रोखठोक-3

 आपल्या या बोलण्याचा काय परिणाम होईल याचा विचार करण्याइतपत सुद्धा तो हुशार नव्हता..

आईने ते ऐकलं आणि एकच हंबरडा फोडला,

तेवढ्यात सुमन चार बॅग घेऊन बाहेर आली,

ते पाहून सासुबाई तर डोकंच झोडायला लागल्या,

“हेच दिवस दाखवायचे बाकी राहिलेले गं माय…काय पाप केलं मागच्या जन्मी अन ही अवदसा घरी आली…शेवटी माझ्या मुलाला माझ्यापासून केलंच वेगळं..माझा बाब्या नव्हता हो असा…फार जीव लावायचा आम्हाला..हिने काय जादूटोणा केला देव जाणे..”

त्याने हे ऐकलं आणि त्याला समजेना काय करावं,

तो बाहेर निघायला लागला,

तेवढ्यात सुमन म्हणाली,

“थांबा..”

“का?”

“आपण कुठेही जात नाहीये..”

“काय?”

नवरा तिच्याकडे पाहू लागला,

सासुबाई डोकं झोडायच्या थांबल्या आणि तिच्याकडे पाहू लागल्या,

“कसं वाटलं नाटक?”

“ए मूर्ख मुली…काय बिनडोक सारखी वागतेय?”

“अगं तुला इथे अस्वस्थ वाटतं ना, जाऊ की मग दुसरीकडे..” नवरा म्हणाला..

सासू त्याच्याकडे बघतच राहिली..

ती नवऱ्याला म्हणाली,

“तुम्हाला नंतर सरळ करते, आधी सासूबाईंशी बोलते..तर, सासुबाई…काय म्हणत होतात तुम्ही? माझा बाब्या असा नव्हता? जर तुम्हाला तुमच्या बाब्या वर इतका विश्वास होता तर माझ्या एका शब्दावर तो कसा तयार झाला वेगळं व्हायला? त्याला त्याचं स्वतःचं डोकं नव्हतं का? आपले आई वडील इथे आहेत, त्यांचा विचार करण्याची बुद्धी नव्हती का त्याला? आज मी नाटक केलं, मला तुम्हाला सोडून कुठेही जायचं नाही..शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळायचं आहे..हे नाटक फक्त यासाठी की तुम्ही जे म्हणतात ना, की माझा बाब्या असा नव्हता, तो बदलला वगैरे…ते सगळं फक्त मी नको नको झालीये तुम्हाला म्हणून माझ्यावर खापर फोडताय..मुळात तुमच्या बाब्यातच खोट आहे…तुमचा बाब्या आधीही तसा होता आणि आताही तसाच आहे..मी फक्त निमित्त मिळाले तुम्हाला”

सासू एकदम गपगुमान…

त्या दिवसापासून सासू कधीही तिच्या वाटेला गेली नाही..

समाप्त

4 thoughts on “रोखठोक-3”

Leave a Comment