राजकुमारीची गोष्ट-2

आई सुन्न झाली, शर्वरी अश्या काही जंजाळात अडकेल याची आईला कल्पनाही नव्हती…

शर्वरीच्या खोलीत जाऊन तिला विचारण्यासाचं धाडसही आईला झालं नाही..

एवढयात दारावरची बेल वाजली,

आईची एक मैत्रीण आलेली, कल्पना…

“ये बस..”

कल्पनाने आईच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले,

कल्पनाने विचारताच आईने रडत रडत सगळं सांगितलं…

कल्पनाला ऐकून वाईट वाटलं…

इतक्यात शेजारच्या एका बाईने आईला हाक दिली,

“अहो आज भिशी फोडायची आहे, पाच दहा मिनिटं येऊन जा ना..”

आईने पटकन तोंड धुतले, कल्पनाला थोडावेळ बसण्यास सांगून आई निघून गेली..

शर्वरी खोलीबाहेर आली, कल्पना मावशीला बघून थोडी गोंधळली..कल्पना मावशीला तिने आईच्या जुन्या अलबम मध्ये पाहिलेलं..एकदम डॅशिंग, रुबाबदार, सुंदर…पण आता वेगळीच दिसत होती…

“अगं आई शेजारी गेलीये, येईलच.. तू बस ना..”

शर्वरी कल्पनामावशीसमोर बसली, पण सगळं डोकं मोबाईल मध्ये..

मावशीने स्वतःहून प्रश्न केला..

“कॉलेज कसं चाललंय”

“छान..” शर्वरीने मोबाईल मधून डोकं न काढता उत्तर दिलं..

“तुला एक गोष्ट सांगू?” मावशी म्हणाली,

“गोष्ट?” शर्वरी गोंधळली…

“ऐक तर खरं… मला ही गोष्ट खुप आवडते, आणि आई येईपर्यंत बोर होण्यापेक्षा ऐक..”

शर्वरीने मोबाईल बाजूला ठेवला हे विशेष..!

“ऐक मग, ही गोष्ट आहे एका राजकुमारीची..

दिसायला खूपच सुंदर, हुशार आणि मनमिळाऊ…

राजा राणीची खूप लाडकी…

तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपत होते..

एके दिवशी ती तलावाच्या काठी फिरायला गेली..

तिथे एक मुलगा लाकूड तोडत होता..

कष्टाचं काम करत असल्याने त्याचे शरीर पिळदार दिसत होते..आणि तो दिसायलाही खुप छान होता..

राजकुमारी भाळली…

दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या..

त्यालाही ती आवडायची..

तिने लग्नाचा प्रस्ताव ठेवला..

तो म्हणाला मी एक साधा माणूस, तू राजकुमारी, तुझ्या घरचे ऐकणार नाही..

पण ती प्रेमात आंधळी झालेली..

ती म्हणाली मी तुझ्यासोबत पळून यायला तयार आहे..

तो म्हणाला माझ्याकडे धन नाही, तू घरून थोडंफार धन आण.. मग पळून जाऊ..

राजकुमारी पळून गेली, राजा राणींला धक्का बसला..

त्या मुलाने तिला लांबच्या जंगलात नेलं त्याच्या झोपडीत..

प्रेमात आंधळी ती आनंदाने राहू लागली..

तिला दिवस गेले,

***

भाग 3 अंतिम

52 thoughts on “राजकुमारीची गोष्ट-2”

Leave a Comment