्यावर एका गुलाबी लेहेंग्यावर तिची नजर बसली,

तो म्हणाला,

“ताई हा एकदम सुरेख, तुमची चॉईस उत्तम आहे…याची ओढणी बघा, याचे काठ किती सुंदर आहेत…”

त्या मुलीला घेऊ की नको कळेना..

तिला तो पसंत पडावा म्हणून तो धडपड करत होता..

मागून पुढून दाखवत होता..

शेवटी त्याने तो सर्वांसमोर अंगावर चढवला..

दुकानात सर्वजण बघतच राहिले,

काहीजण त्याला लेहेंगा घातलेलं बघून हसू लागले..

पण त्याला पर्वा नव्हती,

बहिणीच्या लग्नासाठी आजचे मिळणारे 500 रुपये कमिशन त्याला दिसत होते…

त्याने लेहेंगा घातला आणि ओढणी चढवली,

“बघा किती भरदार आहे” त्याने मागून पुढून फिरून दाखवलं..

तेवढ्यात तिचं लक्ष एका कोपऱ्यात असलेल्या पीस कडे गेलं..

“तो बघू तो कोणता आहे..”

विकास धास्तावला..

भाग 3

Leave a Comment