राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम

एके दिवशी एक बाई 2 मुलांना घेऊन तिच्या झोपडीत आली.

भांडायला लागली..

माझ्या नवऱ्याशी लग्नच कसं केलं तू?

राजकुमारीला धक्का बसला..

हळुहळु समजलं,

या मुलाने आपल्या रुबाबदार दिसण्याचा फायदा घेऊन अनेक स्त्रियांना फसवलं होतं..

तिने आपलं सामान घेतलं…

आपल्या घरी जायला निघाली..

राजा राणीने तिचा धिक्कार केला..तिला परत स्वीकारलं नाही…

ती परतीच्या वाटेवर जायला निघाली…

जंगलाच्या मध्यावर येऊन थांबली…

नवऱ्याकडे परत जाऊ शकत नव्हती आणि आई वडील स्वीकारू शकत नव्हते…”

गोष्ट पूर्ण होण्या आधीच आई परत आली..

शर्वरीला फोन आला आणि ती खोलीत निघून गेली..

बाहेर आली तेव्हा कल्पना मावशी निघून गेलेली,

तिने आईला विचारलं, मावशी कुठे गेल्या?

घरी गेली ती..

“मावशी किती बदलली आहे ना?”

“तिच्यासोबत जे झालं ते कुणासोबतही होऊ नये..”

“का? काय झालं?”

“खूप active मुलगी होती ती…एका दुकानदाराच्या मुलासोबत आंधळं प्रेम केलं आणि फसली….तो कष्टाळू असेल म्हणून आई वडिलांनीही हट्ट मान्य केला पण तो व्यसनी निघाला, बाहेरख्याली निघाला…मावशी अडकली…आजही केवळ दुःखं भोगतेय..”

शर्वरीला लक्षात आलं..

ती राजकुमारी कोण होती…

तिने आईच्या मोबाईल वरून मावशीचा नंबर काढला आणि फोन लावला..

“मावशी, गोष्ट अर्धवटच राहिली..गोष्टीचा शेवट काय होता?”

“ती राजकुमारी जंगलातच राहिली…आजही वनवास भोगतेय…तिथेच, एकटी..”

शर्वरीला जे समजायचं ते ती समजली..

(काही दिवसांनी)

किशोरीचा आईला फोन,

“मावशी, शर्वरी आणि मी परत बोलायला लागलो…तिने त्या मुलाचा नाद सोडून दिलाय..”

आईने एक सुस्कारा टाकला…

आणि राजकुमारीच्या गोष्टीची पुनरावृत्ती टळली…

समाप्त

46 thoughts on “राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम”

  1. खुपच सुंदर कथा आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल

    Reply
  2. खुपच अर्थ पूर्ण गोष्टी सांगितली आहे. नक्किच समाजात मत परिवर्तन होईल सध्या खुपच वाईट समाजात चालू आहे नक्किच एक दिवस आळा बसेल

    Reply

Leave a Comment