लक्ष्मी-3

 मला दोन शब्द बोलायचं आहे..

भटजींनी माईक हातात दिला..

“नमस्कार, आज तुम्ही मला कार्तिक शिरोडकर, यशस्वी उद्योजक म्हणून ओळखत आहात..पण 2 वर्षांपूर्वी एक परिस्थिती आलेली, की माझा बिझनेस ठप्प झालेला..मी पुरता कोलमडून गेलेलो…अश्यावेळी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली..तिने माझं आयुष्य आणि माझा बिझनेस बदलून टाकला..एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला…तिची हुशारी, बिझनेसचे ज्ञान आणि व्यवहारचातुर्य याच्या मी प्रेमातच पडलो..आयुष्यात एखादी परी यावी आणि आपलं आयुष्य बदलावं तसंच काहीसं झालं..आज टेकनोएजला 300 करोडची कंपनी बनवण्यात तिचा 80% वाटा आहे…साक्षात लक्ष्मीने माझ्यावर छत्र धरले आणि आज त्याच लक्ष्मीला मी सन्मानाने माझी पत्नी म्हणून घेऊन जातोय, आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे..”

सर्वांना खूप कौतुक वाटलं,

आपल्या होणाऱ्या बायकोचा सन्मान बघून,

आणि उत्सुकता लागली,

त्या लक्ष्मीला पहायची…

इकडे तो इर्षेने बघत होता,

त्यालाही आपल्या मामेभावासारखं मोठं व्हायचं होतं..

पण तो अयशस्वी ठरलेला..

त्याच्या बायकोला म्हणाला,

“बघ, अशी असते बायको…

नवऱ्याला एका उंचीवर नेऊन ठेवते..तुझ्यासारखी नाही, दर महिन्याला फक्त खरेदीसाठी तगादा लावणारी..खरंच, नशीबवान आहे कार्तिक..”

टाळ्यांच्या गजरात नवरीचं आगमन झाले,

सुंदर, सुशील आणि ज्ञानाचं तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं..

त्याने नीट न्याहळलं,

अंगावर काटा उभा राहिला..

ही तीच…

जिला आपण नाकारलं होतं..

जिला विटाळलेली म्हणून धिक्कारलं होतं…

तो सुन्न झाला, 

शांत झाला,

आपल्या डोळ्यांदेखत आपल्या वाट्याला येणार असलेली लक्ष्मी दुसऱ्याची होतांना बघू लागला…

त्याची बायको शेजारी टाळ्या वाजवत होती,

पुटपुटली..

“हुशार बायकोला समजूतदार नवराही मिळायला हवा…लकी गर्ल..”

आणि तिला सोडण्याचा पश्चाताप त्याला आयुष्यभर त्रास देत राहिला…

समाप्त

11 thoughts on “लक्ष्मी-3”

Leave a Comment