रोखठोक-1

लग्न होऊन दोन महिनेही होत नाहीत तोच तिच्या कानावर शब्द पडले,

“आमच्या बाब्या असा नव्हता हो, ती आली आणि तालावरच नाचवलं त्याला”

हे ऐकून ती मात्र एकदम चक्रावली,

तिला हे अजिबात अपेक्षित नव्हतं,

एक नवरा म्हणून जे थोडेफार लाड, मदत करायला हवी तेवढी तो करायचा,

त्यात बदलण्यासारखं काय होतं?

असो,

ही आपली सुमन,

साधीसुधी नव्हती,

जिथल्या तिथे अन ज्याला त्याला वठणीवर आणायचं, हा तिचा स्वभाव, रोखठोक बोलायची, आई वडीलही घाबरायचे तिला..घाबरतच तिचं लग्न लावून दिलेलं..

नवऱ्याशी बोलताना अनेकदा लक्षात आलं,

तो एक नंबरचा निगरगट्ट,

काही म्हणा, बोला,

सुम्भासारखी फक्त मान हलवणार,

नोकरीला लागला तेव्हा एक वस्तू आई वडिलांना भेट म्हणून आणली नव्हती,

आई बाप म्हणून वेगळं काही केलंच नव्हतं त्याने,

पगारातले पैसे द्यायचा तेवढं नशीब,

तिला शाळेतले दिवस आठवले,

असंच एकदा एका शिक्षिकेने तिचा आणि तिच्या मैत्रिणीचा वर्गात विनाकारण अपमान केला होता,

****

भाग 2

रोखठोक-2

Leave a Comment