लव्हशिप-2

 इतक्या साध्या राहणीतही सुंदर दिसत होती,

मित्र म्हणाले, ही काही पटणार नाही तुला..

रॉकी चवताळला, तडक त्या मुलीपाशी गेला..

“आपल्याला लव्हशिप देते काय?”

तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही, ती घाबरली नाही, 2 मिनिटं विचार केला आणि त्याला म्हणाली,

“चल माझ्यासोबत..”

तो गोंधळला, इतक्या सहजासहजी ही मुलगी कशी बोलायला लागली? 

त्याने मित्रांकडे पाहिलं, त्यांना हात करून चॅलेंज जिंकल्याचा इशारा केला आणि तिच्यामागे तो गेला,

त्याला वाटलं बाजूला नेऊन माझ्याशी बोलेल ही, माझं प्रेम स्वीकारेल…

पण ती तिच्या घराकडे जात होती, त्याला सोबत घेऊन..

त्याला कळेना, आता हे काय चाललंय?

“कुठे नेतेय मला?”

“विश्वास ठेव माझ्यावर आणि चल..”

तिने त्याला तिच्या घरी नेलं..

एका चाळीत एका खोलीचं घर,

गेल्यावर तिने पर्स ठेवली, बाजूला एका गादीवर एका पायाने अधू असलेल्या आपल्या वडिलांना पाणी दिलं आणि त्यालाही दिलं..

त्याला बसवलं आणि भाजी चिरायला घेतली,

वडिलांनी विचारलं,

“हा भाऊ नोकरी द्यायला आलाय का? किती पगार असेल? खोलीचं भाडं सुटलं तरी बरं.. माझ्यासाठी काही काम असेल तर विचार ना..तुझी आई या वयात राबतेय गं, बघवत नाही मला…आज तापाने बेजार होती, तरी कामावर गेली गं ती..”

असं म्हणत वडील रडू लागले, तिने त्यांना शांत केलं..

घरात पैशाची इतकी चणचण होती की त्यापुढे हा मुलगा कोण, तुमचं काही अफेयर वगैरे प्रश्नही बापाला पडले नाही..समोर एकच दिसत होतं, एखादी नोकरी आणि पैसे…

त्याने हे पाहिलं आणि त्याच्या काळजात कालवाकालव झाली,

तिने त्याला चहा दिला, तो निघाला तशी ती बाहेर आली..

“हे आहे माझं आयुष्य…तुला माझं प्रेम हवं आहे, खरं की खोटं माहीत नाही.. पण आयुष्यात पहिल्यांदा मला असं कुणीतरी विचारलं.. मी आभारी आहे..लव्हशिप मागत होतास ना? माझ्या घराकडे बघ एकदा…आपण असताना आपल्या कुटुंबाला पैशासाठी मरमर करावी लागतेय या विचाराने मनाने आणि शरीराने खंगत चाललेल्या माझ्या बापाला माझं प्रेम गरजेचं आहे..वयाने झेपत नसतांनाही मी शिक्षण चालू ठेवावं आणि घरातला खर्च सुटावा म्हणून माझी आई लोकांच्या घरी काम करायला जाते तिला माझ्या प्रेमाची गरज आहे…तेव्हा तुझं प्रेम मी नम्रपणे नाकारते.”

हे ऐकून तो तिथून निघून गेला, त्याचे मित्र वाटच बघत होते..

“ओहो… लव्हशिप अन अजून काय काय दिलं भाई ला..भाई तू जिंकलास, काय काय घडलं सांग की…काय दिलं तिने बोल बोल..”

मित्र चेष्टेच्या मूडमध्ये त्याला नाना प्रश्न विचारत होते, तो गंभीर झालेला…

“गप बसा… एकदम गप..”

मित्रांवर ओरडून तो संतापात घरी गेला, त्याच्या डोळ्याच्या कडा कितीतरी वेळा पाणावत होत्या…

वर्ष सरत होती,

ती त्या रस्त्यावरून जाताना त्याला शोधायची, पण आता तो दिसत नव्हता..

तिला बाहेरून समजलं, की तो त्याच्या मोठ्या बहिणीकडे गेला आहे शिकायला…

अजून काही वर्षे उलटली,

तिचं लग्न करायचं होतं,

पण विधुर किंवा वयस्कर पुरूष अशीच स्थळं तिला यायची,

याचं कारण की एकदा गरम चहा तिच्या मानेवर सांडला होता आणि मानेवर, गळ्यावर मोठे डाग पडले…आधीच घरात गरिबी, त्यात हे व्रण… त्यामुळे अशी स्थळं तिला येऊ लागलेली…

******

भाग 3

Leave a Comment