लढाई-1

यावेळी काहीही झालं तरी माहेरी सगळं सांगून टाकायचं..

मनीषा स्वतःशीच बोलत होती,

घराच्या वाटण्या झालेल्या..

चारही भावांच्या वाटेला थोडं थोडं वाटून देण्यात आलेलं..

थोडं कसलं,

भरपूर होतं..

मनीषाचा नवरा तीन नंबरचा मुलगा,

चांगला शिकलेला, सवरलेला..

चांगल्या नोकरीला..

त्याला चांगली नोकरी म्हणून वाट्याला कमी आलं..

तिनेही काही म्हटलं नाही,

पण तीनही भावांनी आपल्या वाटेला आलेल्या संपत्तीने घर बांधलं,

तो वेगळी निघाली,

ऐशोआरामात जगू लागले,

सासऱ्यांचं ऑपरेशन निघालं,

तिच्या नवऱ्याने कर्ज काढलं,

ते पुरेना,

अजून कर्ज काढलं,

घरखर्च, मुलांची शिक्षणं, सगळं अवघड होऊन बसलं..

तिने सांगितलं,

अहो आता भावांना सांगा मदत करायला,

****

भाग 2
भाग 3

Leave a Comment